जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / Ved Movie: शर्मिला ठाकरेंनाही 'वेड'ची भुरळ; सिनेमा पाहण्यासाठी थेट अख्खं थिएटर केलं बुक!

Ved Movie: शर्मिला ठाकरेंनाही 'वेड'ची भुरळ; सिनेमा पाहण्यासाठी थेट अख्खं थिएटर केलं बुक!

जिनिलीया- रितेश देशमुख

जिनिलीया- रितेश देशमुख

केवळ सामान्य प्रेक्षकच नाही तर बॉलिवूड सेलिब्रिटी ते राजकारणी सगळ्यांनाच वेडची भुरळ पडली आहे. वेड चित्रपटाबाबत एक बातमी समोर येतीये

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 10 जानेवारी:  रितेश आणि जिनिलिया च्या वेड चित्रपटाची सगळ्यांनाच भुरळ पडली आहे. या चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर चांगलीच चलती आहे. या चित्रपटापुढे  बॉलिवूडच्या बिग बजेट चित्रपटांचीही अवस्था वाईट झाली आहे. ‘वेड’ मुळे मराठी चित्रपटासाठी नव्या वर्षाची सुरुवात धुमधडाक्यात झाली आहे. वेड’ हा सिनेमा प्रदर्शित झाल्यापासून उत्तम कामगिरी करताना दिसतोय. बॉक्स ऑफिसवर वेडनं रेकॉर्ड ब्रेक कमाई केली आहे. तर प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत त्यानं सर्वांना वेड लावलंय असं म्हणायला हरकत नाही. आता केवळ सामान्य प्रेक्षकच नाही तर बॉलिवूड सेलिब्रिटी ते राजकारणी सगळ्यांनाच वेडची भुरळ पडली आहे.  वेड चित्रपटाबाबत अशीच एक बातमी समोर येतीये. राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनाही ‘वेड’ चित्रपट पाहायचा होता. त्यासाठी यांनी थेट अख्खं थिएटरचं बूक केलं. नुकतंच हा चित्रपट पाहण्यासाठी  रितेश देशमुख, जेनेलिया आणि शर्मिला ठाकरे एकत्र आले होते. यावेळी बोलताना शर्मिला ठाकरे म्हणाल्या, ‘मला सगळ्यात जास्त आनंद झाला. आम्ही नेहमी भेटत असतो. जेनेलिया देशमुखला दोन मुलं झाली. दहा- बारा वर्षांपूर्वी तीचं लग्न झाल्याचं तिच्या चेहऱ्यावर कुठही दिसत नाही. जेनेलिया या खूप सुंदर अभिनेत्री आहेत. तिनं पुन्हा अभियनाकडं वळावं, असं तिला नेहमी सांगत होते.’  शर्मिला ठाकरे म्हणाल्या, ‘रितेशने चित्रपट पाहण्यासाठी मला वेळ मागितला. मी थिएटरचं बूक केलं.’ हेही वाचा - Ved Box Office Collection: ‘वेड’नं मोडले सगळे रेकॉर्ड, एका दिवसाची कमाई 5 कोटी; एकूण आकडा पाहून वेड लागेल तर यावेळी रितेश देशमुख म्हणाला, ‘चित्रपट हा माझा किंवा तुमचा असा नसतो. ही एक इंडस्ट्री आहे. ठाकरे यांनी इंडस्ट्रीला आपलं मानल आहे. ती भावना सर्वांनी पुढं नेली पाहिजे. वेड हा प्रेक्षकांचा चित्रपट आहे. तो मोठा होत असेल तर प्रेक्षकांमुळं होतोय. प्रेक्षक थिएटरमध्ये येतात. त्यांना चांगले चित्रपट देण्याची जबाबदारी आमची आहे’ अशा भावना त्याने व्यक्त केल्या आहेत.

जाहिरात

‘वेड या चित्रपटाला दहा दिवस झाले. दहा दिवसांत सैराटपेक्षा जास्त कमाई या चित्रपटानं केली. एखादा चित्रपट दुसऱ्या चित्रपटासोबत तुलना केली जाऊ शकत नाही. कला आणि वाणिज्य यातून चित्रपट चालत असतो, असंही रितेश यांनी सांगितलं. तसेच ‘प्लाझा थिएटरमध्ये लहानपणापासून येतो. परत वेड हा चित्रपट राज्यभर चालतोय. प्लाझामध्ये आज मोठा शो दाखविला जात आहे. आपले प्रेक्षक आपला चित्रपट पाहिला जातो. त्यामुळं मन भरून येतो. राज ठाकरे हे दौऱ्यात होते. त्यांच्यासोबत लवकरच वेड चित्रपट पाहणार आहे.’ असंही रितेश यावेळी बोलताना म्हणाला.

News18लोकमत
News18लोकमत

फिल्म क्रिटीक तरण आदर्श यानं दिलेल्या माहितीनुसार, वेड हा सिनेमा प्रदर्शित झाल्यापासून प्रत्येक दिवशी तगडी कमाई करतोय. पहिल्या आठवड्याच्या तुलनेत वेडनं दुसऱ्या आठवड्यात 12.75 करोडची सर्वाधिक कमाई केली आहे. शुक्रवारी सिनेमानं 2.52 करोड कमावले तर शनिवारी 4.53 करोड कमावले आणि दोन दिवसांच्या तुलनेत रविवारी सिनेमा 5.70 करोडची कमाई केली. सिनेमा प्रदर्शित झाल्यापासून आतापर्यंत सिनेमानं बॉक्स ऑफिसवर 33.42 करोड रुपये कमावलेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात