मुंबई, 29 जानेवारी : शाहरुख खानचा बहुचर्चित चित्रपट ‘ पठाण ’ अखेर रिलीज झाला आहे. काही ठिकाणी विरोध होत असला तरी ‘पठाण’ बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कमाई करत आहे. पठाणचे चाहते सगळीकडे उत्सव असल्यासारखं सेलिब्रेशन करत आहेत. बॉलीवूडचे अनेक कलाकार देखील शाहरुखच्या पठाणचं तोंडभरून कौतुक करत आहे. शाहरुख खान, दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहमच्या ‘पठाण’ने जगभरात धुमाकूळ घातला आहे. अवघ्या 4 दिवसांत ‘पठाण’ने कोट्यवधींचा टप्पा पार केला आहे. ‘पठाण’ने अवघ्या 4 दिवसांत 400 कोटींचा व्यवसाय केला आहे. चौथ्या दिवशी ‘पठाण’ने जबरदस्त षटकार ठोकत परदेशात 164 कोटींची कमाई केली आहे. यासोबतच ‘पठाण’ने 429 कोटींची कमाई केली आहे. या चित्रपटाने बॉलिवूडला एक नवीन आशा दिली आहे. बॉलिवूडचे चित्रपट एका मागोमाग एक फ्लॉप होत असताना पठाण ने बॉलिवूडची बुडती नाव तारली आहे. चौथ्या दिवशी ‘पठाण’ने जगभरात किती कमाई केली ते पाहूया. हेही वाचा - Hemangi Kavi: ‘धर्मामुळे त्याचा द्वेष करणारे….’ बॉलिवूडच्या ‘पठाण’ बद्दल हेमांगी कवीची ‘ती’ पोस्ट चर्चेत ‘पठाण’ने चार दिवसांत विदेशी बाजारातून 164 कोटींचे एकूण कलेक्शन केले. तर भारतात 265 रुपये जमा झाले. अशा प्रकारे पठाणचे जगभरातील एकूण कलेक्शन 429 कोटी झाले आहे. येत्या दोन दिवसांत हा आकडा 500 कोटींच्या पुढे जाण्याची शक्यता आहे. देशांतर्गत पठाणचे कलेक्शन पहिल्या दिवशी 55 कोटी, दुसऱ्या दिवशी 68 कोटी, तिसऱ्या दिवशी 38 कोटी रुपये, तर चौथ्या दिवशी 51 कोटी रुपये असे एकूण 212.50 कोटी रुपये कमावले आहेत. सगळीकडे या चित्रपटाच्या कमाईची चर्चा होत आहे.
‘पठाण’ चित्रपटासाठी आजही थिएटरमध्ये गर्दी होत आहे. बहुतांश चित्रपटगृहे हाऊसफुल्ल सुरू आहेत. शाहरुख खानने चार वर्षांनंतर ‘पठाण’मधून पुनरागमन केले आहे. पहिल्यांदाच तो एका हाय ऑक्टेन अॅक्शन चित्रपटात दिसला आणि चाहत्यांना त्याचा अवतारही आवडला. शाहरुख खानचा पठाण हा चित्रपट प्रजासत्ताक दिनानिमित्त 100 देशांमध्ये 8000 हून अधिक स्क्रीनवर प्रदर्शित झाला. यासोबतच गांधी गोडसे एक युद्ध हा चित्रपटही प्रदर्शित झाला होता जो पठाणच्या वादळात कमी झाला आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, शाहरुख खानने (शाहरुख खान पठाण फी) पठाणसाठी 100 कोटी रुपयांची मोठी फी आकारली आहे. या चित्रपटाचे बजेट 250 कोटी असल्याचे सांगण्यात येत आहे. 100 कोटींव्यतिरिक्त शाहरुख खानने चित्रपटाच्या नफ्यातील वाटाही मागितला आहे. सध्या या आकडेवारीची पुष्टी झालेली नाही. शाहरुख, दीपिका आणि जॉनसोबत या चित्रपटात डिंपल कपाडिया आणि आशुतोष राणा यांच्याही भूमिका आहेत.