मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /Hemangi Kavi: 'धर्मामुळे त्याचा द्वेष करणारे....' बॉलिवूडच्या 'पठाण' बद्दल हेमांगी कवीची 'ती' पोस्ट चर्चेत

Hemangi Kavi: 'धर्मामुळे त्याचा द्वेष करणारे....' बॉलिवूडच्या 'पठाण' बद्दल हेमांगी कवीची 'ती' पोस्ट चर्चेत

हेमांगी कवी

हेमांगी कवी

पठाणवर बॉलिवूडचे सेलिब्रिटी तर विविध प्रतिक्रिया तर देत आहेतच शिवाय आता एका मराठी अभिनेत्रीने देखील त्यावर भाष्य केलं आहे. या अभिनेत्रीची पोस्ट सध्या चांगलीच चर्चेत आली आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 29 जानेवारी :  सध्या सगळीकडे शाहरुख खानच्या 'पठाण' चीच क्रेझ आहे.  काही ठिकाणी विरोध होत असला तरी 'पठाण' बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कमाई करत आहे. पठाणचे चाहते सगळीकडे उत्सव असल्यासारखं सेलिब्रेशन करत आहेत. बॉलीवूडचे अनेक कलाकार देखील शाहरुखच्या पठाणचं तोंडभरून कौतुक करत आहेत. आता पठाणवर बॉलिवूडचे सेलिब्रिटी तर विविध प्रतिक्रिया तर देत आहेतच शिवाय आता एका मराठी अभिनेत्रीने देखील त्यावर भाष्य केलं आहे. या अभिनेत्रीची पोस्ट सध्या चांगलीच चर्चेत आली आहे.

मराठी अभिनेत्री हेमांगी कवी  कायम चर्चेत असते. प्रत्येक विषयावर आपलं रोखठोक मत ती मांडत असते. तिने अनेक मराठी सिनेमा, मालिका तसेच नाटकांमधून आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे.  हेमांगी कवी सोशल मीडियावर सक्रिय असते. ती तिचे फोटो सोशल मीडियावरून शेअर करत असते तसेच आगामी प्रोजेक्ट बद्दल माहिती देत असते. आजही तिने सोशल मीडियाच्या माध्यमातून एका खूप महत्वाच्या विषयाला हात घातला आहे. तिने नुकतीच शाहरुख खान बद्दल एक पोस्ट केली आहे. तिची ही  पोस्ट आता चर्चेचा विषय ठरली आहे.

हेही वाचा - Sonalee Kulkarni: वाळवंटात नाचायची हौस सोनाली कुलकर्णीला पडली महागात; अशी झाली अवस्था

हेमांगी कवीने शाहरुख खानवर होणाऱ्या टीकेवर भाष्य केलं आहे. हेमांगीने लिहिलं आहे कि, 'तो कसा दिसतो, त्याचा धर्म काय, कसा बोलतो, अभिनेता म्हणावं का याला वगैरे वगैरे बोलणाऱ्यांनो तुम्ही आता खरंच बंद पडा! अनेक वर्षांपासून ही चर्चा होत आलीए पण आता ती थांबवुया. काय? त्याच्या धर्मामुळे, त्याच्या non conventional Hero looks मुळे त्याचा पराकोटीचा द्वेष करणारे आपण सगळ्यांनीच पाहीले आहेत. मी त्याची fan आहे कळल्यावर अनेक जणांनी मला unfollow केलं. याहून बालिश प्रकार मी पाहीला नाही. असो.'

तिने पुढे म्हटलंय कि, 'मला वाटतं या द्वेषाचं मुळ कारण हे लोक अनाहुतपणे स्वतःहाला त्याच्याशी compare करत असावेत. हा सगळ्या बाबतीत आपल्यापेक्षा डावा असून ही इतका यशस्वी कसा? आणि आता तर या वयातही!!! सिनेमा प्रदर्शनासाठी लागणारे सगळे ठोकताळे बाजूला सारून घरबसल्या घरी बसणाऱ्या लोकांना Theatre मध्ये आणणे हे हाच करू जाणे! स्वतःहाच्या मुलाच्या बाबतीत त्याने दाखवलेला संयम (भल्या भल्यांनाही जमला नसता) त्याला या वयात जरा जास्तच आकर्षक बनवतो. उफ्फ अपन तो पहलेसे लुटे हुए थे, अब तो पुरे बरबाद हो गए!  पन्नाशी नंतर retirement चे plans करून मोकळे झालेल्यांनो द्वेष करण्यापेक्षा त्याच्याकडून काहीतरी शिकूया! तुमच्या ५७ व्या वर्षी जर तुम्ही २०-२२ वयाच्या मुला-मुलींना नाचवू शकत असाल, वेड लावू शकत असाल तर पुढे बोला!'

हेमांगी कवीच्या या पोस्टवर अनेक जण भाष्य करत आहेत.

First published:

Tags: Marathi actress, Marathi entertainment