Panipat trailer पाहिल्यावर अर्जुन कपूरवर भडकले नेटकरी, म्हणाले...

Panipat trailer पाहिल्यावर अर्जुन कपूरवर भडकले नेटकरी, म्हणाले...

अर्जुन कपूरच्या बाबतीत मात्र प्रेक्षकांचा नाराजीचा सूर दिसून येत आहे.

  • Share this:

मुंबई, 05 नोव्हेंबर : बहुचर्चित सिनेमा ‘पानिपत’चा ट्रेलर नुकताच रिलीज झाला. अर्जुन कपूर, संजय दत्त आणि कृती सेनन यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या सिनेमाचा ट्रेलर सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. संजय दत्तनं साकारलेला खलनायक प्रेक्षकांच्या पसंतीत उतरला असून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे, तसेच अभिनेत्री कृती सेननचा मराठमोळा लुक सुद्धा प्रेक्षकांना आवडला. तिच्या भूमिकेला अनेकांनी क्यूट आणि स्ट्रॉन्ग म्हटलं आहे. पण अर्जुन कपूरच्या बाबतीत मात्र प्रेक्षकांचा नाराजीचा सूर दिसून येत आहे. अर्जुनच्या बाबतीत दिग्दर्शकाची निवड चुकल्याचं अनेकांनी म्हटलं आहे.

पानिपतच्या ट्रेलरवर आलेल्या सोशल मीडियावरील रिअ‍ॅक्शनमध्ये एकंदर अर्जुन बद्दल सर्वांनीच नाराजी व्यक्त केली आहे. काहींनी या सिनेमाला ‘बाजीराव मस्तानी’ची कॉपी म्हटलं आहे. तर काहींनी या सिनेमाला सर्वात मोठा पीरियड सिनेमा म्हटलं आहे. यातील संजय दत्तची भूमिका व्हिलनचा बाप असल्याचं बोललं जात आहे. तसेच कृती सेननच्या भूमिकेचंही कौतुक झालं मात्र अर्जु कपूर मात्र कोणालाच आवडलेला नाही. त्याच्या ऐवजी प्रेक्षकांनी अनेक पर्याय सुद्धा सुचवले आहेत.

मराठ्यांच्या इतिहासातील आणखी एक सोनेरी पान उलगडणार, पाहा Panipat Trailer

अर्जुनमध्ये ती ‘बात’ नाही

एका युजरनं लिहिलं, मी या सिनेमाच्या ट्रेलरची खूप आतुरतेनं वाट पाहत होते. मात्र हा ट्रेलर रिलीज झाल्यानंतर माझी निराशा झाली. विशेषतः अर्जुन कपूर या सिनेमासाठी योग्य नाही कारण त्याच्या चेहऱ्यावर एका योद्ध्याकडे असणारी आक्रमकता आणि भाव नाहीत. तो कोणत्याही कोनातून योद्धा वाटत नाही. दिग्दर्शकानं केलेली त्याची कास्टिंग चुकीची आहे. मात्र निगेटिव्ह भूमिकेत संजय दत्तनं कमाल केली आहे. अग्नीपथमध्ये मोठ्या मुश्किलीनं हृतिक रोशन त्याचा सामना करु शकला होता. पण या सिनेमात गोवारिकरांनी अर्जुन कपूरला घेऊन चूक केली आहे. हे चुकीचं कास्टिंग आहे.

स्टार होताच बदलला रानू मंडलचा 'सूर', हात लावल्यानं चाहतीवर भडकली; पाहा VIDEO

पानिपतचा ट्रेलर रिलीज झाल्यानंतर युजर्सनी अर्जुन कपूरवर निशाणा साधला आहे. त्यांनी अर्जुनला घेऊन या सिनेमा खराब केल्याचंही म्हटलं आहे. अनेकांनी अर्जुन सर्व ठिकाणी एकसारखेच एक्सप्रेशन्स देत असल्याचं म्हटलं आहे. तर एका युजरनं तर या सिनेमाला चक्क लो बजेट बाजीराव-मस्तानी म्हटलं आहे. अनेकांनी आशुतोष गोवारिकर यांच्या दिग्दर्शनाचं कौतुक केलं मात्र अर्जुन कपूरची निवड चुकीची असल्याचं म्हटलं आहे. हा सिनेमा फ्लॉप झाल्यास त्याला अर्जुन कपूर जबाबदार असल्याचं युजर्सनी म्हटलं आहे.

तुझ्या रिअल लाइफमधली ‘ती’ कोण? प्रश्न ऐकून गडबडला कार्तिक आर्यन

पानीपतची लढाई 1761 मध्ये मराठा साम्राज्य आणि दुराणी साम्राज्यात झाली होती. या सिनेमात पानीपतच्या युद्धाची कथा दाखवण्यात आली आहे. ही लढाई मराठा साम्राज्याचे सदाशिवराव भाऊ आणि अफगानिस्तानचा अहमद शाह अब्दाली यांच्यात झाली होती. ही लढाई 14 जानेवारी 1761 सध्याच्या हरियाणामधील पानीपत मैदानात झाली. हा सिनेमा येत्या 6 डिसेंबरला रिलीज होत आहे.

रणबीरच्या एक्स गर्लफ्रेंड्ससोबत लिफ्टमध्ये अडकलीस तर काय करशील? करिना म्हणते...

==========================================================

VIDEO : अर्जुन कपूर, क्रिती सेन, संजय दत्त शेअर करणार स्क्रिन; 'पानिपत'मधील कलाकारांचे लुक व्हायरल

First published: November 5, 2019, 4:55 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading