मुंबई, 05 नोव्हेंबर : सध्या बॉलिवूडमध्ये ऐतिहासिक सिनेमांची चलती आहे. बाजीराव मस्तानी, पद्मावत, मणिकर्णिका असे एकामागोमाग एक ऐतिहासिक सिनेमा रिलीज झाले त्यानंतर आता आणखी एक ऐतिहासिक सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे तो म्हणजे ‘पानिपत’ या सिनेमाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला असून त्याला सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. अर्जुन कपूर, कृती सेनन आणि संजय दत्त यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या सिनेमात मराठा साम्राज्याच्या इतिहासाची पानं उलगडली जाणार आहेत. या सिनेमात अर्जुन कपूर सदाशिवराव पेशव्यांची भूमिका साकारत आहे तर अभिनेत्री कृती सेनन त्यांची पत्नी पार्वती बाईची भूमिका साकारत आहे. या सिनेमाची कथा पनिपतच्या युद्धाची कथा साकारण्यात आली असून अर्जुननं सदाशिवराव पेशव्यांच्या भूमिकेत फिट बसल्याचं ट्रेलरमध्ये दिसतं. तर कृती सेननं मराठमोळ्या वेशात सर्वांची मनं जिंकली आहेत. अभिनेता संजय दत्तनं मात्र अहमद शाह अब्दालीच्या खलनायकी भूमिकेला योग्य न्याय दिला आहे. तो या सिनेमातून पुन्हा एकदा खतरनाक खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. तुझ्या रिअल लाइफमधली ‘ती’ कोण? प्रश्न ऐकून गडबडला कार्तिक आर्यन
पानीपतची लढाई 1761 मध्ये मराठा साम्राज्य आणि दुराणी साम्राज्यात झाली होती. या सिनेमात पानीपतच्या युद्धाची कथा दाखवण्यात आली आहे. ही लढाई मराठा साम्राज्याचे सदाशिवराव भाऊ आणि अफगानिस्तानचा अहमद शाह अब्दाली यांच्यात झाली होती. ही लढाई 14 जानेवारी 1761 सध्याच्या हरियाणामधील पानीपत मैदानात झाली. रणबीरच्या एक्स गर्लफ्रेंड्ससोबत लिफ्टमध्ये अडकलीस तर काय करशील? करिना म्हणते…
या सिनेमात अनेक लांब अॅक्शन सीन शूट करण्यात आले आहेत. अर्जुन कपूर आणि कृति सेनन या सिनेमासाठी खूप उत्साहित आहे. या सिनेमासाठी या दोघांनीही युद्ध कलांचं प्रशिक्षण घेतलं होतं. हा सिनेमा येत्या 6 डिसेंबरला रिलीज होत आहे. शुध्द देसी मराठीची तिसरी वेब सिरीज ‘फोमो’; सागर कारंडे, पर्ण पेठेची खास भूमिका =================================================================== VIDEO : अर्जुन कपूर, क्रिती सेन, संजय दत्त शेअर करणार स्क्रिन; ‘पानिपत’मधील कलाकारांचे लुक व्हायरल

)







