मुंबई, 05 नोव्हेंबर : कार्तिक आर्यन, (Kartik Aaryan) अनन्या पांडे (Ananya Panday) आणि भूमी पेडणेकर (Bhumi Pednekar) या त्रिकूटांचा ‘पति पत्नी और वो’ (Pati Patni Aur Woh) सिनेमाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. सिनेमाच्या नावावरूनच सिनेमात एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर दाखवण्यात आल्याचं दिसतं. कार्तिकने चिंटू त्यागी ही व्यक्तिरेखा साकारली आहे. सिनेमाचा ट्रेलर मजेशीर असून कार्तिकच्या चाहत्यांना सिनेमा रिलीज होण्याची वाट पाहत आहेत. दरम्यान या सिनेमाच्या ट्रेलर लॉन्चला कार्तिकला तुझ्या रिलअ लाइफमधील ती कोण आहे असा प्रश्न विचारण्यात आला. ज्यावर कार्तिक गडबडलेला दिसला. एवढंच नाही तर या प्रश्नानंतर तो काहीसा नर्व्हसही झालेला दिसला. काही दिवसांपूर्वी सारा अली खान आणि कार्तिक आर्यनच्या ब्रेकअपचं वृत्त समोर आलं होतं. कामाच्या व्यग्र वेळापत्रकातून एकमेकांना वेळ देऊ शकत नसल्यानं या दोघांनीही वेगळं होण्याचा निर्णय घेतल्याचं बोललं जात आहे. याशिवाय या आधी कार्तिकचं नाव अनन्या पांडेसोबतही जोडलं गेलं होतं. त्यामुळे ट्रेलर लॉन्चच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये गर्लफ्रेंडबद्दल प्रश्न ऐकून कार्तिक नर्व्हस झाला. मात्र वेळ सावरून नेत त्यानं या प्रश्नाचं उत्तरही दिलं. शुध्द देसी मराठीची तिसरी वेब सिरीज ‘फोमो’; सागर कारंडे, पर्ण पेठेची खास भूमिका
पत्रकारांनी कार्तिकला विचारलं तुझ्या रिअल लाइफमध्ये ‘वो’ कोण आहे. त्यावर कार्तिक सुरुवातीला नर्व्हस झाला मात्र नंतर त्यानं पत्रकारांना उलट प्रश्न केला, तुम्ही हा प्रश्न भूमीला विचारत आहात का? पण जेव्हा त्यांनी सांगितलं की हा प्रश्न तुझ्यासाठीच आहे. त्यावर कार्तिक सिनेमाचे दिग्दर्शक भूषण कुमार यांना म्हणला या प्रश्न सोडवा आता. त्यावर त्यांनी कार्तिकच्या आयुष्यात ‘वो’ म्हणजे गर्लफ्रेंड खूप साऱ्या आहेत असं म्हटलं. Video: म्हणून फोटोग्राफर्स दिसताच सारा अली खान पळाली आणि…
भूषण कुमार यांची हीच गोष्ट पकडत पत्रकारांनी कार्तिकला भूषण सर तर तुझ्या खूप गर्लफ्रेंड असल्याचं बोलत आहेत, असं म्हटलं त्यावर कार्तिक म्हणाला, सर माझ्या आयुष्यात सध्या तरी कोणीही गर्लफ्रेंड नाही. पण हो माझी सिनेमातील भूमिका चिंटू त्यागीच्या लाइफमध्ये मात्र ती आहे. अनन्या पांडे आणि माझ्या पत्नीची भूमिका भूमि पेडणेकर करत आहे. Panipat: अर्जुन कपूरच्या सदाशिवरावांसमोर फिका पडला संजूचा अहमद शाह अब्दाली
कार्तिक, भूमी आणि अनन्या या त्रिकूटाचा हा सिनेमा येत्या 6 डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे. विशेष म्हणजे याच दिवशी अर्जुन कपूर, क्रिती सेनन आणि संजय दत्त स्टारर ‘पानीपत’ (Panipat) सिनेमाही प्रदर्शित होणार आहे. आता या दोन सिनेमांपैकी प्रेक्षक कोणत्या सिनेमाला पसंती देतात हे येणारा काळच सांगेल. स्टारचा मुलगा संन्यासी होण्याच्या मार्गावर, 28 व्या वर्षी गेला ओशोच्या आश्रमात ===================================================================== VIDEO : अर्जुन कपूर, क्रिती सेन, संजय दत्त शेअर करणार स्क्रिन; ‘पानिपत’मधील कलाकारांचे लुक व्हायरल

)







