स्टार होताच बदलला रानू मंडलचा 'सूर', हात लावल्यानं चाहतीवर भडकली; पाहा VIDEO

स्टार होताच बदलला रानू मंडलचा 'सूर', हात लावल्यानं चाहतीवर भडकली; पाहा VIDEO

रानू मंडल यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत असून स्टार झाल्यानंतर रानू यांचं वागणं बदलल्याचं युजर्सचं म्हणणं आहे.

  • Share this:

मुंबई, 05 नोव्हेंबर : रानू मंडल हे नाव मागच्या काही काळापासून सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आहे. पश्चिम बंगालच्या रानाघाट रेल्वे स्टेशनवर गाणं गाऊन भीक मागणाऱ्या रानू यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि त्या रातोरात स्टार झाल्या. एवढंच नाही तर बॉलिवूडचा स्टार प्लेबॅक सिंगर हिमेश रेशमियानंही त्यांना त्याच्या सिनेमात गाण्याची संधी देऊ केली. त्यांच्या आवाजातलं ‘तेरी मेरी कहानी’ हे गाणं प्रचंड गाजलं. रानू मंडल मीडिया समोर आल्या तेव्हा सर्वांशीच नम्रपणे बोलताना दिसल्या. पण नुकताच त्यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यात रानू एका चाहतीवर भडकलेल्या दिसत आहेत. त्यामुळे स्टार झाल्यावर रानू मंडल यांचा नूर बदलल्याचं म्हटलं जात आहे.

सध्या फेसबुकवर रानू मंडल यांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्यांचा हा व्हिडीओ गाण्याचा नाही तर त्याच्या एका चाहतीचा आहे. या व्हिडीओमध्ये त्या एका सुपर मार्केटमध्ये काहीतरी खरेदी करताना दिसत आहेत. एवढ्यात एक महिला त्यांना हात लावून हाक मारते आणि त्याच्यासोबत सेल्फी घेण्याविषयी विचारते. मात्र यावर रानू तिच्यावर रागावतात. त्या आधी त्या महिलेला दूर राहायला सांगतात आणि नंतर हात लावून हे असं करण्याचा अर्थ काय असं विचारताना दिसत आहेत. चाहतीनं हात लावल्यानं रानू मंडल भडकल्याचं या व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसत आहे.

रानू मंडल यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत असून स्टार झाल्यानंतर रानू यांचं वागणं बदलल्याचं युजर्सचं म्हणणं आहे. एवढंच नाही तर अनेक युजर्सनी यश मिळालं म्हणून त्याचा कधी गर्व करू नये असा सल्लाही दिला आहे. कारण यशाच्या शिखरावरून खाली यायला वेळ लागत नाही. तर काहींनी मात्र रानूला हात लावणाऱ्या महिलेला चुकीचं म्हटलं आहे. पण बहुतांश लोकांना रानू मंडल यांचं वागणं आवडलेलं नाही.

रानू मंडल बॉलिवूड डेब्यू करण्याआधी पश्चिम बंगालच्या राणाघाट रेल्वे स्टेशनवर गाणं गाऊन आपलं पोट भरत असत. त्यावेळी एतींद्र चक्रवर्ती नावाच्या एका मुलानं त्यांचा व्हिडीओ तयार करुन सोशल मीडियावर अपलोड केला आणि रानू सोशल मीडिया स्टार झाल्या. त्यांनी लता मंगेशकर यांचं गायलेलं गाणं प्रचंड व्हायरल झालं आणि बॉलिवूड सिंगर हिमेश रेशमियानं आपल्या सिनेमासाठी गाणं गाण्याची संधी दिली. यानंतर त्यांनी या सिनेमासाठी एक नाही तर तीन-तीन गाणी गायली.

==============================================================

VIDEO : अर्जुन कपूर, क्रिती सेन, संजय दत्त शेअर करणार स्क्रिन; 'पानिपत'मधील कलाकारांचे लुक व्हायरल

First published: November 5, 2019, 11:44 AM IST
Tags: Bollywood

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading