मुंबई, 05 नोव्हेंबर : अभिनेत्री करिना कपूर खान नेहमीच काही ना काही कारणानं चर्चेत असते. यासिवय ती बॉलिवूडची सुपर मॉम म्हणून ओळखली जाते. सामान्यतः लग्नानंतर अभिनेत्रींचं करिअर संपतं मात्र करिनानं का समज मोडीत काढला. लग्नानंतरच काय मुलगा तैमुरच्या जन्मानंतरही करिनानं सिनेमांनमध्ये काम केलं. नुकतंच तिनं पुरुष आणि महिलांच्या T20 World Cup 2020 च्या ट्रॉफीचं अनावरण केलं. यातील महिलांची सीरिज फेब्रुवारी 2020 तर पुरुषांची ऑक्टोबरमध्ये होणार आहे. दरम्यान या इव्हेंटनंतर झालेल्या मुलाखतीत करिनानं दिलखुलास गप्पा मारल्या आणि अनेक खुलासेही केले. या मुलाखतीत करिनाला ‘जर तु कतरिना कैफ, दीपिका पदुकोण आणि आलिया भट यांच्यासोबत लिफ्टमध्ये अडकलीस तर काय करशील?’ असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर करिना म्हणाली, मी आधी याची खात्री करेन की लिफ्टमध्ये रणबीर नाही आहे किंवा मग याची खात्री करेन की त्या लिफ्टमध्ये रणबीर आहे. Video: म्हणून फोटोग्राफर्स दिसताच सारा अली खान पळाली आणि…
रणबीरची गर्लफ्रेंड किंवा एक्स गर्लफ्रेंड बद्दल बोलण्याची करिनाची ही पहिलीच वेळ नाही. याआधी कॉफी विथ करणच्या नव्या सीझनमध्ये तिनं रणबीरसोबत हजेरी लावली होती त्यावेळी तिनं मी रणबीरच्या लग्नात त्याची एक्स गर्लफ्रेंड कतरिना कैफच्या गाण्यावर डान्स करेन असं म्हटलं होतं. याशिवाय नुकतंच मुंबईमध्ये पार पडलेल्या मामी फिल्म फेस्टिव्हल आलिया माझी वहिनी झाल्यास मी जगातली सर्वात लकी मुलगी असेन असं म्हटलं होतं. Panipat: अर्जुन कपूरच्या सदाशिवरावांसमोर फिका पडला संजूचा अहमद शाह अब्दाली
करिनाला यावेळी कपूर किंवा खान यापैकी कोणाची निवड करशील असा प्रश्न विचारण्यात आला होता. यावर ती म्हणाली मी कोणा एकाची निवड करु शकत नाही कारण मी दोन्ही आहे आणि मला अभिमान आहे की मी कपूर आणि खान दोन्ही आहे. करिना कपूर लवकरच अक्षय कुमार सोबत ‘गुड न्यूज’ सिनेमात दिसणार आहे. या सिनेमात कियारा आडवाणी आणि दिलजीत दोसांज यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. याशिवाय ती इरफान खानसोबत अंग्रेजी मीडियम या सिनेमात पोलिस ऑफिसरची भूमिका साकारत आहे. पत्नी आणि ‘ती’च्या मध्ये अडकला कार्तिक आर्यन, पाहा हा मजेशीर ट्रेलर ================================================================== VIDEO : अर्जुन कपूर, क्रिती सेन, संजय दत्त शेअर करणार स्क्रिन; ‘पानिपत’मधील कलाकारांचे लुक व्हायरल

)







