प्रियांका चोप्राच्या नवऱ्यासोबत फोटो काढायला धावली पाकिस्तानी अभिनेत्री, पण...

प्रियांका चोप्राच्या नवऱ्यासोबत फोटो काढायला धावली पाकिस्तानी अभिनेत्री, पण...

शांततेशी तुमचा काही संबंध नाही. तू निकला भेटली पण प्रियांकाला नाही... कारण ती एक भारतीय आहे...

  • Share this:

मुंबई, 09 सप्टेंबर- निक जोनस हा अमेरिकेतील केवढा मोठा स्टार आहे याचा अंदाज त्याच्या कॉन्सर्टमध्ये होणाऱ्या गर्दीला पाहून येतो. परदेशात निकसाठी त्याचे चाहते एवढे वेडे आहेत की, त्याच्यासाठी भेटण्यासाठी वाट्टेल ते करायची त्यांची तयारी असते. त्याच्यासोबत सेल्फी काढण्यासाठी फक्त सर्वसामान्य चाहतेच नाही तर नावाजलेले सेलिब्रिटीही रांगेत उभे राहतात. यात नुकतीच पाकिस्तानची अग्रणी अभिनेत्री महविश हयातचं (Mehwish Hayat) नाव जोडलं गेलं आहे. महविश ही निकची केवढी मोठी चाहती आहे हे सांगायला तिला जराही लाज वाटली नाही. विशेष म्हणजे त्याला पाहताच त्याच्याकडे महविश धावत गेली.

महविशने इन्स्टाग्रामवर निकसोबतचा फोटो शेअर केला. या फोटोला कॅप्शन देत तिने लिहिले की, 'बघा मला न्यूयॉर्कमध्ये यूएस ओपन मेन्स सेमी फायनल पाहायला गेले असतो कोण भेटलं.. ती एक गोष्ट ज्यावर आम्ही दोघंही सहमत होतो ती म्हणजे आम्ही दोघं राफेल नादालला सपोर्ट करत होतो.'  यानंतर महविशने पोस्टमध्ये लिहिलं की, जसं तिने निकला तिथे पाहिलं ती धावत त्याला भेटायला पोहोचली. महविशने निकसोबतचा फोटो शेअर केल्यानंतर तिची तुलना प्रियांका चोप्राशी होत आहे.

मेहर नावाच्या एका युझरने लिहिले की, प्रियांकापेक्षा महविश खूप सुंदर दिसते. पण यावेळी प्रियांकाच्या चाहत्यांनीही महशीशच्या या फोटोवर कमेंट केली. अनुमेयने लिहिले की, 'तू प्रियांका चोप्रालाही भेटलीस का... मला वाटतं तू भेटली नसशील.. तुम्हाला कशा पद्धतीचं राजकारण आवडतं. शांततेशी तुमचा काही संबंध नाही. तू निकला भेटली पण प्रियांकाला नाही... कारण ती एक भारतीय आहे... दुट्टपी भूमिका.'

महविश ही तिच अभिनेत्री आहे जिने बॉलिवूडवर प्रश्न उपस्थित केले होते, तिने म्हटलं होतं की, 'आपल्या शेजारील देशात जगातील सर्वात मोठी सिनेसृष्टी आहे. अशावेळी ते त्यांच्याकडे असलेल्या ताकदीचा वापर दोन देशांना जोडण्यासाठी करू शकले असते.. पण ते काय करत आहेत.. तर असंख्य सिनेमे तयार करत आहेत, ज्यात पाकिस्तानला खलनायक दाखवण्यात येत आहे.'

तिने भारतीय सिनेमांमध्ये राष्ट्रवादाच्या मुद्यावर प्रश्न उपस्थित करत म्हटलं की, 'आपला इतिहास, राजकारण, संस्कार या सगळ्याची मला कल्पना आहे. हे सगळं माहीत असताना तटस्थ राहणं कठीण आहे आणि असं करणं देशभक्तीच्या विरोधात असल्याचं वाटू शकतं. पण त्यांना (बॉलिवूड) हे निश्चित करावं लागेल की सर्वात महत्त्वाचं काय आहे. राष्टवाद की शांतीमय भविष्य.'

KBC: अमिताभ बच्चन यांच्यामुळे या अभिनेत्याच्या वडिलांची स्मृती आली परत

'चांद्रयान 2' वर अदनान सामीने घेतली पाकिस्तानची फिरकी, शेअर केला मजेशीर VIDEO

धर्माच्या नावाखाली सिनेमे सोडणाऱ्या झायरा वसीमच्या Beach Look वर संतापले नेटीझन

कॅनडात अक्षय कुमारची आहे चक्क पूर्ण टेकडी, त्याची मालमत्ता वाचून बसेल धक्का

VIDEO: मुंबई-नाशिक महामार्गावर वाहतूक कोंडी; वाहनांच्या लांब रांगा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 9, 2019 05:14 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading