जेव्हा 'हे' स्टार कपल दुष्काळग्रस्त गावातील ढाब्यावर भेळ आणि उसाचा रस पिताना

जेव्हा 'हे' स्टार कपल दुष्काळग्रस्त गावातील ढाब्यावर भेळ आणि उसाचा रस पिताना

महाराष्ट्रातील जवर्दजुन गावात ते दोघं थांबले आणि तिथल्याच एका ढाब्यात जाऊन त्यांनी कागदामध्ये भेळ घेतली आणि उसाचा रस प्यायले.

  • Share this:

मुंबई, 1 मे- सध्या आमिर खान पाणी फाउंडेशनच्या कामात व्यग्र आहेत. आमिर आणि किरण महाराष्ट्रातल्या दुष्काळी भागात जाऊन वॉटर कपच्या कामाची करतोय. बुधवारी त्याने महाराष्ट्र दौऱ्यातील काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले. या फोटोमध्ये तो आणि त्याची पत्नी किरण राव प्रवासात मध्ये थांबून भेळ खाताना आणि उसाचा रस पिताना दिसत आहेत.

'तारक मेहता का उल्टा चश्मा'त नवीन ट्विस्ट, मालिकेत परत येऊ शकते दिशा वकानी

महाराष्ट्रातील जवर्दजुन गावात ते दोघं थांबले आणि तिथल्याच एका ढाब्यात जाऊन त्यांनी कागदामध्ये भेळ घेतली आणि उसाचा रस प्यायले. एवढंच नाही तर त्या दोघांनी डाब्यावर काम करणाऱ्यांसोबत फोटोही काढले. यावेळी आमिरने काळ्या रंगाचं टी-शर्ट आणि डेनिमची जीन्स घातली होती. तर किरण हिरव्या आणि पांढऱ्या कुर्त्यात होती.

'डिजेवाले बाबू'च्या या महागड्या गाडीची चर्चा, बोनेटवर चढून काढलेला फोटो झाला व्हायरल
 

View this post on Instagram
 

At Jawalarjun village yesterday. Stopped for the best ganney-ka-juice on the way there. #mejalmitra @paanifoundation


A post shared by Aamir Khan (@_aamirkhan) on

या फोटोंना कॅप्शन देताना आमिरने लिहिले की, ‘काल जवर्दजुन गावात गेलो होते. यावेळी सर्वोत्कृष्ट उसाचा रस पिण्यासाठी आम्ही थांबलो.’ आमिर आणि किरण तुफान आलंय या हा मराठी टीव्ही शोमध्येही सहभाग घेतात. यात ते दुष्काळाशी निगडीत गोष्टींवर गप्पा मारतात तसेच लोकांना पाण्याबद्दल जागृत करतात. तसेच या शोमध्ये प्रेक्षकही त्यांच्या पाण्याशी निगडीत कथा सांगून इतरांना प्रोत्साहित करतात. नुकतीच या शोमध्ये माधुरी दीक्षितही गेली होती.

'KBC'चं रजिस्ट्रेशन आजपासून सुरू, असं होऊ शकता तुम्हीही सहभागी

आमिरच्या सिनेमांबद्दल बोलायचे झाले तर, गेल्यावर्षी तो ‘ठग्ज ऑफ हिंदोस्थान’मध्ये दिसला होता. या सिनेमात त्याच्यासोबत अमिताभ बच्चन आणि कतरिना कैफ यांच्या मुख्य भूमिका होत्या. ५४ वर्षीय हा अभिनेता लवकरच लाल सिंग चढ्ढामधअये दिसणार आहे. १९९४ मध्ये आलेल्या टॉम हंकटच्या ‘फॉरेस्ट गम्प’ या सिनेमाचा हा अधिकृत रिमेक असणार आहे. आमिरने त्याच्या वाढदिवसाला या सिनोमाची घोषणा केली होती. अद्वेत चंदन या सिनेमाचं दिग्दर्शन करणार असून अद्वेतने याआधी सिक्रेट सुपरस्टार सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे.

बोहल्यावर चढतेय नेहा पेंडसे? अभिजीत खांडकेकरने शेअर केली पोस्ट

VIDEO : जेव्हा अमेरिकन झाले 'आर्ची' आणि 'माऊली', महाराष्ट्र दिनाच्या अशाही शुभेच्छा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 1, 2019 04:57 PM IST

ताज्या बातम्या