मुंबई, 1 मे : डीजे वाले बाबू, कर गई चुल आणि मर्सी सारख्या सुपरहिट गाण्यांचा निर्माता आणि बॉलिवूडमधील प्रसिद्ध रॅप गायक बादशाहला एक नवं यश मिळलं आहे. रॅपर बादशाह आता जगातील सर्वात महागड्या गाड्या बनवणाऱ्या कंपनीचा ग्राहक बनला आहे. बादशाहनं नुकतीच रॉल्स रॉयस कंपनीची 'Wraith' ही कार खरेदी केली असून त्या कारच्या बोनेटवर बसून काढलेला त्याच्या बहिणीचा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
रॉल्स रॉयस कंपनीच्या या कारची किंमत तब्बल 10 कोटी एवढी आहे. बादशाहनं आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून या गाडीचा फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये बादशाहचं संपूर्ण कुटुंब दिसत आसून त्याची बहिण गाडीच्या बोनेटवर बसलेली दिसत आहे. यावर युजर्सच्या मजेशीर प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत. एका युजरनं लिहिलंय, 'लोक मारूति किंवा सेंट्रोच्या बोनेटवर चढू देत नाही आणि बादशाहची बहिण रॉल्स रायसच्या बोनेटवर चढून बसली आहे.' बादशाहनं हा फोटो सोशल मीडियावर शेअर करताना, 'कुटुंबात एका नव्या सदस्याचं आगमान झालं आहे.' असं कॅप्शन दिलं आहे.
33वर्षीय रॅप गायक बादशाहच्या कुटुंबात आई, वडील, बहिण आणि पत्नी आहे. 2017मध्ये बादशाहला कन्यारत्नाचा लाभ झाला. त्यानंतर आलेलं त्याचं प्रत्येक गाणं हिट झालं आहे. आता बादशाहनं बॉलिवूडमध्ये आपलं स्थान पक्कं केलं आहे. एक वेळ अशी होती की, हनी सिंगच्या गाण्याशिवाय कोणताही सिनेमा पूर्ण होत नसे. तशीच काहीशी स्थिती आता बादशाहची आहे. बॉलिवूडमधील कोणत्याही सिनेमात त्याचं एक तरी गाणं असतंच.
बादशाहच्या या गाडीची भारतातील किंमत जवळापास 10 कोटी रुपये एवढी आहे. त्याच्या अगोदर अमिताभ बच्चन आणि संजय दत्त यांच्याकडेच रॉल्स रॉयसच्या गाड्या आहेत. Wraith नावाचं हे मॉडेल हे रॉल्स रॉयसचं सर्वाधिक शक्तीशाली गाड्यांपैकी एक आहे. 4 सेकंदात ही 100 किलोमीटरचा वेग घेऊ शकते. याशिवाय ही गाडी खरेदी केल्यानंतर कंपनी तुम्हाला हवे तसे बदल करून तुम्हाला देते. प्रत्येक गाडीचं इंटिरिअर हे वेगवेगळं असतं.