बोहल्यावर चढतेय नेहा पेंडसे? अभिजीत खांडकेकरने शेअर केली पोस्ट

बोहल्यावर चढतेय नेहा पेंडसे? अभिजीत खांडकेकरने शेअर केली पोस्ट

या फोटोला कॅप्शन देताना अभिजीतने फक्त ‘अभिनंदन’ असं लिहिलं आहे. विशेष म्हणजे श्रुती आणि हेमांगीनेही हाच फोटो त्यांच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला असून त्यांनीही फक्त ‘अभिनंदन’ असंच लिहिलं आहे.

  • Share this:

मुंबई, 1 मे- मराठी सिने आणि टीव्ही अभिनेत्री नेहा पेंडसेला महाराष्ट्रात कोणी ओळखत नाही असं तर होऊ शकत नाही. फक्त महाराष्ट्रातच नाही तर देशभरात नेहाचे प्रचंड चाहते आहेत. नेहाही आपल्या चाहत्यांसोबत सोशल मीडियामार्फत जोडलेली असते. तिच्या प्रत्येक घडामोडीची माहिती ती चाहत्यांना सोशल मीडियावरच्या पोस्टने देत असते. पण सध्या नेहाचा जवळच्या मित्र- मैत्रिणींसोबतचा असा एक फोटो व्हायरल होत आहे, जो पाहून अनेकांच्या मनात प्रश्न उपस्थित झाले आहेत.

'KBC'चं रजिस्ट्रेशन आजपासून सुरू, असं होऊ शकता तुम्हीही सहभागी

अभिनेता अभिजीत खांडकेकरने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर नेहासोबतचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये ती तोंडावर बोट ठेवून उभी असलेली दिसत आहे. तर अभिनेत्री श्रुती मराठे, हेमांगी कवी तिला मिठी मारून उभ्या असलेल्या दिसत आहेत. या फोटोमध्ये प्रत्येकजण आनंदी असून नेहा काही तरी लपवत आहे असेच दिसते.

 

View this post on Instagram

 

Congratulations #buddies #sareelove #marathi

A post shared by Abhijeet Khandkekar (@abhijeetkhandkekar) on

महाराष्ट्र दिनानिमित्त उर्मिला मातोंडकरनं शेअर केले 'हे' फोटो

या फोटोला कॅप्शन देताना अभिजीतने फक्त ‘अभिनंदन’ असं लिहिलं आहे. विशेष म्हणजे श्रुती आणि हेमांगीनेही हाच फोटो त्यांच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला असून त्यांनीही फक्त ‘अभिनंदन’ असंच लिहिलं आहे. हा फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून नेहा लग्न तर करत नाही ना असाच प्रश्न आता तिचे चाहते विचारत आहेत. तर काहींनी ती मराठी बिग बॉसमध्ये दिसेल असा अंदाज वर्तवला आहे.

MaharashtraDay : 'भाडिपा'चं 'जय महाराष्ट्र' गाणं सोशल मीडियावर ट्रेंडिंग

दरम्यान, नेहाने या सर्व चर्चांना पुर्णविराम देत स्पष्टीकरण दिलं आहे. इंडिया फोरमला दिलेल्या मुलाखतीत नेहा म्हणाली की, ‘मी लग्न करत नाहीये तसंच माझा साखरपुडाही झालेला नाही. तसेच मी बिग बॉस मराठीमध्येही सहभागी होत नाहीये. ते माझे बेस्ट फ्रेंड असून अनेक दिवसांपासून आम्ही काही गोष्टी ठरवत होतो. नुकतीच ती गोष्ट पूर्ण झाली तर आम्ही त्याचा आनंद साजरा केला.’

Birthday Special: लिप सर्जरीमुळे ट्रोल झाली होती अनुष्का शर्मा, नेटीझन्स म्हणाले...

नेहाच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर, तिने मराठी सिनेमांसोबतच अनेक तमिळ, तेलगु आणि मल्याळम सिनेमांत काम केलं आहे. तसेच ‘प्यार कोई खेल नहीं,’ ‘दाग- द फायर,’ ‘दीवाने’ यांसारख्या बॉलिवूडपटातही काम केलं आहे. कॅप्टन हाऊसमधून तिने बालकलाकार म्हणून आपल्या करिअरला सुरुवात केली. ‘हसरतीन’, ‘पडोसन,’ ‘मीठी मीठी बातें’, ‘मे आय कम इन मॅडम’सारख्या हिंदी मालिकांमध्येही तिने काम केलं. ‘बिग बॉस’ हिंदीमध्येही ती दिसली होती.

VIDEO : जेव्हा अमेरिकन झाले 'आर्ची' आणि 'माऊली', महाराष्ट्र दिनाच्या अशाही शुभेच्छा

First published: May 1, 2019, 3:51 PM IST

ताज्या बातम्या