मुंबई, 1 मे : सब टीव्ही विनोदी मालिका ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ मागच्या काही काळापासून दयाबेनमुळे चर्चेत आहे. मालिकेचे निर्माते नव्या दयाबेनच्या शोधात आहेत पण अद्याप त्यावर निर्णय झालेला नाही. मागच्या अनेक वर्षांपासून दयाबेनची भूमिका साकारत आहे. त्यामुळे तिच्या जागेवर दुसऱ्या अभिनेत्रीची निवड करणं निर्मात्यांना अवघड जात आहे. अशातच आता नव्या दयाबेनचा शोध सुरू असला तरीही दिशा वकानी पुन्हा या मालिकेत परत येऊ शकते अशी माहिती समोर आली आहे. ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’चे निर्माते असित मोदी यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितलं, ‘नव्या दयाबेनचा शोधण्यासाठी आम्ही ऑनलाइन वोटिंग करु शकतो. आमच्यासाठी आताही सर्व रास्ते मोकळे आहेत. कदाचित दिशा वकानी या मालिकेत परत येऊही शकते. अनेक अभिनेत्री दयाबेनची भूमिका साकारण्यासाठी आमच्याशी संपर्क करत आहेत. तसेच आम्ही सुद्धा अनेक कलाकारांच्या संपर्कात आहोत. दया भाभी मालिकेत परत यावी अशी सर्वांची इच्छा आहे. आम्ही यावर लवकरच योग्य निर्णय घेऊ.’ ‘डिजेवाले बाबू’च्या या महागड्या गाडीची चर्चा, बोनेटवर चढून काढलेला फोटो झाला व्हायरल
मागच्या काही दिवसांपासून अशी चर्चा आहे की, टीव्ही अभिनेत्री अमी त्रिवेदीला दयाबेनच्या भूमिकेसाठी निवडण्यात आलं आहे. मात्र आता असित मोदींनी आम्ही अद्याप या भूमिकेसाठी कोणाचीही निवड केलेली नाही. आताही आम्ही या भूमिकेसाठी योग्य अभिनेत्रीच्या शोधात आहोत असं सांगितलं आहे. बोहल्यावर चढतेय नेहा पेंडसे? अभिजीत खांडकेकरने शेअर केली पोस्ट ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’मध्ये दयाबेनची भूमिका साकारणारी दिशा वकानी सप्टेंबर2017 पासून मालिकेत दिसलेली नाही. मॅटर्निटी लीव्हवर असलेली दिशा अद्याप मालिकेत परतलेली नाही. अनेकदा ती मालिकेत परत येणार असल्याच सांगण्यात आलं मात्र असं झालं झालं नाही. मानधनाच्या मुद्द्यावरून दिशानं या मालिकेत न परतण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे निर्माते नव्या दयाबेनच्या शोधात आहेत. मात्र असित मोदीच्या आताच्या वक्तव्यावरून अजूनही दिशा वकानीची मालिकेत परतण्याची शक्यता बाकी आहे, असं म्हटलं जात आहे. VIDEO- सलमान म्हणतो, ‘और हमे हमारी सायरा बानो मिल गयी’