'KBC'चं रजिस्ट्रेशन आजपासून सुरू, असं होऊ शकता तुम्हीही सहभागी

'KBC'चं रजिस्ट्रेशन आजपासून सुरू, असं होऊ शकता तुम्हीही सहभागी

या शोचा नवा प्रोमो रिलीज झाला असून यातून बिग बी अमिताभ बच्चन स्पर्धकांना त्यांचं नशीब आजमावून पाहण्यासाठी प्रोत्साहित करताना दिसत आहेत.

  • Share this:

मुंबई, 1 मे : सोनी टीव्हीवरील अमिताभ बच्चन यांचा सुपरहिट शो 'कौन बनेगा करोडपती' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या शोचं रजिस्ट्रेशन आज (1 मे) पासून सुरू झालं आहे. 2000मध्ये सुरू झालेला हा शो प्रत्येक वेळी प्रेक्षकांसाठी काही ना काही नवं घेऊन येत असतो. यावर्षीही या शोबाबत प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. यावेळी हा शो 'अगर कोशिश रखोगे जारी, तो केबीसी हॉट सीट पर बैठने की इस बार आपकी होगी बारी' अशा मजेशीर टॅगलाइनसोबत प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

या शोचा नवा प्रोमो रिलीज झाला असून यातून बिग बी अमिताभ बच्चन स्पर्धकांना त्यांचं नशीब आजमावून पाहण्यासाठी प्रोत्साहीत करताना दिसत आहेत. 'केबीसी'चं रजिस्ट्रेशन आज (1 मे) रात्री 9 वाजता सुरू होणार आहे. या पूर्ण आठवड्यात अमिताभ बच्चन यांचे काही प्रश्न तुम्हाला टीव्हीवर दाखवले जाणार आहेत. प्रेक्षक SonyLiv या वेबसाइटवरुनही केबीसीचा रजिस्ट्रेशन फॉर्म भरु शकतात. याशिवाय IVR आणि SMS द्वारेही तुम्ही याचं ऑफलाइन रजिस्ट्रेशन करू शकता.

VIDEO: दीपिका पदुकोणचा 'बास्केटबॉल' मीडियावर व्हायरल; 'अशी' होती रणवीरची प्रतिक्रिया

एक महिन्यापूर्वी अमिताभ बच्चन यांनी एक ब्लॉग लिहिला होता. या ब्लॉगमध्ये त्यांनी 'केबीसी'ची तयारी सुरू असल्याची माहिती दिली होती. त्यांनी लिहिलं होतं, 'नव्या गोष्टी शिकत आहे, रिहर्सल करत आहे. नव्या वर्षी नव्या सीझनची सुरुवात करत आहे.' बिग बी अमिताभ बच्चन मागच्या 17 वर्षांपासून या शोसोबत जोडलेले आहेत.

Birthday Special: लिप सर्जरीमुळे ट्रोल झाली होती अनुष्का शर्मा, नेटीझन्स म्हणाले...

First published: May 1, 2019, 1:36 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading