मुंबई, 27 नोव्हेंबर : नोरा फतेही बॉलिवूडमधील सुंदर अभिनेत्री आणि नृत्यांगणांपैकी एक आहे. आपल्या डान्स आणि सौंदर्याच्या जोरावर अभिनेत्री नोरा फतेहीने बॉलिवूडमध्ये आपलं एक खास स्थान बनवलं आहे. नोरा अनेक चित्रपटांमध्ये आयटम सॉंग करताना दिसून येते. आपल्या प्रत्येक डान्स मूव्ह्सने नोराने लोकांना अक्षरशः वेड लावलं आहे. आज आयटम सॉंगसाठी नोरा निर्मात्यांची पहिली पसंती बनली आहे. तसेच नोरा सध्या रिऍलिटी शोचं परीक्षणसुद्धा करते. नोराच्या व्यावसायिक आयुष्याबाबत सर्वच लोक जाणतात. पण नोराच्या व्यक्तिगत आयुष्याविषयी फार कमी लोकांना माहिती आहे. नोरा एकेकाळी एका प्रसिद्ध अभिनेत्याच्या प्रेमात होती. पण काही काळातच त्यांचं नातं तुटलं. ही गोष्ट खुद्द अभिनेत्रीनेच सांगितली आहे. ज्याचा एक व्हिडिओ एका फॅन पेजवरून शेअर करण्यात आला आहे.
नोरा फतेही सध्या 'झलक दिखला जा सीझन 10' हा डान्स रिअॅलिटी शो होस्ट करत आहे. हा शो आता अंतिम टप्प्यात आला आहे. लवकरच या शोचा महाअंतिम सोहळा पार पडणार आहे. रुबिना दिलीक, निशांत भट्ट, गुंजन सिन्हा, फैसल शेख, सृती झा आणि गश्मीर महाजनी या टॉप 6 स्पर्धकांनी त्यांचे शेवटचे परफॉर्मन्स दिले आहेत. या शो मध्ये नुकतंच सृती झा आणि तिचे कोरिओग्राफर विवेक चाचेरे यांनी नोराच्या 'बडा पछताओगे' या गाण्यावर परफॉर्म केले. हा परफॉर्मन्स पाहून नोरा इतकी भावूक झाली की तिने तिच्या आयुष्यातील तो भाग शेअर केला जो आजपर्यंत कधीही ऐकला नव्हता.
सृती झाचा डान्स पाहिल्यानंतर सर्वांनी तिची स्तुती केली आणि यादरम्यान जेव्हा नोरायाविषयी प्रतिक्रिया विचारली तेव्हा ती भावूक झाली. सृतीच्या नृत्याचे कौतुक करण्यासोबतच नोरा म्हणाली की, 'जेव्हा गाणे शूट झाले होते तेव्हा त्यावेळी माझी मानसिकता ठीक नव्हती, माझे वैयक्तिक नुकसान होत होते आणि शूटिंगदरम्यान या गाण्याशी भावनिकरित्या बांधले गेले होते. माझ्या सगळ्या भावना मी सेटवर माझ्याबरोबर आणायचे.'' अशा भावना व्यक्त करत तिच्या डोळ्यात अश्रू दिसले. ‘बडा पछताओगे’ हे गाणे प्रेमाभंगावर आधारित आहे. आणि त्याचमुळे नोरा त्या गाण्याशी भावनिक रित्या जोडली गेली होती.
View this post on Instagram
नोरा फतेहीच्या लव्हलाईफबाबत फारच कमी लोकांना माहिती असेल. किंवा अनेकांना काहीच माहिती नसेल. नोरा फतेही अभिनेता अंगद बेदीसोबत रिलेशनशिपमध्ये होती. परंतु काही काळानंतर या दोघांचा ब्रेकअप झाला होता. एका मुलाखतीदरम्यान नोराने उघड केलं होतं की, हा काळ तिच्यासाठी फारच कठीण होता.
इतकंच नव्हे तर ब्रेकअपनंतर नोरा डिप्रेशनमध्ये गेली होती. ती तब्बल दोन महिने या आजाराशी झुंज देत होती. तर अंगद बेदीने अभिनेत्री नेहा धुपियासोबत लग्न केलं आहे. त्यांना दोन अपत्येदेखील आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.