'एक तो कम जिंदगानी' गाण्याच्यावेळी नोरा फतेहीचा झाला अपघात, समोर आला फर्स्ट एडचा VIDEO

'एक तो कम जिंदगानी' गाण्याच्यावेळी नोरा फतेहीचा झाला अपघात, समोर आला फर्स्ट एडचा VIDEO

हे वर्ष नोरासाठी फार खास आहे. कारण या वर्षी प्ले लिस्टमधील टॉप ट्रेडिंगमध्ये असलेली बहुतांशी गाण्यात नोरा होती.

  • Share this:

मुंबई, 14 नोव्हेंबर- अभिनेत्री आणि डान्सर नोरा फतेहीच्या ‘मरजावां’ सिनेमातील ‘एक तो कम जिंदगानी’ गाण्याची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. आतापर्यंत 3 लाखांहून अधिक लोकांनी हे गाणं पाहिलं आहे. रिपोर्टनुसार, चित्रीकरणादरम्यान, नोराच्या गुडघ्यांना मार लागली होती. त्यामुळे गाण्याच्या चित्रीकरणालाही उशीर झाला होता.

एका वर्षात आली अनेक गाणी- हे वर्ष नोरासाठी फार खास आहे. कारण या वर्षी प्ले लिस्टमधील टॉप ट्रेडिंगमध्ये असलेली बहुतांशी गाण्यात नोरा होती. ‘एक तो कम जिंदगानी’ गाण्याशिवाय ‘बाटला हाउस’मधील तिचं साकी- साकी हे गाणंही गाजलं होतं. याशिवाय विकी कौशलसोबत ‘बडा पछताओगे’ गाणंही ट्रेण्डमध्ये होतं.

गाण्याच्या रॅप- अपचा व्हिडीओ आला समोर- एण्टरटेनमेन्ट वेबसाइट पिंकविलाने यासंबंधी एक व्हिडीओ शेअर केला. हे गाणं सिद्धार्थ मल्होत्रासोबत चित्रीत करण्यात आलं आहे. चित्रीकरणादरम्यान नोराला जेव्हा दुखापत झाली होती तेव्हा तिला असह्य वेदना होत होत्या. व्हिडीओत नोरा तिच्या जखमेवर औषध लावताना दिसत आहे.

मरजावां सिनेमाशिवाय नोरा रेमो डिसूजा दिग्दर्शित स्ट्रीट डान्सर 3डी मधील एका गाण्यात दिसणार आहे. या सिनेमात वरुण धवन आणि श्रद्धा कपूर यांच्या मुख्य भूमिका आहेत. नुकताच नोराने तिच्या सिनेमातील चित्रीकरणाचा एक व्हिडीओ शेअर केला. यात ती सिनेमाच्या संपूर्ण टीमसोबत मजा- मस्ती करताना दिसत आहे. पुढच्या वर्षी जानेवारी महिन्यात हा सिनेमा प्रदर्शित करण्यात येईल.

#sairatmetshadak- रिंकू-जान्हवीचा एकत्र फोटो पाहून चाहते झाले झिंगाट!

83 Film- दररोज 12 ओव्हर बॉलिंग, 200 बॉल बॅटिंग करून रणवीर सिंग असा झाला कपिल देव

‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ मालिकेच्या सेटवर रंगला क्रिकेटचा सामना, पाहा PHOTOS

मामा-भाच्यांचे असेही वैर; गोविंदामुळे कृष्णाने सोडला कपिल शर्माचा शो

लग्नापूर्वी दीपिका पदुकोणला अशा नजरेने पाहायचा रणवीर सिंग, शेअर केला PHOTOS

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 14, 2019 02:14 PM IST

ताज्या बातम्या