मुंबई, 14 ऑक्टोबर- स्टार प्रवाहवरील ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ या मालिकेतून बाबासाहेबांच्या आयुष्यातील सुख- दु:खाचे प्रसंग जवळून अनुभवण्याची संधी प्रेक्षकांना मिळत आहे. बाबासाहेबांची शिक्षणाची आवड आणि शिक्षण मिळवण्यासाठीची त्यांची तळमळ आपण मालिकेत पाहातच आहोत. शिक्षणासोबतच क्रिकेट खेळणं हाही बाबासाहेबांचा आवडता छंद होता. छोट्या भीवाच्या रुपात मालिकेतील काही भागांमध्ये प्रेक्षकांनी ते अनुभवलंही. लहानग्या मंडळींना एकत्र करून चिमुकला भीवा तासनतास क्रिकेटच्या खेळात रमताना अनेकांनी पाहिलं. परदेशातून उच्च शिक्षण घेऊन परतल्यानंतर बाबासाहेबांना बालपणीच्या दिवसांची पुन्हा एकदा आठवण झाली आणि त्यांनी बॅट हातात घेतली. नुकताच हा प्रसंग चित्रित करण्यात आला. विशेष म्हणजे मालिकेत क्रिकेट खेळतानाचा हा प्रसंग चित्रित होत असताना खरोखरचा क्रिकेटचा सामना खेळण्यात आला. बाबासाहेबांची भूमिका साकारणाऱ्या सागर देशमुखलाही क्रिकेटची खूप आवड आहे. शूटिंगच्या निमित्ताने आवडही जपता येत असल्याचा आनंद सागरने यावेळी व्यक्त केला. या अनोख्या अनुभवाविषयी सांगताना सागर म्हणाला की, ‘मी कटारिया हायस्कूल पुणे या शाळेचा विद्यार्थी. आमच्या शाळेत क्रिकेटची टीम खूप तगडी होती आणि लहानपणापासून मला क्रिकेट खेळायला खूप आवडायचं. शाळेच्या टीमकडून खेळायची कधी फारशी संधी मिळाली नाही.’
‘मग महाराणा प्रताप संघ, इंगळेज क्रिकेट क्लब या संघांकडून मी खेळलो. पुण्याच्या मराठवाडा मित्रमंडळ या कॉलेजमध्ये मी 11 वी आणि 12 वीचं शिक्षण घेतलं तेव्हाही त्या संघाकडून खेळलो. पुण्याच्या एस.पी. कॉलेज, फर्ग्युसन कॉलेज, आय.एल्.एस. लॉ कॉलेज या महाविद्यालयांच्या मैदानावर न जाणो कित्येक सामने मी खेळलो आहे.’
‘आज मालिकेत जेव्हा बाबासाहेब क्रिकेट खेळत असतानाचा प्रसंग आम्ही शूट करत होतो तेव्हा खरोखरचा सामना रंगला. बाबासाहेबांच्या नावाचा जयघोष, टाळ्या, धावा काढणं असे जोशपूर्ण वातावरण सेटवर होते. सीन शूट झाल्यावर पुन्हा एकदा या थोर महामानवाच्या कलागुणांचा विचार करून थक्क व्हायला झाले!’
83 Film- दररोज 12 ओव्हर बॉलिंग, 200 बॉल बॅटिंग करून रणवीर सिंग असा झाला कपिल देव
रानू मंडलचा नवरात्रीत डान्स? फक्त 8 सेकंदाच्या VIDEO ने घातलाय धुमाकूळ
लग्नात पतीकडून मिळाला धोका, अभिनेत्रीनं थेट पीएम मोदींकडे केली मदतीची याचना