मुंबई, 14 ऑक्टोबर- विनोदवीर कृष्णा अभिषेकला कपिल शर्माच्या द कपिल शर्मा शोमध्ये सपना या व्यक्तिरेखेत दिसतो. त्याची ही व्यक्तिरेखा लोकांमध्ये भलतीच प्रसिद्ध आहे. कपिलच्या या शोमध्ये कीकू शारदाची बच्चा यादव आणि कृष्णाची सपना ही व्यक्तिरेखा प्रसिद्ध आहे. त्यामुळे जवळपास सर्वच भागात या दोघांचा एखादा अॅक्ट तरी प्रेक्षकांना पाहायला मिळतोच. कृष्णा सपनाची व्यक्तिरेखा साकारू दे किंवा इतर कोणतीही पण त्याच्या डान्सपासून ते कॉमेडीपर्यंत मामा गोविंदाची झलक पाहायला मिळते.
अनेकदा आपल्या विनोदांमध्येही कृष्णा मामाचा उल्लेख करताना दिसतो. पण रविवारी कपिलच्या शोमध्ये गोविंदा पत्नी सुनीता आणि मुलगी टीना आहूजासोबत आला होता. पण नेमकी याच एपिसोडला कृष्णाने दूर राहणं पसंत केलं. रविवारच्या एपिसोडमध्ये गोविंदा मुलगी टीनाचं पहिलं गाणं प्रमोट करायला आला होता. टीनाचं हे गाणं ‘इसमें तेरा घाटा’ फेम सिंगर गजेंद्रसोबत आहे. या गाण्याला इंटरनेटवर अनेकांनी पाहिलंही. पण मामा- मामीसोबत असलेल्या भांडणामुळे कृष्णाने या एपिसोडमध्ये काम न करण्याचा निर्णय घेतला. पण शोच्या सुरुवातीच्या भागात जेव्हा कॉमेडीचा तडका दाखवण्यात आला होता त्यात कृष्णा सपनाच्या भूमिकेत दिसला. पण जेव्हा गोविंदा कुटूंबासोबत आला तेव्हा कृष्णाने सेटवरून काढता पाय घेतला.
आपल्या स्टारडमवरून विनोद करताना कृष्णा चीची मामा अर्थात गोविंदाचा उल्लेख आवर्जुन करतो. पण असं असलं तरी मामा- मामी आणि कृष्णाच्या नात्यात साधा विस्तवही जात नाही. कृष्णा आणि त्याची पत्नी कश्मीराच्या मते, गोविंदाचं संपूर्ण कुटूंब पत्नी सुनीताच्या सांगण्यावरच चालतं. एका मुलाखतीत कश्मीरा शाह म्हणाली होती की, माझ्या जुळ्या मुलांना ते अजून भेटले नाहीत आणि मला वाटतही नाही की भविष्यात त्यांना कळेल की त्या कुटूंबाशी त्यांचं कोणतं नातं होतं. 83 Film- दररोज 12 ओव्हर बॉलिंग, 200 बॉल बॅटिंग करून रणवीर सिंग असा झाला कपिल देव ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ मालिकेच्या सेटवर रंगला क्रिकेटचा सामना, पाहा PHOTOS