Home /News /entertainment /

सलमान किंवा रणवीर नाही, तर ‘हा’ अभिनेता दिसणार ‘धूम 4’मध्ये

सलमान किंवा रणवीर नाही, तर ‘हा’ अभिनेता दिसणार ‘धूम 4’मध्ये

स्टाइलिश पद्धतीने चोरीच्या घटना दाखवणारी धूम चित्रपटांची सिरीज आता कोणत्या अभिनेत्याला घेऊन भेटीला येणार, असा प्रश्न गेल्या अनेक दिवसांपासून प्रेक्षकांना पडला होता. याआधी धूमच्या 3 सिनेमांमध्ये जॉन अब्राहम, हृतिक रोशन आणि आमिर खानने काम केलं आहे. धूम 4 मध्ये कोण असणार याची चर्चा खूप दिवसांपासून सुरू आहे

पुढे वाचा ...
     मुंबई, 4 फेब्रुवारी : स्टाइलिश पद्धतीने चोरीच्या घटना दाखवणारी धूम चित्रपटांची सिरीज आता कोणत्या अभिनेत्याला घेऊन भेटीला येणार, असा प्रश्न गेल्या अनेक दिवसांपासून प्रेक्षकांना पडला होता. याबाबत एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. याआधी धूमच्या 3 सिनेमांमध्ये जॉन अब्राहम, हृतिक रोशन आणि आमिर खानने काम केलं आहे. धूम 4 मध्ये कोण असणार याची चर्चा खूप दिवसांपासून सुरू आहे. ही भूमिका रणवीर सिंगकडे जाणार अशी जोरदार चर्चा 2018 मध्ये फिल्म इंडस्ट्रीमध्ये रंगली होती. सलमान खान आणि शाहरुख खान यांच्या नावं देखील चित्रपटासाठी पुढे आली होती. या सगळ्यांना मागे टाकत ‘खिलाडी कुमार’ Dhoom 4 मध्ये दिसणार आहे. अक्षय कुमारची या चित्रपटामध्ये वर्णी लागल्याची माहिती समोर येत आहे. बॉलिवूड अ‍ॅनालिस्ट अतुल मोहन यांनी याबाबत ट्विट केलं आहे. ‘खात्रीशीर सूत्रांच्या माहितीनुसार धूम 4 साठी अक्षय कुमारचं नाव नक्की झालं आहे. याबाबतच्या अधिकृत घोषणेसाठी थोडी वाट पाहूयात.’ त्यांच्या या ट्विटनंतर अक्षय कुमारच्या फॅन्समध्ये उत्साहाचं वातावरण आहे. सूत्रांच्या माहितीनुसार या चित्रपटात मिस वर्ल्ड मनुषी चिल्लर देखील दिसणार आहे. तर धूम तीनही सिरीजमध्ये महत्त्वाची भूमिका केलेले अभिषेक बच्चन आणि उदय चोप्रा कदाचित या धूम 4 मध्ये दिसणार नाहीत. ‘धूम 4’ मध्ये ‘Villain’च्या भूमिकेसाठी वर्णी लागलेल्या अक्षय कुमारचे यावर्षी अनेक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. यामध्ये ‘लक्ष्मी बॉम्ब’, ‘पृथ्वी राज’, ‘बच्चन पांडे’, ‘सुर्यवंशी’ अशी मोठी लिस्ट आहे. त्यामुळे अक्षय कुमार बॉक्स ऑफिसवर मोठा गल्ला कमावणार हे निश्चित आहे. ‘खिलाडी कुमार’ विविध विषयांचे चित्रपट घेऊन येत असल्यामुळे त्याच्या फॅन्ससाठी मोठी पर्वणी असणार आहे. अन्य बातम्या अरेरे! कतरिनाचे हाल-बेहाल, अक्षयने Tweet केलेला झाडू मारतानाचा Video एकदा पाहाच नुसरत भरुचाचा रेड कार्पेटवर Bold अंदाज, हाय स्लिट ड्रेसची सोशल मीडियावर खिल्ली! VIDEO VIRAL: राखी सावंतने NASAवरून मागवली औषध, चीनला जाऊन करणार कोरोनाचा खात्मा
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    पुढील बातम्या