राखी सावंतने फ्लाइटमधील एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये ती कोरोना व्हायरसचा उल्लेख करीत आहे. लोक या व्हायरसमुळे त्रस्त आहेत. हा व्हायरस संपविण्यासाठी मी चीनला जात असल्याचे राखी म्हणत आहे. इतकचं नाही तर चीनमधील कोरोना व्हायरसचा खात्मा करण्यासाठी तिने नासाहून औषधं आणल्याचा दावा केला आहे. आता ही औषधं ती चीनला घेऊन जात आहे. या व्हिडिओमध्ये तिने लाल रंगाचा ड्रेस घातला आहे. आणि गळ्यात मंगळसूत्रदेखील घातलं आहे. काही दिवसांपूर्वी राखी सांवतच्या लग्नावरुन तिने मोठा खुलासा केला होता. फ्लाइटमधील या व्हिडिओमध्ये ती चीनमध्ये कोरोना व्हायरस विरोधात लढण्यासाठी जात असल्याचे म्हटले आहे. या व्हिडिओमध्ये तिने मोदींजींनाही आवाहन केलं आहे.View this post on Instagram
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: China, Coronavirus, Rakhi sawant