अरेरे! कतरिनाचे हाल-बेहाल, अक्षयने Tweet केलेला झाडू मारतानाचा Video एकदा पाहाच

अरेरे! कतरिनाचे हाल-बेहाल, अक्षयने Tweet केलेला झाडू मारतानाचा Video एकदा पाहाच

रोहित शेट्टी दिग्दर्शित ‘सुर्यवंशी’ हा सिनेमा 27 मार्चला प्रदर्शित होणार आहे. याच सिनेमाच्या शूटिंगदरम्यानचा एक व्हीडिओ अक्षय कुमारने Tweet केला आहे. कतरिना कैफला ट्रोल करणारा हा व्हिडीओ आहे. पाहा नेमकं कसं अक्षयने कतरिनाला ट्रोल केलं आहे

  • Share this:

मुंबई, 3 फेब्रुवारी : अक्षय कुमार आणि कतरिना कैफ यांनी अनेक हिट चित्रपट दिले आहेत. या दोघांची जोडी प्रेक्षकांना नेहमीच पसंतीस उतरली आहे. ऑफस्क्रीन मात्र अक्षय कतरिनाला त्रास देताना दिसतो. आताही अक्षयने तसाच काहीसा प्रकार केला आहे. सध्या दोघेही ‘सूर्यवंशी’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहेत. रोहित शेट्टी दिग्दर्शित ‘सूर्यवंशी’ हा सिनेमा 27 मार्चला प्रदर्शित होणार आहे. याच सिनेमाच्या शूटिंगदरम्यानचा एक व्हीडिओ अक्षय कुमारने Tweet केला आहे. यामध्ये चक्क कतरिना कैफ सेटवर झाडू मारताना दिसत आहे. त्यामुळे नक्कीच कतरिनाच्या फॅन्सनी तोंडात बोटं घातली असणार.

सिंघम, सिंबानंतर आता ‘सूर्यवंशी’ हा रोहित शेट्टीचा कॉप युनिव्हर्समधील (Cop Universe) सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाच्या सेटवर Behind The Scene सुरू असलेली मजा अक्षयने आपल्या ट्विटरवरून शेअर केली आहे. यामध्ये कतरिनाचा नवा अंदाज तिच्या फॅन्सना बघायला मिळाला. ‘सूर्यवंशीच्या सेटवर स्वच्छ भारत अभियानासाठी नवीन ब्रँड अ‍ॅम्बसिडर मिळाला’ असं कॅप्शन देत अक्षयने गा व्हिडीओ शेअर केला आहे.

या व्हिडीओमुळे कतरिनाला काहींनी ट्रोल केलं आहे तर काहींनी तिचं कौतुक केलं आहे. या व्हिडीओवर कुणी ‘झाडूवाली बाई’ अशी कंमेट केली आहे तर कुणी स्वच्छतेसाठी प्रोत्साहित केल्याचं सांगत कतरिनाचे आभार मानले आहेत.

‘सूर्यवंशी’ या सिनेमामध्ये अक्षय कुमारसोबत सिंघम, सिंबा म्हणजेच अजय देवगण आणि रणवीर सिंग देखील दिसणार आहेत. रोहित शेट्टीसोबत अक्षय कुमार पहिल्यांदाच काम करणार आहे.

अन्य बातम्या

नक्कीच रितेशची खैर नाही, लग्नाच्या वाढदिवशी VIDEO शेअर करून बायकोशी घेतला पंगा

बॉलिवूडमध्ये येण्याआधी सोनाक्षी सिन्हा 'या' कामातून कमावायची पैसे!

नेहा-आदित्य गोव्यात करणार डेस्टिनेशन वेडिंग? बीचवरील PHOTO VIRAL

First published: February 3, 2020, 7:44 PM IST

ताज्या बातम्या