Home /News /entertainment /

अरे बाप रे! कात्री जास्तच चालवली वाटतं... ड्रीमगर्ल नुसरत भरुचाच्या हाय स्लिट ड्रेसची सोशल मीडियावर खिल्ली!

अरे बाप रे! कात्री जास्तच चालवली वाटतं... ड्रीमगर्ल नुसरत भरुचाच्या हाय स्लिट ड्रेसची सोशल मीडियावर खिल्ली!

रेड कार्पेटवरील अनेक कलाकाराचे लूक नेहमीच चर्चेत येतात. नुसरत भरुचा देखील आपल्या रेड कार्पेट लूक, पार्टी लूक किंवा अगदी बीच लूकसाठी फेमस आहे. नुकत्याच मुंबईत पार पडलेल्या 65व्या Amazon Filmfare Award Curtain Raiser या इव्हेंटदरम्यान नुसरत भरुचा सुपरहॉट अंदाजात दिसली.

पुढे वाचा ...
  मुंबई, 4 फेब्रुवारी : रेड कार्पेटवरील अनेक कलाकाराचे लूक नेहमीच चर्चेत येतात. नुसरत भरुचा देखील आपल्या रेड कार्पेट लूक, पार्टी लूक किंवा अगदी बीच लूकसाठी फेमस आहे. नुकत्याच मुंबईत पार पडलेल्या 65व्या Amazon Filmfare Award Curtain Raiser या इव्हेंटदरम्यान नुसरत भरुचा सुपरहॉट अंदाजात दिसली. ‘प्यार का पंचनामा’, ‘सोनू के टीटू की स्वीटी’ आणि ‘ड्रीमगर्ल’ फेम नुसरत एकदम हटके अंदाजात रेड कार्पेटवर वावरताना दिसली. रेड कार्पेटवर नुसरत भरुचाने परिधान केलेला हिरव्या रंगाचा ड्रेस सर्वांचं लक्ष वेधून घेणारा होता. सोशल मीडियावर नेहमीच बोल्ड फोटो अपलोड करणारी नुसरत या Curtain Raiser Event साठी सुद्धा बोल्ड आणि ग्लॅमरस अंदाजात दिसली. तिच्या या ड्रेसमुळे अनेकांच्या भुवया मात्र उंचावल्या नुसरतने परिधान केलेल्या हिरव्या रंगाचा वन शोल्डर ड्रेस अत्यंत आकर्षक होता. अपर वेस्ट लाईनपर्यंत येणाऱ्या साईड स्लीटमुळे हा ड्रेस आणखी ‘हॉट ग्नीन’ दिसत होता. स्लीट पार्ट्सना जोडण्यासाठी 2 छोट्या ब्राउन बेल्टचा वापर केलेला होता. या साईड स्लीटमुळे नुसरत तिच्या पायावरील टॅटू मोठ्या दिमाखात फ्लाँट करत होती. यावेळी नुसरतने फ्लॉरल स्टाईलमध्ये इअर कफ्स आणि ब्रेसलेट घातलं होतं. तिने घातलेल्या ‘हाय हिल्स’ देखील खुलून दिसत होत्या Amazon Filmfare Award Curtain Raiser Event मध्ये सगळ्यांचे लूक ग्लॅमरस होते. मात्र नुसरत भरुचाचा लूक विशेष चर्चेत राहिला. नुसरतने इन्साटग्रामवर देखील ‘Bringing Sexy Back’ असं कॅप्शन देत हा फोटो शेअर केला आहे.
  इन्साग्रामवर तिने केलेल्या पोस्टवर अनेकांनी नुसरतचं कौतुक केलं आहे, तर काहींनी तिला खूप ट्रोल केलं आहे. सोनाली सेहगल या अभिनेत्रीने ‘Uffff u did it girl!!’ अशी कमेंट केली आहे. ‘ड्रीमगर्ल’ सिनेमातील नुसरतचा को-स्टार आयुष्मान खुरानाच्या पत्नीने देखील कमेंट करत नुसरला ‘तबाही’ म्हटलं आहे. 'आजकालचे डिझायनर कुठपर्यंत कैची मारतील सांगता येत नाही' असं म्हणत एका फॉलोअरने तिच्या डिझायनरला बोल लावले आहेत. तर एकाने 'आपल्या देशात किती गरिबी आहे' अशी उपहासात्मक कमेंट केली आहे. हॉट ड्रेसमध्ये वावरण्याच्या तिच्या अंदाजाचं अनेंकांनी कौतुक केलंय खरं पण ट्रोलिंगपासून नुसरतचा हाही लूक वाचला नाही आहे.
  Published by:Janhavi Bhatkar
  First published:

  Tags: Bollywood actress, Filmfare awards

  पुढील बातम्या