मुंबई, 20 ऑक्टोबर: बॉलिवूड प्लेबॅक सिंगर नेहा कक्कर (Neha Kakkar) आणि गायक रोहनप्रित सिंह (RohanPreet Singh) हे बॉलिवूडमधील क्यूट कपल म्हणून ओळखले जाते. हे क्यूट कपल 24 अक्टोबर 2020 साली लग्नाच्या बेडीत अडकले. दोघेही सोशल मीडियावर एकमेंकाविषयी प्रेम व्यक्त करत असतात. आता त्यांच्या लग्नाला एक वर्ष (Marriage Anniversary Celebration) होणार आहे. यानिमित्त या कपलने एक खास व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत दोघेही लग्नाचा वाढदिवस साजरा करताना दिसत आहे.
या व्हिडिओमध्ये रोहनप्रीत आणि नेहा कक्कर केक कापताना आणि एकमेकांना किस करताना दिसत आहेत. या व्हिडिओमध्ये दोघांचे संभाषणही ऐकता येत आहे. व्हिडिओमध्ये नेहा आणि रोहनप्रीत त्यांच्या लग्नाचा पहिला वाढदिवस साजरा करताना दिसत आहे. यावेळी नेहाला केक कापण्यासाठी रोहनप्रीतने चाकू दिला आणि तिने केक कापायचा सोडून चाकू पटकन त्याच्या गळ्याला लावला. अर्थात तिन हे सगळं गंमतीने केलं आहे. दोघेही केक कापताना लग्नाचा 25 वा वाढदिवस असल्याचे बोलत आहेत.
वाचा : Money Laundering Case : चौथ्या समन्सनंतर जॅकलिन ED च्या कार्यालयात दाखल
व्हिडिओ शेअर करताना नेहा कक्करने लिहिले आहे की, आमच्या लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाला पाच दिवस बाकी आहे. रोहनप्रीतमुळे मी पूर्ण होते..धन्यवाद रोहनप्रीत ..तसेच ती पुढं म्हणतेय की , 25 वर्ष म्हणत आहे कारण आमचा Law of Attraction वर विश्वास आहे.तुमच्या प्रेम आणि आशीर्वादासाठी मी आणि #NeHearts कडून सर्वांचे आभार !
View this post on Instagram
या व्हिडिओवर कमेंट करत रोहनप्रीतने नेहाला आय लव्ह यू म्हटले आहे. त्याचबरोबर नेहाच्या पोस्टवर भाऊ टोनी कक्करनेही कमेंट केली आहे. त्याने लिहिले, 'तुम्ही दोघे सर्वात क्युट कपल आहात. खूप खूप अभिनंदन, फक्त चार दिवस बाकी आहेत...असं त्यानं म्हटलं आहे.
नेहा आणि रोहनप्रीतने ऑक्टोबर 2020 मध्ये पंजाबी पद्धतीने लग्न केले. त्यांच्या लग्नात फक्त जवळचे मित्र आणि कुटुंबातील सदस्य उपस्थित होते. नंतर या जोडप्याने चंदीगडमध्ये मोठी पार्टी दिली होती.
वाचा :VIDEO : काय म्हणता.. हॉटेलात गेल्यावर रणवीर सिंहला आवडते हातानेच खायला कारण ...
नेहा आणि रोहनप्रीत यांची पहिली भेट गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये एका म्युझिक व्हिडिओच्या शूटिंग दरम्यान झाली होती. दोघांनी दोन महिन्यांत लग्न केले. नेहाने एका मुलाखतीत सांगितले होते की, रोहनप्रीतला पहिल्याच भेटीत पाहिल्यानंतर ती त्याच्या प्रेमात पडली होती.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood, Bollywood News, Entertainment, Neha kakkar, Singer neha kakkar