मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /VIDEO : काय म्हणता.. हॉटेलात गेल्यावर रणवीर सिंहला आवडते हातानेच खायला कारण चमच्याने ...

VIDEO : काय म्हणता.. हॉटेलात गेल्यावर रणवीर सिंहला आवडते हातानेच खायला कारण चमच्याने ...

हॉटेलात गेल्यानंतर सर्वांनाच चमच्याने खायला जमतच असं नाही मात्र रणवीर सिंहने  (Ranveer Singh ) मात्र आपण हॉटेलमध्ये गेलो किंवा आणि कुठं हातानेच खात असल्याचे सांगत त्याची चव कशालाच येत नसल्याचा खुलासा केला आहे.

हॉटेलात गेल्यानंतर सर्वांनाच चमच्याने खायला जमतच असं नाही मात्र रणवीर सिंहने (Ranveer Singh ) मात्र आपण हॉटेलमध्ये गेलो किंवा आणि कुठं हातानेच खात असल्याचे सांगत त्याची चव कशालाच येत नसल्याचा खुलासा केला आहे.

हॉटेलात गेल्यानंतर सर्वांनाच चमच्याने खायला जमतच असं नाही मात्र रणवीर सिंहने (Ranveer Singh ) मात्र आपण हॉटेलमध्ये गेलो किंवा आणि कुठं हातानेच खात असल्याचे सांगत त्याची चव कशालाच येत नसल्याचा खुलासा केला आहे.

मुंबई, 20 ऑक्टोबर:  बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंह (Ranveer Singh ) ने ‘द बिग पिक्चर’ (The Big Picture) या शोच्या माध्यमातून छोट्या पडद्यावर धमाकेदार पदार्पण केले आहे. आता चाहते त्याच्या या शोच्या नवीन भागाची वाट पाहत आहेत. रणवीर असा अभिनेता आहे जो त्या स्टाईलने लोकांच्या चेहऱ्यावर हासून आणल्याशिवाय राहत नाही. त्याची बोलण्याची स्टाईल असो की त्याचाय अतरंगी फॅशेन सेन्स असो तो नेहमीच लोकांचे मनोरंजन करतो. रणवीर एक मोठ नाव आहे मात्र आजही त्याची मुळ जमनीशी घटट् आहेत. तो आजही त्याचा देसी बाज विसरलेला नाही. याचा खुलासा त्यानेच केला आहे.

रणवीर त्याच्या या शोमध्ये अमिताभ बच्चन यांच्या स्टाईलमध्ये विचारतो की, एवढ्या पैश्याचे काय कराणार. अमिताभ बच्चन, सलमान खान आणि शाहरुख खान यांच्यानेचर रणवीरने देखील त्याचा मोर्चा छोट्या पडद्याकजे वळवला आहे. नुकताच ‘द बिग पिक्चर (The Big Picture)’ चा एक प्रोमो समोर आला त्यामध्ये त्याने सांगितले हॉटेलमध्ये त्याला चाकू - चमच्याने खायला आवडत नाही तर हातानेच खायला आवडत असल्याचा खुलासा त्याने केला आहे.

View this post on Instagram

A post shared by ColorsTV (@colorstv)

शोमध्ये प्रोमोमध्ये दाखवण्यात आले आहे की, एक स्पर्धक 10 हजार जिंकल्यानंतर, शोचा होस्ट रणवीर सिंह तिला विचारतो की या 10 हजार रुपयांचे काय करणार? यावर ती म्हणते की, ती एका मोठ्या हॉटेलमध्ये कुटुंबासोबत डिनर करायला जाईल, कारण तिने कधीही काटा आणि चाकूने अन्न खाल्ले नाही. स्पर्धकाचे हे मत ऐकल्यानंतर रणवीर म्हणाला की, मी माझ्या वैयक्तिक अनुभवातून म्हणतोय, काटा आणि चाकूने खाण्यापेक्षा मला हाताने खायला आवडते. चमच्याने खाण्यापेक्षा हाताने खाण्यात एक वेगळा आनंद आहे. हाताने खाण्यामुळे जी चव येते ती काही वेगळीच आहे. हो खर आहे मला देखील हे माहित आहे कारण हॉटेलमध्ये गेल्यावर देखील आम्ही हातानेच खाणार आहे. त्यासाठी हॉटेलमध्ये देखील जाव लागल असं ती स्पर्धक म्हणताना दिसत आहे.

वाचा : '..तेव्हा 2च रुपयांचा पास माझ्या खिशाला परवडत होता';अमिताभ यांना आठवले ते दिवस

रणवीरने या शोदरम्यान सांगितला फॅमेलि प्लॅनिंगचा प्लॅन

या शोमध्ये स्पर्धकांना एक चित्र दाखवले जाते आणि त्याच्या उत्तरासाठी 4 पर्याय दिले जातात, ज्यासाठी स्पर्धकांना उत्तर द्यावे लागते. बरोबर उत्तर देणारा पैसे जिंकतो.रणवीर सिंहचा हा पहिला टीव्ही शो आहे. हा शो तो होस्ट करताना दिसत आहे. शो सुरू होऊन एकच दिवस झाला आहे मात्र रणवीरचा या शोमधील हटके अंदाज पाहून सगळीकडे त्याचीच चर्चा सुरू आहे.

वाचा : ओळखलं का फोटोतील 'या' चिमुकलीला? आज आहे बॉलिवूडची लोकप्रिय गायिका

रणवीर या शोमध्ये त्याच्या लग्नाविषयी आणि मुलांविषयी बोलताना दिसला. तो म्हणाला की, तुम्हाला सगळ्यांना माहित आहे की माझं लग्न झालं आहे आणि आता दोन ते तीन वर्षात माझी मुलं होतील. भाऊ, तुमची वहिनी दीपिका लहान असताना इतकी सुंदर होती. मी रोज तिच्या लहानपणीचा फोटो पाहत होतो आणि म्हणत होतो की, मला अशीच एक मुलगी दे जी माझं आयुष्य बदलून टाकेल. मी तर नाव शॉर्टलिस्ट करत आहे. जर मी तुमचं नाव शौर्य त्या लिस्टमध्ये समाविष्ट केलं तर तुम्हाला काही हरकत नाही ना?..

First published:
top videos