मुंबई, 20 ऑक्टोबर: बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस (Jacqueline Fernandez) गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी जॅकलीन फर्नांडिस ईडीच्या (Enforcement Directorate- ED) रडारवर सापडल्याने या चर्चा सुरु झाल्या होत्या. दरम्यान 200 कोटी रुपयांच्या मनी लॉऩ्ड्रिंग प्रकरणाच्या चौकशीसाठी जॅकलीन चौथ्यांदा गैरहजर राहिली होती. ईडीकडून चारवेळा समन्स बजावल्यानंतर मात्र बुधवारी जॅकलिन फर्नांडिस चौकशीसाठी ईडीच्या कार्यालयात दाखल झाली आहे.
25 सप्टेंबर, 15 ऑक्टोबर, 16 ऑक्टोबर आणि 18 अक्टूबरला जॅकलिनला ईडीकडून चौकशीसाठी बोलावण्यात आलं होतं. चार वेळा समन्स बजावूनही जॅकलिन चौकशीसाठी उपस्थित राहिली नाही. यापूर्वी 30 ऑगस्ट रोजी जॅकलीनची दिल्लीत 6 तास चौकशी करण्यात आली होती. सुकेश चंद्रशेखर यांच्याविरोधात नोंदवण्यात आलेल्या फसवणुकीच्या प्रकरणात जॅकलिन फर्नांडिस यांचे मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायद्याअंतर्गत (पीएमएलए) जबाब नोंदवला जात आहे. जॅकलीन या प्रकरणात साक्षीदार आहे. सुकेश चंद्रशेखर आणि जॅकलिन यांच्यात काही आर्थिक व्यवहार झाला आहे का नाही याची तपासणी करत आहेत.
वाचा : बॉलिवूड अभिनेत्रीसोबत आर्यन खानने ड्रग्ससंबंधी केलं होतं व्हॉट्सऍप चॅट
दिल्लीच्या रोहिणी कारागृहात बंद असलेल्या सुकेश चंद्रशेखरवर एका व्यापाऱ्याकडून एका वर्षात 200 कोटी रुपये उकळल्याचा आरोप आहे. त्याच्यावर खंडणीचे 20 हून अधिक गुन्हे दाखल आहेत आणि तो कारागृहाच्या आतून रॅकेट चालवत असल्याचा आरोप आहे.
वाचा : ओळखलं का फोटोतील 'या' चिमुकलीला? आज आहे बॉलिवूडची लोकप्रिय गायिका
जॅकलिन मुळची श्रीलंकेची आहे. मात्र बॉलिवूडने तिला ओळख दिली तसेच बॉलिवूड अभिनेता सलमान खानची ती जवळची मैत्रीण आहे. तिचे वडील श्रीलंकेचे तर आई मलेशियाची आहे. तिचे वडील संगीतकार तर आई एअर होस्टेस होती. चार भांवडात जॅकलीन सर्वात लहान आहे. जॅकलीन एक मोठी बहीण आणि दोन भाऊ आहेत.
View this post on Instagram
यापूर्वी अभिनेत्री नोरा फतेही(Nora Fatehi) ईडी (ED)कार्यालयात चौकशीसाठी पोहचली होती. 200 कोटी रुपयांच्या फसवणुकीच्या प्रकरणात ईडीने अभिनेत्रीला दिल्लीतील कार्यालयात चौकशीसाठी बोलावले होते.
कोण आहे सुकेश चंद्रशेखर-
मूळचा बेंगळुरू, कर्नाटकातील असलेल्या सुकेश चंद्रशेखरला हाय प्रोफाइल आयुष्य जगायचं होतं. त्यासाठी त्याने हे सर्व प्रकार केले होते. बेंगळुरू पोलिसांनी जेव्हा सुकेशला पहिल्यांदा अटक केली, तेव्हा तो फक्त 17 वर्षांचा होता. कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी यांच्या मुलाचा मित्र बनून त्याने 1.14 कोटींची फसवणूक केली होती.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood, Bollywood actress, Bollywood News, Jacqueline fernandez