मुंबई, 12 सप्टेंबर- नुकताच 'कौन बनेगा करोडपती' (Kaun Banega Carorepati) अभिनेत्री दीपिका पादुकोण आणि फराह खानने हजेरी लावली होती. त्यांनतर भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुली आणि वीरेंद्र सेहवागसुद्धा सहभागी झाले होते. यावेळीसुद्धा असेच खास पाहुणे KBC मध्ये हजेरी लावणार आहेत. नुकताच शोचा नवा प्रोमो समोर आला आहे. यामध्ये ऑलिम्पिक गोल्ड मेडल विजेता खेळाडू नीरज चोप्रा(Neeraj Chopra) आणि हॉकी खेळाडू पी. आर. श्रीजेश (P.R.Shrijesh) सहभागी झालेले दिसून येत आहेत.
नुकताच सोनीने आपल्या इन्स्टाग्राम पेजवर KBC चा नवा प्रोमो शेयर केला आहे. तसेच त्याला कॅप्शन देत म्हटलं आहे. 'आपल्या देशाच नाव मोठं करून KBC मध्ये येत आहेत.टोकियो ऑलिम्पिकमध्ये गोल्ड मेडल पटकावणारे नीरज चोप्रा आणो हॉकीपटू पी. आर. श्रीजेश. ऐका संघर्ष आणि ऑलिम्पिकचे अनुभव', असं हे कॅप्शन आहे.
View this post on Instagram
गोल्ड मेडल मिळवल्यानंतर नीरज चोप्रा अनेक मुलाखतींमध्ये दिसून आला आहे. मात्र 'कौन बनेगा करोडपती'मध्ये त्याचं अपियरन्स खूपच खास असणार आहे. यावेळी अमिताभ बच्चन नीरज आणि श्रीजेशला विचारत आहेत मी तुमच्या मेडल्सना हात लावू शकतो का? तसेच नीरज चोप्रा अमिताभ यांना हरियाणवी बोलायला शिकवतो.
(हे वाचा:सिद्धार्थच्या मृत्यूनंतर शेहनाज गिलचा तो VIDEO पाहून चाहत्यांना कोसळलं रडू)
तसेच श्रीजेशने' अमिताभ यांना सांगितलं २०२१ ने त्याची आणि संपूर्ण टीमची लाईफ बदलून टाकली. २०१२ मध्ये ऑलिम्पिकमध्ये पात्र ठरल्यानांतर आम्ही एकसुद्धा मॅच जिंकू शकलो नव्हतो. भारतात परत आल्यानंतर सर्व लोक आमच्यावर हसत होते. कोणत्याही कार्यक्रमात गेल्यांनतर आम्हाला सर्वात मागे बसवण्यात येत असे. आमचा खूप अपमान करण्यात आला होता. कधी कधी वाटत असे आम्ही का हॉकी खेळतोय. मात्र टोकियो ऑलिम्पिकमध्ये मेडल जिंकल्यानंतर वाटलं आमचं दुःख, त्रास, ते रडलेले दिवस सर्व काही वाहून गेलं.
(हे वाचा:चिमुकल्याच्या आजाराने अस्वस्थ झाले बिग बी; आयांशसाठी केलं गुप्तदान)
येत्या १७ डिसेंबरला हा एपिसोड सोनीवर आपल्यला पाहायला मिळणार आहे. प्रोमो पाहून सर्वांनाच या एपिसोडची उत्सुकता लागली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Amitabh Bachchan, KBC, Olympics 2021