Home /News /entertainment /

सिद्धार्थच्या मृत्यूनंतर शेहनाज गिलचा तो VIDEO पाहून चाहत्यांना कोसळलं रडू

सिद्धार्थच्या मृत्यूनंतर शेहनाज गिलचा तो VIDEO पाहून चाहत्यांना कोसळलं रडू

आज सिद्धार्थला जाणून 10 दिवस झाले आहेत. मात्र अजूनही प्रत्येकाच्या चेहऱ्यावर ते दुःख स्पष्ट झळकत आहे.

  मुंबई, 12 सप्टेंबर- 'बिग बॉस 13' (Bigg Boss 13) चा विजेता आणि अभिनेता सिद्धार्थ शुक्लच्या(Sidharth Shukla) अशा अचानक जाण्याने सर्वच सुन्न झाले आहेत. अजूनही सोशल मीडियावर फक्त सिद्धार्थ आणि गर्लफ्रेंड शेहनाजचे व्हिडीओ व्हायरल होत आहेत. आपल्या लाडक्या अभिनेत्याला पाहून सर्वजण भावुक होत आहेत. नुकताच इन्स्टाग्रामवर शेहनाजचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यामध्ये शेहनाज एक इमोशनल सॉंग म्हणत आहेत. तो व्हिडीओ पाहून चाहते सध्या भावुक होत आहेत.
  आज सिद्धार्थला जाणून 10 दिवस झाले आहेत. मात्र अजूनही प्रत्येकाच्या चेहऱ्यावर ते दुःख स्पष्ट झळकत आहे. सिद्धार्थचं कुटुंब आणि त्याची गर्लफ्रेंड शेहनाज गिलला सावरणं कठीण झालं आहे. सिद्धार्थच्या सर्व चाहत्यांना शेहनाज आणि त्याच्या आईची काळजी लागून राहिली आहे. चाहते शेहनाजच्या जुन्या व्हिडीओवर कमेंट्स करून तिच्याबद्दल चिंता व्यक्त करत आहेत. (हे वाचा:कपिल शर्मा ते भारती सिंहपर्यंत कोणत्या कॉमेडियनने घेतलंय किती शिक्षण?) नुकताच सोशल मीडियावर शेहनाजचा एक जुना व्हिडीओ सर्वत्र व्हायरल होत आहे. यामध्ये शेहनाज ‘रोई न जे याद मेरी आई वे' हे पंजाबी गं म्हणताना दिसत आहे. मात्र आत्ता हा व्हिडीओ पाहून चाहत्यांच्या डोळ्यात पानी येत आहे. युजर्स मोठ्या प्रमाणात कमेंट्स करून शेहनाजला धीर देत आहेत. तसेच तिला मजबूत होण्याचा सल्ला देत आहेत. (हे वाचा:बॉलिवूड रोजंदार कामगारांना यशराजकडून मदतीचा हात; असा करा अर्ज) या व्हिडीओमध्ये शेहनाज अगदी चेहऱ्यावर स्मित हास्य ठेऊन ‘रोई न जे याद मेरी आई वे' हे गाणं म्हणत आहे. या व्हिडीओवर चाहत्यांनी शेहनाजच खूप कौतुकदेखील केलं होत. मात्र सिद्धार्थच्या आकस्मिक मृत्यूनंतर आता हा व्हिडीओ व्हायरल होत असल्याने सर्वच चाहते भावुक झाले आहेत.
  Published by:Aiman Desai
  First published:

  Tags: Entertainment, Sidharth shukla

  पुढील बातम्या