मुंबई, 23 जानेवारी: प्रसिद्ध अभिनेता नवाजुद्दीन सिद्धिकी बाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. नवाजुद्दीनच्या घरचा वाद चवाट्यावर आला आहे. नवाजची आई मेहरूनिसा सिद्धिकी आणि त्याची पत्नी जैनब उर्फ आलिया यांच्यातील नातेसंबंध ठिक नाहीत. नवाजच्या आईनं आलिया विरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. तक्रारीनंतर वर्सोवा पोलीस स्थानकात नवाजच्या पत्नीला चौकशीसाठी बोलावण्यात आलं आहे. नवाजच्या आई आणि बायकोमध्ये संपत्तीवरून वाद सुरू असल्याचं म्हटलं जात आहे.नवाजच्या पत्नी विरोधात IPC कलम 452, 323, 504, 506 अंतर्गत तक्रार दाखल करण्यात आली आहे.
नवाजुद्दीनच्या आईनं तक्रारीमध्ये म्हटलं आहे की, आलिया ज्या बंगल्यामध्ये राहत होती त्या बंगल्यावरून त्यांच्यात वाद झाले होते. मिळालेल्या माहितीनुसार, नवाजुद्दीनच्या आईचा आणि बायकोचा संपत्तीवरून वाद सुरू आहे. नवाजुद्दीन आणि आलियाचं 2010मध्ये लग्न झालं. दोघांना 2 मुलं आहेत. पण फार कमी लोकांना माहिती आहे की जवाजुद्दीननं दुसरं लग्न देखील केलं आहे. दुसऱ्या पत्नीच्या विरोधात अभिनेत्याच्या आईनं तक्रार दाखल केली आहे.
हेही वाचा - Nawazuddin Siddiqui: मला 25 कोटींची ऑफर दिली, तरी 'तसं' काम परत नको', नवाजुद्दीन सिद्दीकीचं मोठं वक्तव्य
नवाजुद्दीन सिद्धिकी त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे कायम चर्चेत राहिला आहे. आलिया ही नवाजची दुसरी बायको आहे. लॉकडाऊनच्या काळात दोघांमध्ये अनेक खटके उडाल्याचं म्हटलं गेलं होतं. मीडिया रिपोर्टनुसार, नवाज आणि आलियानं एकमेकांवर गंभीर आरोप केले होते. आलियानं नवाजुद्दीन विरोधात मारहाण केल्याचा आरोप केला होता.
नवाजुद्दीनचं पहिलं लग्न त्याच्या आईच्या इच्छेनुसार झालं होतं. नवाजच्या पहिल्या बायकोचं नाव शीबा असं होतं. ती उत्तराखंडच्या हल्द्वानी येथे राहणारी होती. दोघांच्या लग्नानंतर त्यांच्यातही खटके उडाले होते. दोघांचं लग्न फार काळ टीकू शकलं नाही ज्यामुळे दोघांनी एकमेकांपासून वेगळं होण्याचा निर्णय घेतला.
त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात अनेक अडचणी आहेत. मात्र त्याच्या प्रोफेशनल कामाबद्दल बोलायचं तर त्यात तो अव्वल स्थानावर आहे. नवाजुद्दीन सिद्धिकीचा हड्डी हा नवा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात अभिनेता ट्रान्स जेंडरची भूमिका साकारणार आहे. नवाजुद्दीनच्या लुकची सर्वत्र प्रचंड चर्चा आहे. हड्डी सिनेमाची प्रेक्षक आतूरतेनं वाट पाहत आहेत.
( बातमी अपडेट होत आहे )
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood, Bollywood actor, Bollywood News