मुंबई, 17 नोव्हेंबर : बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्धिकी सध्या चर्चेत आहे. त्याच्या चर्चेच कारणही तसं खास आहे. नवाजुद्दीन सध्या त्याच्या आगामी हड्डी या सिनेमाच्या शुटींगमध्ये बिझी आहे. नवाजनं आतापर्यंत केलेल्या सगळ्या भूमिकांना छेद देणारी भूमिका तो प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहे. हड्डी या सिनेमात नवाजुद्दीन सिद्धिकी एका ट्रान्सजेंडरची भूमिका साकारणार आहे. सिनेमातील नवाजचा फर्स्ट लुक काही दिवसांआधी प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. दरम्यान सिनेमातील शुटींगचे काही फोटो समोर आलेत ज्यात नवाजला ओळखू येणं कठीण झालं आहे. सिनेमात नवाज ट्रान्सजेंडरची भूमिका साकारणार आहे यासाठी त्याचं कौतुक आहेच पण या सिनेमासाठी त्यानं 80 हून अधिक ट्रान्सजेंडरबरोबर काम केलंय यासाठीही त्याचं विशेष कौतुक करावं लागेल.
हड्डी सिनेमात ट्रान्सजेंडरवर फोकस करण्यात येणार आहे. नवाजुद्दीनं सिद्धिकीनं सिनेमात खऱ्या 80 ट्रान्सजेंडरबरोबर काम केलं आहे. ट्रान्सजेंडरबरोबर काम करायला मिळालं हा माझा सन्मान आणि माझं भाग्य आहे असं नवाजनं म्हटलं आहे. हड्डी सिनेमात ट्रान्सजेंडरची भूमिका साकारताना आलेल्या अनुभवाविषयी सांगताना नवाजनं म्हटलंय, 'हड्डी सिनेमासाठी रिअल ट्रान्सजेंडरबरोबर काम करणं माझ्यासाठी एक शानदार अनुभव होता. माझ्यासाठी ही सन्मानाची गोष्ट आहे. सिनेमाच्या माध्यमातून मला ट्रान्सजेंडर समुदायाला समजण्याचा आणि त्यांच्याकडून काही गोष्टी शिकण्याची संधी मिळाली'.
View this post on Instagram
काही दिवसांआधीच नवाजनं ट्रान्सवुमनच्या वेशातील त्याचा पहिली लुक शेअर केला होता. ग्रे कलरचा शिमरी गाऊन, बोल्ड मेकअपमध्ये नवाजला ओळखणंच कठिण झालं होतं. त्यानंतर आता समोर आलेल्या लुकमध्ये नवाजुद्दीन सिद्धिकी साडी चोळी, हिरव्या बांगड्यांमध्ये दिसत आहे. हिरवी साडी, हातात बांगड्या, टिकली, डार्क शेड लिपस्टिक, मोकळे केस अशा लुकमध्ये नवाजुद्दीन दिसत आहे.
नवाजुद्दीनचा हड्डी सिनेमातील नवा लुक चांगलाच व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये नवाज अनेक ट्रान्सजेंडरबरोबर दिसत आहे. नवाजच्या या लुकचं जितकं करू तितकं कौतुक कमी आहे. पुन्हा एकदा त्यानं प्रेक्षकांच्या भुवया उंचावल्या असून कौतुक करायला भाग पाडलं आहे. सिनेमाचा टीझर ट्रेलर येणं अजून बाकी आहे मात्र सिनेमच्या फर्स्ट लुकनं प्रेक्षकांची उत्सुकता ताणली आहे. हड्डी हा सिनेमा 2023मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood, Bollywood actor, Bollywood News