मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /Nawazuddin Siddiqui: मला 25 कोटींची ऑफर दिली, तरी 'तसं' काम परत नको', नवाजुद्दीन सिद्दीकीचं मोठं वक्तव्य

Nawazuddin Siddiqui: मला 25 कोटींची ऑफर दिली, तरी 'तसं' काम परत नको', नवाजुद्दीन सिद्दीकीचं मोठं वक्तव्य

नवाजुद्दीन सिद्दीकी

नवाजुद्दीन सिद्दीकी

बॉलिवूडमधील अष्टपैलू अभिनेता म्हणून नवाजुद्दीन सिद्दीकीकडे पाहिलं जात आहे. नवाजुद्दीनने मोठ्या कष्टाने हे यश साध्य केलं आहे. आज अभिनेता जरी यशाच्या शिखरावर पोहोचला असला तरी, त्याला इथपर्यंत पोहोचण्यासाठी प्रचंड मेहनत करावी लागली आहे.

पुढे वाचा ...
  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Maharashtra, India

मुंबई, 3 जानेवारी-  बॉलिवूडमधील अष्टपैलू अभिनेता म्हणून नवाजुद्दीन सिद्दीकीकडे पाहिलं जात आहे. नवाजुद्दीनने मोठ्या कष्टाने हे यश साध्य केलं आहे. आज अभिनेता जरी यशाच्या शिखरावर पोहोचला असला तरी, त्याला इथपर्यंत पोहोचण्यासाठी प्रचंड मेहनत करावी लागली आहे. नवाजुद्दीनने सुरुवातीपासून काही छोट्या-मोठ्या भूमिका साकारत आपला सिनेप्रवास सुरु केला होता. मात्र आज त्याने आपल्या अभिनयाच्या जोरावर बॉलिवूडमध्ये आपला आगळावेगळा दबदबा निर्माण केला आहे. अगदीच हिरोसारखी आकर्षक प्रतिमा नसतानाही केवळ आपल्या चोख अभिनयाच्या माध्यमातून नवाजुद्दीनने मोठा चाहतावर्ग निर्माण केला आहे.

सध्या नवाजुद्दीन सिद्दीकी आपल्या 'हड्डी' या चित्रपटामुळे चांगलाच चर्चेत आला आहे. नवाजुद्दीनने आपल्या कारकिर्दीत सतत वेगवेगळ्या धाटणीच्या भूमिका साकारल्या आहेत. मात्र ही भूमिका फारच कठीण आणि आव्हानात्मक आहे. कारण या चित्रपटात नवाजुद्दीन सिद्दीकीने एका ट्रान्सजेंडरची भूमिका साकारली आहे. अभिनेत्याने या चित्रपटातील हा लुक शेअर करताच सर्वच थक्क झाले होते. कारण या पोस्टरमध्ये एका नजरेत नवाजुद्दीनला ओळखणं फारच कठीण होतं. नवाजुद्दीनचं हे पोस्टर पाहून चाहते आणि समीक्षक त्याच्यावर कौतकाचा वर्षाव करत आहेत.

(हे वाचा:Kartik Aaryan: कार्तिक आर्यन पुन्हा प्रेमात; हृतिक रोशनची बहीण नव्हे 'या' गायकाच्या एक्स गर्लफ्रेंडला करतोय डेट? )

दरम्यान नवाजुद्दीन सिद्दीकीने नुकतंच दिलेल्या एका मुलाखतीत आपल्या कारकिर्दीच्या अनेक गोष्टींबाबत मोकळेपणाने गप्पा मारल्या आहेत. यावेळी बोलताना नवाजुद्दीन एक गोष्ट अगदी ठामपणे मांडली आहे. नवाजुद्दीनने म्हटलं, ' मला आता जर कोणी 25 कोटींची ऑफर जरी दिली, तरी मी लहान भूमिका करणार नाही. नवाजुद्दीन पुढे म्हणाला, पैसा आणि प्रसिद्धी ही प्रत्येक व्यक्तीच्या कष्टावर अवलंबून असते. तसेच तो म्हणाला, माझा या गोष्टीवर प्रचंड विश्वास आहे की, आपण स्वतःला इतकं लायक बनवलं पाहिजे की, पैसा आणि प्रसिद्धी आपले गुलाम बनले पाहिजेत.'

सध्या नवाजुद्दीन सिद्दीकीच्या या वक्तव्याची चांगलीच चर्चा सुरु आहे. नवाजुद्दीन हा एक सेल्फ मेड स्टार आहे असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही. कारण इंडस्ट्रीमध्ये कोणीही मित्र-मैत्रीण नसताना आणि कुटुंबाची कोणतीही फिल्मी पार्श्वभूमी नसताना अभिनेत्याने स्वतःच्या ताकतीवर हे यश मिळवलं आहे. त्यामुळे तिच्या चाहत्यांना तिचा प्रचंड हेवा आहे. तसेच त्याच्या अभिनय अगदी वास्तविक वाटतं असल्याचा खुलासा वारंवार चाहत्यांनी केला आहे. आज नवाजुद्दीन आपल्या अभिनय क्षमतेच्या जोरावर बॉलिवूडमध्ये आपले पाय रोवून भक्कम उभा आहे.

नवाजुद्दीन सिद्दीकीए अनेक वर्षांच्या मागे आमिर खानच्या 'सरफरोश' या चित्रपटात अगदी साईड भूमिका साकारली होती. तिथून अभिनेत्याचा प्रवास सुरु झाला होता. मात्र त्याला खरी ओळख अनुराग कश्यप दिग्दर्शित 'गँग्स ऑफ वासेपूर' या चित्रपटामुळे मिळाली होती. त्यांनतर नवाजुद्दीनने रईस, किक, बजरंगी भाईजान, बदलापूरसारख्या मोठ्या चित्रपटांमध्ये महत्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. आज अभिनेता 'हड्डी' च्या माध्यमातून सर्वांचं मन जिंकत आहे.

First published:

Tags: Bollywood actor, Bollywood News, Entertainment