महाराष्ट्रात भाजपची सत्ता नकोच, काँग्रेसचे खासदार संजय राऊतांच्या भेटीला

महाराष्ट्रात भाजपची सत्ता नकोच, काँग्रेसचे खासदार संजय राऊतांच्या भेटीला

'भाजपचा मुख्यमंत्रीही सत्तेत येऊ नये. शरद पवार आणि सोनिया गांधी यांनी यासाठी निर्णय घ्यावा.'

  • Share this:

मुंबई 6 नोव्हेंबर : महाराष्ट्रात राजकीय वातावरण तापलेलं असताना काँग्रेसचे खासदार हुसेन दलवाई हे संजय राऊत यांच्या भेटीसाठी आज सामना कार्यालयात आले. गेली काही दिवस राऊत हे भाजपविरोधात शिवसेनेची खिंड लढवत आहेत. शरद पवारांना भेटणं आणि पुन्हा उद्धव ठाकरेंना भेटून शिवसेनेची रणनीती माध्यमांना सांगणं यासाठी संजय राऊत यांची मुख्य भूमिका असते. शिवसेनेसोबत काँग्रेस सोबत यायला तयार नाही या पार्श्वभूमीवर दलवाई यांनी संजय राऊत यांची भेट घेऊन चर्चा केली. हुसेन दलवाई म्हणाले, भाजपचं राजकारण अतिशय घातक आहे. राज्यात भाजपची सत्ता कुठल्याही परिस्थितीत नको. भाजपचा मुख्यमंत्रीही सत्तेत येऊ नये. शरद पवार आणि सोनिया गांधी यांनी यासाठी निर्णय घ्यावा. गुजरातचं भलं करण्यासाठी महाराष्ट्राचा वापर होऊ नये. ED आणि इतर तपास संस्थांना हाताशी धरून विरोधकांना संपविण्याचं भाजपचं कारस्थान आहे असा आरोपही त्यांनी केलाय.

सत्तास्थापनेसाठी शिवसेनेचे नेते CMना भेटले, उद्धव ठाकरेंना देणार मानाचं पान

भाजपची शिवसेनेसोबत येण्याची तयारी आहे. मात्र काँग्रेस शिवसेनेसोबत यायला तयार नाही. शिवसेनेला काँग्रेससोबत यायचं असेल तर सेनेने आधी NDAमधून बाहेर पडावं असं काँग्रेसला वाटतं. तशी अटच काँग्रेसने घातल्याचं बोललं जातंय. अशा पार्श्वभूमीवर दलवाईंनी संजय राऊतांची भेट घेणं याला महत्त्व प्राप्त झालंय.

कोंडी फुटणार, चर्चेला सुरूवात होणार

सत्ता स्थापनेवरून भाजप आणि शिवसेनेमध्ये कोंडी निर्माण झालेली आहे. दोन्ही पक्षांमधली चर्चा बंद आहे. अशी परिस्थिती असताना मुख्यमंत्र्यांनी आज राज्यातल्या सर्व पालकमंत्र्यांची बैठक बोलावली होती. अवकाळी पावसामुळे उद्धवस्त झालेल्या स्थितीवर चर्चा करण्यासाठी ही बैठक बोलावली होती. त्याला शिवसेनेचे 6 मंत्री उपस्थित होते. या बैठकीनंतर ज्येष्ठ मंत्री एकनाथ शिंदे आणि दिवाकर रावते यांची बंदव्दार चर्चा झाल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिलीय. या बैठकीत सत्ता स्थापनेची जी कोंडी निर्माण झाली होती ती फोडण्यासाठी चर्चा झाली. या आधी झालेल्या मंत्रिमंडळच्या बैठकीत शिवसेनेच्या मंत्र्यांनी दांडी मारली होती. त्यामुळे शिवसेनेच्या मंत्र्यांनी बैठकीत सहभागी होणं याला महत्त्व प्राप्त झालंय.

शिवसेनेचे दोन मंत्री आणि मुख्यमंत्री यांच्या झालेल्या बैठकीत काही प्रस्तावावरही चर्चा झाली. यात भाजप आणि शिवसेनेमध्ये आणि सरकारमध्ये समन्वय राहावा यासाठी एक समन्वय समिती स्थापन करण्यात यावी आणि त्याचं अध्यक्षपद हे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना द्यावं असाही एक प्रस्ताव असल्याची माहिती 'दैनिक लोकमत'नं दिली आहे.

राज्यातील राजकीय कोंडी फोडणाऱ्या पवारांच्या पत्रकार परिषदेतील 10 मुद्दे!

शिवसेना राष्ट्रवादीची जवळीक साधत भाजपवर दबाव आणण्याचा प्रयत्न करतोय. मात्र काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत जाणं हे शिवसेनेसाठी भविष्यात फायद्याचं ठरणार नाही. ज्यांच्याशी कायम लढलो त्याच पक्षाशी सोबत करून सत्ता स्थापन केली तर लोकांना काय सांगणार असा शिवसेनेच्या काही नेत्यांचा सवाल आहे. त्यामुळे शिवसेने मुख्यमंत्रिपदाचा हट्ट सोडावा तर भाजपने मंत्रिपदाचं समसमान वाटप करावं असं सूत्र ठरण्याची शक्यताही व्यक्त करण्यात आलीय. राष्ट्रवादीचे अध्यक्ष पवार यांच्या पत्रकार परिषदेनंतर त्यांची भूमिका पाहता भाजप आणि शिवसेनेत बोलणी होऊन पुढच्या दोन दिवसात  सत्तास्थापनेची कोंडी फुटू शकते अशी शक्यता व्यक्त केली जातेय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 6, 2019 03:55 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading