सत्तास्थापनेसाठी शिवसेनेचे नेते मुख्यमंत्र्यांना भेटले, उद्धव ठाकरेंना देणार मानाचं पद

सत्तास्थापनेसाठी शिवसेनेचे नेते मुख्यमंत्र्यांना भेटले, उद्धव ठाकरेंना देणार मानाचं पद

या आधी झालेल्या मंत्रिमंडळच्या बैठकीत शिवसेनेच्या मंत्र्यांनी दांडी मारली होती. त्यामुळे शिवसेनेच्या मंत्र्यांनी बैठकीत सहभागी होणं याला महत्त्व प्राप्त झालंय.

  • Share this:

मुंबई 6 नोव्हेंबर : सत्ता स्थापनेवरून भाजप आणि शिवसेनेमध्ये कोंडी निर्माण झालेली आहे. दोन्ही पक्षांमधली चर्चा बंद आहे. अशी परिस्थिती असताना मुख्यमंत्र्यांनी आज राज्यातल्या सर्व पालकमंत्र्यांची बैठक बोलावली होती. अवकाळी पावसामुळे उद्धवस्त झालेल्या स्थितीवर चर्चा करण्यासाठी ही बैठक बोलावली होती. त्याला शिवसेनेचे 6 मंत्री उपस्थित होते. या बैठकीनंतर ज्येष्ठ मंत्री एकनाथ शिंदे आणि दिवाकर रावते यांची बंदव्दार चर्चा झाल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिलीय. या बैठकीत सत्ता स्थापनेची जी कोंडी निर्माण झाली होती ती फोडण्यासाठी चर्चा झाली. या आधी झालेल्या मंत्रिमंडळच्या बैठकीत शिवसेनेच्या मंत्र्यांनी दांडी मारली होती. त्यामुळे शिवसेनेच्या मंत्र्यांनी बैठकीत सहभागी होणं याला महत्त्व प्राप्त झालंय.

शिवसेनेचे दोन मंत्री आणि मुख्यमंत्री यांच्या झालेल्या बैठकीत काही प्रस्तावावरही चर्चा झाली. यात भाजप आणि शिवसेनेमध्ये आणि सरकारमध्ये समन्वय राहावा यासाठी एक समन्वय समिती स्थापन करण्यात यावी आणि त्याचं अध्यक्षपद हे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना द्यावं असाही एक प्रस्ताव असल्याची माहिती 'दैनिक लोकमत'नं दिली आहे.

राज्यातील राजकीय कोंडी फोडणाऱ्या पवारांच्या पत्रकार परिषदेतील 10 मुद्दे!

शिवसेना राष्ट्रवादीची जवळीक साधत भाजपवर दबाव आणण्याचा प्रयत्न करतोय. मात्र काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत जाणं हे शिवसेनेसाठी भविष्यात फायद्याचं ठरणार नाही. ज्यांच्याशी कायम लढलो त्याच पक्षाशी सोबत करून सत्ता स्थापन केली तर लोकांना काय सांगणार असा शिवसेनेच्या काही नेत्यांचा सवाल आहे. त्यामुळे शिवसेने मुख्यमंत्रिपदाचा हट्ट सोडावा तर भाजपने मंत्रिपदाचं समसमान वाटप करावं असं सूत्र ठरण्याची शक्यताही व्यक्त करण्यात आलीय. राष्ट्रवादीचे अध्यक्ष पवार यांच्या पत्रकार परिषदेनंतर त्यांची भूमिका पाहता भाजप आणि शिवसेनेत बोलणी होऊन पुढच्या दोन दिवसात  सत्तास्थापनेची कोंडी फुटू शकते अशी शक्यता व्यक्त केली जातेय.

मुख्यमंत्रिपदाच्या चर्चांना शरद पवारांकडून पूर्णविराम, पाहा VIDEO

शरद पवार काय म्हणाले?

राज्यातल्या राजकीय परिस्थितीवर बोलण्यासारख काही नाही अशी मिश्किल टिप्पणी करत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली. जनतेने युतीला कौल दिला आहे त्यामुळे भाजप -शिवसेनेने एकत्र येऊन सरकार स्थापन करावे आणि राज्यातील अस्थैर्य दूर करावे, असे पवारांनी स्पष्ट केले. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस विरोधात बसणार असल्याचे पवारांनी सांगितले. एक जबाबदार विरोधी पक्ष म्हणून आम्ही काम करू असे देखील पवार म्हणाले.

महाराष्ट्रात 48 तासांत नवं सरकार.. सेनेच्या मनधरणीचे फडणवीसांचे जोरदार प्रयत्न

आज सकाळी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पवारांची भेट घेतली होती. त्याच बरोबर सेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी देखील फोनवरून चर्चा केली होती. सकाळपासूनच्या घडामोडीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार काय बोलतील याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष होते. संजय राऊत यांच्या भेटीबद्दल बोलताना पवारांनी सांगितले की, राऊत कोणताही प्रस्ताव घेऊन आले नव्हते. राज्यसभेच्या आधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर त्यांच्याशी चर्चा झाली. तसेच आज सकाळी दिल्लीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि काँग्रेसचे नेते अहमद पटेल यांच्या भेटीसंदर्भात तुम्ही त्यांनाच विचारा असे पवार म्हणाले. पण गडकरी यांची भेट ही रस्ते आणि विकासासाठी असते असेही पवार म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 6, 2019 02:57 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading