मुंबई 18 मार्च**:** कोरोना विषाणूच्या (Coronavirus disease) वाढत्या संक्रमणाचा चित्रपट उद्योगाला मोठा आर्थिक फटका बसला आहे. परिणामी आर्थिक नुकसानातून बाहेर पडण्यासाठी अनेक मोठ्या चित्रपटांनी ओटीटी प्लॅटफॉर्म्सचा रस्ता निवडला. मात्र या प्रतिकूल परिस्थितीतही मी OTTच्या कुबड्या स्विकारणार नाही असा इरादा अभिनेता जॉन अब्राहम (John Abraham) यानं केला आहे. “मी मोठ्या स्क्रिनचा अभिनेता आहे. सबस्क्रिप्शन फीजमध्ये तुम्ही मला खरेदी करु शकत नाही” असा इशारा त्यानं टीकाकारांना दिला आहे. जॉन अब्राहमचा मुंबई सागा (Mumbai Saga) हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. मात्र हा चित्रपट कुठल्याही परिस्थितीत सिनेमागृहातच प्रदर्शित होईल असा निश्चय जॉननं केला आहे. त्याला या चित्रपटासाठी अनेक OTT प्लॅटफॉर्मसनं कोट्यवधींची ऑफर दिली होती. परंतु मी मोठ्या स्क्रिनचा अभिनेता आहे असं म्हणत त्यानं ही ऑफर धुडकावून लावली. अवश्य पाहा - शत्रूघ्न सिंन्हा यांनी खाल्ला असता मार; शशी कपूर पट्टा घेऊन धावले होते मागे
अवश्य पाहा - ‘माझ्याही घरावर ईडीनं धाड टाकावी’; मराठी दिग्दर्शक झाला रातोरात श्रीमंत नुकतीच पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत त्यानं या प्रकरणावर भाष्य केलं. तो म्हणाला, “जेव्हा एखाद्या अभिनेत्याला त्याच्या चित्रपटाबाबत शंका असते तेव्हा तो त्याचा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित करतो. ओटीटीवर प्रदर्शित होणारे 90 टक्के चित्रपट वाईट असतात. त्यांना चांगली कथा, पटकथा, संवाद नसतात. पण माझा चित्रपट एक उत्कृष्ट चित्रपट आहे. त्यामुळे मला त्याच्या यशाबद्दल तसूभरही शंका नाही. मी या महामारीचा वापर कुबड्यांसारखा करणार नाही.” पोलीस असो वा राजकारणी कुणालाही न घाबरता आपल्या भूमिकेवर ठाम असणारा अमर्त्य राव अखेर राजकारण्यांच्या जाळ्यात कसा अडकला जातो? तो गुन्हेगारी विश्वाकडे कसा वळतो? आणि चोर पोलिसांच्या खेळात नेमकं कोण जिंकतं? हे मुंबई सागा या चित्रपटात दाखवलं जाणार आहे. हा चित्रपट येत्या 19 मार्चला सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. संजय गुप्ता यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे.