Home /News /entertainment /

शत्रूघ्न सिंन्हा यांनी खाल्ला असता मार; शशी कपूर पट्टा घेऊन धावले होते मागे

शत्रूघ्न सिंन्हा यांनी खाल्ला असता मार; शशी कपूर पट्टा घेऊन धावले होते मागे

शूटिंग करत असताना ते सेटवरील सहकलाकारांची नेहमी फिरकी घ्यायचे. असाच काहीसा प्रकार त्यांनी अभिनेते शत्रूघ्न सिन्हा (Shatrughan Sinha) यांच्यासोबत केला होता.

    मुंबई 18 मार्च: शशी कपूर (Shashi Kapoor) हे बॉलिवूडमधील सर्वाधिक लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक म्हणून ओळखले जातात. 70-80च्या दशकात त्यांनी आपल्या जबदस्त अभिनयाच्या जोरावर अक्षरश: धुमाकूळ घातला होता. अभिनयासोबतच ते आपल्या आपल्या गंमतीशीर स्वभावासाठीही प्रसिद्ध होते. शूटिंग करत असताना ते सेटवरील सहकलाकारांची नेहमी फिरकी घ्यायचे. असाच काहीसा प्रकार त्यांनी अभिनेते शत्रूघ्न सिन्हा (Shatrughan Sinha) यांच्यासोबत केला होता. ते अक्षरश: पट्टा घेऊन त्यांच्या मागे पळत होते. वाचा काय होता तो गंमतीशीर किस्सा... अवश्य पाहा - 40 वर्ष चाहत्यांच्या मनावर राज्य करणारे शशी कपूर; पाहा कसे झाले सुपरस्टार शत्रूघ्न सिन्हा यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत हा गंमतीशीर किस्सा सांगितला. एकदा शत्रुघ्न शूटसाठी सेटवर उशिरा पोहोचले होते. त्यावेळी शशी खूप वेळ त्यांची वाट पाहत होते. त्यांना पाहताच शशी कपूर त्यांच्या मागे पट्टा घेऊन धावले. त्यावर सिन्हा त्यांना म्हणाले, “मी वेळेचा खूप पक्का असल्यामुळेच मला या चित्रपटात घेतलं आहे. माझ्यात ती प्रतिभा आहे.” त्यावर शशीजी म्हणाले, “पाहा, हे बोलताना या माणसाला लाज सुद्धा वाटत नाही” अर्थात हा प्रकार केवळ गंमत म्हणून घडला होता. अवश्य पाहा - ‘माझ्याही घरावर ईडीनं धाड टाकावी’; मराठी दिग्दर्शक झाला रातोरात श्रीमंत यापुढे शत्रूघ्न सिन्हा म्हणाले, “खरं तर मी मुद्दाम उशिरा जात नव्हतो. मला वाटायचं माझा व्यायाम वेळेवर पूर्ण झाला पाहिजे. जर 9 ची शिफ्ट असेल तर मी 12 वाजता पोहोचायचो. पण माझी स्मरणशक्ती खूप चांगली असल्याने मी माझे डायलॉग ताबडतोब पाठांतर करत होतो आणि पहिल्याच टेकमध्ये सीन शूट करून देत होतो. त्यावेळचा मी एकटा वन टेक आर्टिस्ट होतो. नाहीतर निर्मात्यांनी मला चित्रपटातून कधीच काढून टाकलं असतं.” हा किस्सा सांगताना शत्रूघ्न सिन्हा शशी कपूर यांच्या आठवणीनं भावूक झाले होते.
    Published by:Mandar Gurav
    First published:

    Tags: Amitabh Bachchan, Bollywood News, Shatrughan sinha

    पुढील बातम्या