मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /Aryan Khan Case: NCB च्या हाती लागले आर्यनचे ड्रग्ससंबंधी व्हॉट्सऍप चॅट्स; बॉलिवूड अभिनेत्रीशी साधला होता संवाद

Aryan Khan Case: NCB च्या हाती लागले आर्यनचे ड्रग्ससंबंधी व्हॉट्सऍप चॅट्स; बॉलिवूड अभिनेत्रीशी साधला होता संवाद

आर्यन खानला अटक केल्यानंतर आता NCB ने आता ड्रायव्हरला समन्स बजावला असून चौकशी करता हजर राहण्याची सूचना देण्यात आली आहे.

आर्यन खानला अटक केल्यानंतर आता NCB ने आता ड्रायव्हरला समन्स बजावला असून चौकशी करता हजर राहण्याची सूचना देण्यात आली आहे.

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानच्या (Shahrukh Khan) मुलाच्या ड्रग्स प्रकरणावर आज कोर्टात सुनावणी होणार आहे.

मुंबई, 20ऑक्टोबर- बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानच्या (Shahrukh Khan) मुलाच्या ड्रग्स प्रकरणावर आज कोर्टात सुनावणी होणार आहे. तत्पूर्वी NCBच्या हाती काही चॅट्स लागले आहेत. त्यामुळे आर्यन खानच्या (Aryan Khan Drugs Case) अडचणी वाढताना दिसत आहेत. यामध्ये आर्यनने एका नवोदित अभिनेत्रीसोबत ड्रग्ससंबंधी चॅट केल्याचं समोर येत आहे.

शाहरुख खानच्या मुलाला क्रूझ ड्रग्स प्रकरणात अटक झाल्यापासून सर्वांचं लक्ष या प्रकरणाकडे लागून आहे. मात्र या केसचा निकाल पुढे ढकलण्यात आला होता. मात्र आज २० ऑक्टोबर रोजी या प्रकरणाची सुनावणी होणार आहे. तत्पूर्वी कोर्टात NCBने पुराव्याअंतर्गत काही चॅट्स सादर केले होते. यामध्ये एका बॉलिवूड नवोदित अभिनेत्रीसोबतच आर्यन खानचेही चॅट्स असल्याचं समोर आलं आहे. यामध्ये आर्यन खानने या अभिनेत्रीसोबत ड्रग्ससंबंधी संवाद साधल्याचं म्हटलं जात आहे. NCB च्या दाव्यानुसार, आर्यन खान आणि या नवोदित अभिनेत्रीमध्ये ड्रग्ससंबंधी बोलणं सुरु होतं. हे सर्व पुरावे NCBने कोर्टात सादर केले आहेत.

मागील सुनावणीमध्ये काय झालं होतं-

नारकोटिक्स कंट्रोल ब्युरो अर्थातच (NCB) ने विशेष न्यायालयात आर्यन खानच्या(Aryan Khan Drug Case) जामीन अर्जाला विरोध सुरूच ठेवला होता. NCB कडून सांगण्यात आलं कि, हाती लागलेल्या पुराव्यांनुसार बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खानचा मुलगा तीन वर्षांपासून ड्रग्सचा नियमित ग्राहक आहे. तसेच NCB ने पुढं म्हटलं, की त्याचा मित्र अरबाज मर्चंटला काँट्राबँडवर बंदी असल्याचे आढळले.हे दोघेही त्याचा वापर करत होते. त्यामुळे जामीन मंजूर केला जाऊ नये असं त्यांनी म्हटलंहोतं. कारण खान पुराव्यांशी छेडछाड करू शकतो आणि साक्षीदारांवर प्रभाव टाकू शकतो, असं ”एनसीबीने न्यायालयात सांगितल होतं.

३ ऑक्टोबर रोजी शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला एका हायप्रोफाईल क्रूझवरील रेव्ह पार्टीमध्ये अटक करण्यात आली होती. या ड्रग्स प्रकरणामुळे आर्यनसह इतर ७ जणांना कस्टडीत ठेवण्यात आलं आहे. सध्या आर्यन खानच्या प्रकरणावर कोर्टात सुनावणी सुरु आहे. मात्र त्याला जामीन अजूनही मिळाला नाही. आज या प्रकरणावर सुनावणी होणार आहे. त्यामुळे शाहरुख खान आणि त्याचं कुटुंब प्रचंड तणावाखाली आहे.

First published:
top videos

    Tags: Entertainment, Shahrukh khan