• Home
 • »
 • News
 • »
 • entertainment
 • »
 • ओळखलं का फोटोतील 'या' चिमुकलीला? आज आहे बॉलिवूडची लोकप्रिय गायिका

ओळखलं का फोटोतील 'या' चिमुकलीला? आज आहे बॉलिवूडची लोकप्रिय गायिका

आपल्याला बॉलिवूड कलाकारांच्या बालपणाबद्दल जाणून घेण्याची फारच उत्सुकता असते. आज आपण अशाच एका कलाकाराबद्दल पाहणार आहोत जिने आपल्या गोड आवाजाने सर्वांनाच मंत्रमुग्ध केलं आहे.

 • Share this:
  मुंबई, 20ऑक्टोबर- बॉलिवूड (Bollywood) कलाकार असो किंवा सर्वसामान्य लोक सर्वांचं बालपण हे एखसारखंच असतं. प्रत्येक व्यक्ती आपल्या बालपणात त्याच त्याच गोष्टी करत असतो. प्रत्येक व्यक्तीला आपल्या आई वडिलांकडून तसेच धम्मक लाडूदेखील मिळालेले असतात. त्यामुळे आपल्या सर्वांच्या बालपणात काहीच अंतर नसतं. पण तरीसुद्धा आपल्याला बॉलिवूड कलाकारांच्या बालपणाबद्दल जाणून घेण्याची फारच उत्सुकता असते. आज आपण अशाच एका कलाकाराबद्दल पाहणार आहोत जिने आपल्या गोड आवाजाने सर्वांनाच मंत्रमुग्ध केलं आहे. या फोटोमध्ये दिसणाऱ्या चिमुकलीला आपण ओळखलं का? नसेल तर चला आम्ही तुम्हाला सांगतो.
  या फोटोमध्ये दिसणारी ही चिमुकली आज आपल्या गोड गळ्याने बॉलिवूडवर राज्य करते, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. या अभिनेत्रीने आजपर्यंत अनेक पुरस्कार आपल्या नावावर करत आपलं एक विशेष स्थान निर्माण केलं आहे. या फोटोमध्ये दिसणारी ही चिमुकली इतर कोणी नसून आपल्या सर्वांची लाडकी श्रेया घोषाल (Shreya Ghoshal)आहे. काही महिन्यांपूर्वी श्रेया घोषालने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केलेला हा फोटो प्रचंड प्रमाणात पसंत केला गेला होता. श्रेया घोषाल ही बॉलिवूडमधील आघाडीची पार्श्वगायिका आहे. श्रेयाने फारच कमी वयात या क्षेत्रात काम करण्यास सुरुवात केली होती. अगदी कमी वाईट तिने फार मोठं यश मिळवलं होतं. आपल्या आवाजाने तिनं अनेक वर्षे बॉलिवूडवर राज्य केलं आहे. आजही तिच्या आवाजाचा जादू कायम आहे. नुकताच तिने दिवंगत अभिनेता सिद्धार्थ शुक्ला आणि शेहनाज गिल यांच्या शेवटच्या गाण्याला आपला आवाज दिला आहे. त्यांचं 'अधुरा '(हॅबिट) हे गाणं २१ ऑक्टोबरला रिलीज होणार आहे. (हे वाचा:DDLJ: 'राज-सिमरन'च्या केमिस्ट्रीची 26 वर्षे पूर्ण!सैफला मिळाली होती ऑफर) अशा या प्रसिद्ध गायिकेचा जन्म एका बंगाली कुटुंबात झाला होता. राजस्थानमधील कोटाजवळील एक छोटंसं गाव असणाऱ्या रावतभाटामध्ये ती लहानाची मोठी झाली. या गायिकेचा जन्म एका अतिशय सुशिक्षित कुटुंबात झाला होता. त्यामुळे तिच्या शालेय शिक्षणासोबतच गायन-वादनाच शिक्षणदेखील झालं होतं. तिचे वडील 'भाभा परमाणू अनुसंसाधन केंद्रात' एक इंजिनियर म्हणून काम करत होते. तसेच श्रेयाच्या आईने साहित्य क्षेत्रात पदवी घेतली होती. वयाच्या चौथ्या वर्षांपासूनचं ती आपल्या आईसोबत हार्मोनियमवर गाणं गात होती. त्यांनतर तिने रीतसर भारतीय शास्त्रीय संगीताचं शिक्षण घेतलं आहे. (हे वाचा:VIDEO:देवीच्या दर्शनासाठी आलेल्या काजोल आणि तनिषामध्ये लागलं भांडण; आईला करावी..) श्रेयाने आपल्या करियरची सुरुवात 'सारेगमपा' या रिऍलिटी शोमधून केली होती. तिने पहिल्यांदा लहान मुलांच्या या शोमधून स्पर्धक म्हणून टीव्हीवर एंट्री केली होती. हा लिटिल चॅम्पचा 'किताब तिने आपल्या नावावर केला होता. त्यांनतर ती मोठ्या मुलांच्या सारेगमपा'मध्येही सहभागी झाली होती. त्यावेळी तिने संजय लीला भन्साळी यांचं लक्ष आपल्याकडे खेचलं होतं. आणि तिला पहिला मोठा ब्रेक मिळाला होता. या गायिकेने 'देवदास'मध्ये ऐश्वर्या रॉयसाठी आपला आवाज दिला होता. त्यांनतर तिने कधीही मागे वळून पाहिलं नाही. श्रेयाने आपल्या कारकिर्दीत राष्ट्रीय पुरस्कार,फिल्मफेयर,आयफा, झी सिने अवॊर्ड असे अनेक पुरस्कार पटकावले आहेत.
  Published by:Aiman Desai
  First published: