जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / 'हर हर महादेव'मध्ये राज ठाकरेंचा आवाज ऐकलात; आता पाहा कसं केलं रेकॉर्डिंग, इनसाइड Video आला समोर

'हर हर महादेव'मध्ये राज ठाकरेंचा आवाज ऐकलात; आता पाहा कसं केलं रेकॉर्डिंग, इनसाइड Video आला समोर

राज ठाकरे

राज ठाकरे

हर हर महादेव हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर हिट ठरत असताना राज ठाकरे यांनी सिनेमासाठी त्यांचा आवाज कसा रेकॉर्ड केला याचा एका व्हिडीओ समोर आला आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई,  28 ऑक्टोबर : मागच्या अनेक महिन्यांपासून चर्चेत असेलला हर हर महादेव या सिनेमाची सर्वत्र चर्चा सुरू आहे. हर हर महादेव हा मराठीतली पहिला बहुभाषिक सिनेमा ठरला आहे. सिनेमाचा टीझर प्रदर्शित झाल्यापासूनच प्रेक्षकांमध्ये सिनेमा पाहण्यासाठी उत्सुकता होती. याच कारण छत्रपती शिवाजी महाराजांचा सिनेमा हे तर होतचं मात्र त्याचप्रमाणे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा आवाज सिनेमाला लाभला. राज ठाकरेंच्या बुलंद आवाजातील टीझर प्रदर्शित होताच सिनेमाची एकच चर्चा सर्वत्र सुरू झाली होती.  अखेर दिवाळीच्या मुहूर्तावर 25 ऑक्टोबरला सिनेमा सर्वत्र प्रदर्शित झाला. सिनेमा बॉक्स ऑफिसवर हिट ठरत असताना राज ठाकरे यांनी सिनेमासाठी त्यांचा आवाज कसा रेकॉर्ड केला याचा एक व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच प्रसिद्ध होताना दिसतोय. झी टॉकिजच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवरून हर हर महादेवच्या ट्रेलर राज ठाकरेंच्या आवाजात कसा शुट करण्यात आला याचा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. “जेव्हा सह्याद्रीला कणा नव्हता आणि मराठीला बाणा नव्हता” या दमदार वाक्यांसह राज ठाकरेंचा बुलंद आवाज कानावर पडतो आणि अंगावर काट उभा राहतो.  राज ठाकरेंचा आवाज सिनेमातही ऐकायला मिळतोय.  हर हर महादेव हा सिनेमा मराठीसह हिंदी, तमिळ, तेलुगू आणि मल्याळम भाषेत प्रदर्शित झाला आहे. व्हॉइस ऑव्हर देण्याची राज ठाकरेंची ही काही पहिली वेळ नाही. याआधीही त्यांनी शिवसेनेच्या काही कॅम्पेनसाठी व्हॉइस ओव्हार दिला होता. मात्र त्यांनी आवाज दिलेल्या पहिल्याच फिल्मवर बंदी आणण्यात आली होती. हेही वाचा - राज ठाकरेंनी पुन्हा साधलं टायमिंग; आतापर्यंतची सर्वात दिलखुलास मुलाखत, पाहा Video

जाहिरात

हर हर महादेव सिनेमाच्या प्रीमियर वेळी अभिनेता सुबोध भावेनं राज ठाकरेंची मुलाखत घेतली होती. या मुलाखतीत बोलताना राज ठाकरेंनी याचा खुलासा केला होता.  राज ठाकरे म्हणाले होते,  ‘2004 साली मी शिवसेनेचं कॅम्पेन केलं होतं. आम्ही 9 फिल्म्स केल्या होत्या. त्या सर्व फिल्म्सला माझे मित्र अजित भुरे यांनी आवाज दिला होता. एक अॅड फिल्म मुंबईतील दहशतवादी बॉम्ब हल्ल्याची होती. ती निवडणूक आयोगाने रद्द केली होती. त्या शॉर्ट फिल्मला सुरुवातीला एक मुंबई असा शब्द होता. फक्त तोच शब्द माझ्या आवाजाचा होता. इतर सर्व आवाज अजित भुरे यांचा होता’. राज ठाकरे पुढे म्हणाले, ‘सर्व फिल्मस तयार झाल्यानंतर बाळासाहेबांनी सर्व नऊ फिल्म बघितल्या आणि मुंबई हे कोण बोललं ते विचारंल. तर अजित म्हणाले राजा बोलला. सगळ्या नऊच्या नऊ फिल्म्सला तुझा आवाज द्यायचा, असं बाळासाहेबांनी मला सांगितलं. त्यावेळी व्हाईस ओव्हर कसा द्यायचा ते शिकायला मिळाला’.

News18लोकमत
News18लोकमत

हर हर महादेव या सिनेमात मराठी सिनेसृष्टीतील अनेक कलाकारांची दांडगी फौज पाहायला मिळत आहे. अभिनेता शरद केळकरनं बाजीप्रभू देशपांडेची भूमिका साकारली आहे तर अभिनेता सुबोध छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत आहे. तसंच अभिनेत्री सायली संजीव, अमृता खानविलकर, निशिगंधा वाड, नितीश चव्हाण, किशोर कदम, अशोक शिंदे, हार्दिक जोशी हे कलाकारही महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.  हर हर महादेव हा सिनेमा 25 ऑक्टोबरला प्रदर्शित झाला आहे. सिनेमानं तीन दिवसात जवळपास 7 करोडचं कलेक्शन केलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात