जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / राज ठाकरेंनी पुन्हा साधलं टायमिंग; आतापर्यंतची सर्वात दिलखुलास मुलाखत, पाहा Video

राज ठाकरेंनी पुन्हा साधलं टायमिंग; आतापर्यंतची सर्वात दिलखुलास मुलाखत, पाहा Video

राज ठाकरेंनी पुन्हा साधलं टायमिंग; आतापर्यंतची सर्वात दिलखुलास मुलाखत, पाहा Video

आज अभिनेता सुबोध भावेंनी राज ठाकरेंची मुलाखत घेतली. ही मुलाखत राज ठाकरेंची वेगळी होती.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 16 ऑक्टोबर : आज अभिनेता सुबोध भावेंनी राज ठाकरेंची मुलाखत घेतली. ही मुलाखत राज ठाकरेंची वेगळी होती. अत्यंत दिलखुलासपणे सुबोध भावेंनी विचारलेल्या प्रश्नांची राज ठाकरेंनी उत्तर दिली. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ‘हर हर महादेव’ या चित्रपटात आवाज दिला आहे. यानिमित्ताने सुबोध भावेंनी राज ठाकरेंनी मुलाखत घेतली. या मुलाखतीत राज ठाकरेंनी चित्रपटाविषयी असलेली आपली पॅशन व्यक्त केली. आपल्या आयुष्याचा आणि चित्रपटाचं नातं त्यांनी यावेळी विशद केलं. गांधी हा चित्रपट त्यांना भारावून टाकणारा होता. तब्बल 32 वेळी त्यांनी हा चित्रपट पाहिल्याची कबुली दिली.

पहिल्यांदा वॉइसओव्हर दिलेल्या चित्रपटाबद्दल राज म्हणाले… “मला पहिल्यांदा व्हाईस ओव्हर 2003 साली केलं. तेव्ही मी बाबासाहेब पुरंदरेंची रायगडावर मुलाखत घेतली होती. व्हाईस ओव्हर देणं हे माझं कधी काम नव्हतं. मी तसा कधी विचारही केला नव्हता. 2003 साली मुलाखतीत बोललो होतो. पण त्या बोलण्याला अर्थ नव्हतं. कारण ते वाचण्यासारखंच होतं. 2004 साली मी शिवसेनेचं कॅम्पेन केलं होतं. आम्ही 9 फिल्म्स केल्या होत्या. त्या सर्व फिल्म्सला माझे मित्र अजित भुरे यांनी आवाज दिला होता. एक अॅड फिल्म मुंबईतील दहशतवादी बॉम्ब हल्ल्याची होती. ती निवडणूक आयोगाने रद्द केली होती. त्या शॉर्ट फिल्मला सुरुवातीला एक मुंबई असा शब्द होता.

फक्त तोच शब्द माझ्या आवाजाचा होता. इतर सर्व आवाज अजित भुरे यांचा होता. सर्व फिल्मस तयार झाल्यानंतर बाळासाहेबांनी सर्व नऊ फिल्म बघितल्या आणि मुंबई हे कोण बोललं ते विचारंल. तर अजित म्हणाले राजा बोलला. सगळ्या नऊच्या नऊ फिल्म्सला तुझा आवाज द्यायचा, असं बाळासाहेबांनी मला सांगितलं. त्यावेळी व्हाईस ओव्हर कसा द्यायचा ते शिकायला मिळाला. अभिनेते शरद केळकर यांचं वॉईस ओव्हरमध्ये केवढं काम आहे. ती गोष्ट मला अजित भोरे यांनी शिकवलं”, असं राज ठाकरे म्हणाले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात