मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Anshuman Jha- Sierra Winters: 'मस्तराम' फेम अभिनेत्याचं ठरलं लग्न; अमेरिकेत विवाहसोहळा तर भारतात पार पडणार रिसेप्शन

Anshuman Jha- Sierra Winters: 'मस्तराम' फेम अभिनेत्याचं ठरलं लग्न; अमेरिकेत विवाहसोहळा तर भारतात पार पडणार रिसेप्शन

मस्तराम सिरीजमुळे अंशुमन झा या अभिनेत्याला बरीच लोकप्रियता मिळाली. सध्या अंशुमनच्या लग्नाच्या बातमीने तो चर्चेत येत आहे.

मस्तराम सिरीजमुळे अंशुमन झा या अभिनेत्याला बरीच लोकप्रियता मिळाली. सध्या अंशुमनच्या लग्नाच्या बातमीने तो चर्चेत येत आहे.

मस्तराम सिरीजमुळे अंशुमन झा या अभिनेत्याला बरीच लोकप्रियता मिळाली. सध्या अंशुमनच्या लग्नाच्या बातमीने तो चर्चेत येत आहे.

  मुंबई 10 ऑगस्ट: लॉकडाउनच्या काळात आलेल्या ‘मास्तरं’ वेबसिरीजमुळे अभिनेता अंशुमन झा ला प्रचंड लोकप्रियता मिळाली. सध्या या अभिनेत्याच्या पर्सनल आयुष्यातून एक मोठा अपडेट समोर आला आहे. हा अभिनेता या वर्षी विवाहबद्ध होण्यासाठी सज्ज झाला आहे. आपली गर्लफ्रेंड सिएरा विंटर्ससोबत तो विवाहबद्ध होणार असून त्यांचा हा भव्यदिव्य लग्नसोहळा अमेरिकेत तर रिसेप्शन पार्टी भारतात पार पडणार असल्याचं सांगण्यात येत आहे. तसंच हे दोघे हनिमूनला अलास्का येथे जाणार असल्याची माहितीसुद्धा समोर येत आहे. अंशुमन आणि सिएरा हे दोघे अनेक वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत. त्यांनी 2020 मध्ये साखरपुडा सुद्धा केला. अंशुमन अनेकदा गर्लफ्रेंडसोबतचे खास क्षण इन्स्टाग्रामवर शेअर करत असतो. दोघांनी नुकतीच रिलेशनशिपची ऍनिव्हर्सरी सुद्धा साजरी केली. दोघांनी साखरपुडा केल्यानंतर आलेल्या मोहरीच्या संकटामुळे सगळं सुरळीत होईपर्यंत थांबायचा निरयन घेतला आणि आता परिस्थिती सुधारत असल्याचं बघून हे कपल लग्नगाठ बांधायला सज्ज झालं आहे. अंशुमन आणि सिएरा यावर्षी ऑक्टोबर महिन्यात अमेरिकेत लग्न करतील असं सांगण्यात येत आहे. 29 ऑक्टोबर ही त्यांच्या लग्नाची तारीख असल्याचं समजत आहे. तसंच हे कपल मार्च 2023 मध्ये भारतात सुद्धा जंगी विवाहसोहळा प्लॅन करताना दिसत आहे. हे ही वाचा- Raju Srivastav Heart Attack: कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांची Angiography सक्सेस; उपचारांना प्रतिसाद सिएरा मागच्याच वर्षी भारतात शिफ्ट झाली असून सध्या दोन्ही कुटुंबीय विजा प्रक्रिया आणि येण्या-जाण्याच्या इतर गोष्टींच्या तयारीमध्ये दिसून येत आहे. अमेरिकेत लग्न केल्यावर पुढच्या वर्षी दोघे भारतीय पद्धतीने लग्नबंधनात अडकणार आहेत. सिएराला स्वतः भारतीय पद्धतीने लग्न करायची इच्छा असल्याचं अंशुमनने सांगितलं आहे. त्यामुळे दोघेही हिंदू रीती-रिवाजाप्रमाणे लग्न करणार असल्याचं कळत आहे.
  अंशुमन हवर्क फ्रंटवर बराच सक्रिय आहे. त्याला मस्तराम या वेबसीरिजने बरीच लोकप्रियता मिळवून दिली. अंशुमन गेली अनेकवर्ष सिनेक्षेत्रात कार्यरत आहे. सिएरा सुद्धा अभिनेत्री असून तिच्या सिनेमाच्या तयारीत ती गुंतली आहे. तर अंशुमन येत्या काळात ‘लकडबग्गा’ नावाच्या सिनेमात दिसणार आहे.
  Published by:Rasika Nanal
  First published:

  Tags: Actor, Bollywood News, Web series

  पुढील बातम्या