मुंबई, 10 ऑगस्ट : प्रसिद्धा कॉमेडियन आणि अभिनेते तसेच उत्तर प्रदेश चित्रपट विकास परिषदेचे अध्यक्ष राजू श्रीवास्तव यांना आज सकाळी हृदयविकाराचा इटका आल्यानं त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सकाळी जीममध्ये वर्क आऊट करत असताना त्यांना हा झटका आला. राजू श्रीवास्तव यांच्या प्रकृतीसंबंधी अपडेट समोर आली असून ANIने दिलेल्या माहितीनुसार, ते डॉक्टरांच्या उपचारांना प्रतिसाद देत आहेत. हृदयविकाराचा झटका आल्यानंतर राजू यांना त्वरित दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. राजू श्रीवास्तव यांच्यावर उपचार सुरू होते मात्र त्यांच्या प्रकृतीत कोणतीही सुधारणा नसल्याची माहिती समोर आली होती हृदयविकाराचा झटका आल्यानंतर राजू श्रीवास्तव बेशुद्ध झाले. त्यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांची एन्जिओग्राफी करण्यात आली. त्यानंतर मात्र ते उपचारांना प्रतिसाद देत आहेत. मात्र त्यांना पुढचे काही दिवस डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात येणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राजू श्रीवास्तव यांचे कुटुंबीय मुंबईहून दिल्लीला पोहोचले आहेत. आज सकाळी वर्कआउटदरम्यान ही घटना घडली. राजू श्रीवास्तव वर्कआउट करत होते. परंतु अचानक ते ट्रेडमिलवरुन खाली पडले. त्यांनतर त्यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सध्या राजू श्रीवास्तव यांची प्रकृती स्थिर असल्याचं सांगण्यात आलं होतं. त्यांना 48 तास डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवलं जाणार आहे. त्यांच्या प्रकृतीबाबत त्यांच्या चाहत्यांनी चिंता व्यक्त केली होती. मात्र आता चाहत्यांची प्रार्थना फळाली आली असं म्हणायला हरकत नाही.
#UPDATE | Comedian Raju Srivastava's angioplasty has been done at AIIMS Delhi. He is responding to the treatment: Sources
— ANI (@ANI) August 10, 2022
कॉमेडियन सुनिल पाल यांनं एन्स्टाग्रामवर राजू श्रीवास्तव यांच्या प्रकृतीबाबत एक व्हिडीओ शेअर केला. त्यांनी म्हटलंय, राजू श्रीवास्तव यांना हृदयविकाराचा झटका आलं हे खरं आहे. त्यांना दिल्लीच्या एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांची प्रकृती ठिक असून त्यांच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी यासाठी सर्वांनी प्रार्थना करा. काही महिन्यांपूर्वी कॉमेडीयन सुनिल ग्रोवरला देखील अशाच प्रकारे हृदयविकाराचा झटका आला होता. अनेक महिने कॉमेडियन टेलिव्हिजनपासून दूर होता. मात्र उपचारांती सुनील ग्रोवर बरा झाला असून त्यानं टेलिव्हिजनवर कमबॅक केलं आहे.