पुन्हा सुरू झाली 'अॅक्शन'! लोकप्रिय मालिकांचं आणि चित्रपटांचं शूटिंग या जिल्ह्यात झालं सुरू

पुन्हा सुरू झाली 'अॅक्शन'! लोकप्रिय मालिकांचं आणि चित्रपटांचं शूटिंग या जिल्ह्यात झालं सुरू

Coronavirus च्या लॉकडाऊननंतर प्रथमच काही मालिकांच्या शूटिंगला परवानगी मिळाली आहे. मुंबईत अद्याप शूटिंग बंद असलं तरी या जिल्ह्यात सुरू झालं आहे.

  • Share this:

सातारा, 24 जून : Coronavirus च्या महासाथीत लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या चित्रपट, मालिकांच्या शूटिंगला सातारा जिल्ह्यात हिरवा कंदिल मिळाला आहे. जिल्हाधिकारी शेखरसिंह यांनी काही नियम आणि अटींसह चित्रीकरणास परवानगी दिली आहे. त्यामुळे झी मराठी वाहिनीवरील ‘मिसेस मुख्यमंत्री’ आणि ‘टोटल हुबलाक’ या दोन मालिकांच्या चित्रीकरणास प्रत्यक्ष सुरुवात देखील झाली आहे.

जिल्ह्यातील विशेषतः पाटण, वाई, जावळी आणि महाबळेश्वर या तालुक्यांमधील काही ‘लोकेशन्स’ निर्माते आणि दिग्दर्शकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू आहेत. पाटणमधील कोयना धरण परिसर, नेहरू गार्डन, घाटमाथा, वनकुसवडे, खळे, बनपुरी इथे शूटिंग स्पॉट्स आहेत. महाबळेश्वरमधील अनेक पॉईंट्स, पाचगणी शहरामधील टेबललँड, शाळा, तापोळ्यामधील बोटिंग पॉईंट्स त्याचसोबत जावळीचं खोरं हे शूटिंगसाठी सुप्रसिद्ध आहे. ऐतिहासिक वाई शहर, धोम धरण, मेणवली, वरखेडवाडी ही ठिकाण देखील काही निर्मात्यांच्या पसंतीस उतरली आहेत.

जुन्या काळातील निर्माते आणि कलाकार तर आहेतच, परंतु अलीकडील काही वर्षांमधील प्रकाश झा, विशाल भारद्वाज, आशुतोष गोवारीकर, अरबाज खान, प्रभुदेवा, महेश कोठारे, या दिग्दर्शकांचा साताऱ्याकडे विशेष ओढा आहे. सरगम, मदर इंडिया, ओमकारा, गंगाजल, राजनीति, स्वदेस, मंगल पांडे, बाजीराव मस्तानी, दबंग टू आणि थ्री, चेन्नई एक्सप्रेस, तारे जमीन पर अशा चित्रीत झालेल्या चित्रपटांची नाव न संपणारी आहेत. तर झी मराठी या वाहिनीवरील लागीर झालं जी, मिसेस मुख्यमंत्री, टोटल हुबलाक या मालिकांचे चित्रीकरण जिल्ह्यामध्ये झाले.

हे आहेत नवे शूटिंगचे नियम

चित्रिकरण प्रक्रियेमध्ये सामील असणाऱ्या प्रत्येकाने मास्क आणि पूर्ण शूटींग दरम्यान ग्लोज वापरणे बंधनकारक.

चित्रिकरणाच्या संपुर्ण प्रक्रियेदरम्यान सामाजिक अंतर पाळणे सक्तीचे.

हस्तांदोलन, मिठी मारणे अशा प्रकारची सर्व कृत्ये करणेस मनाई.

दोन व्यक्तींमध्ये कमीत कमी एक मीटर अंतर.

65 वर्षावरील व्यक्तींना चित्रीकरण प्रक्रियेत समाविष्ट करणेस मनाई.

चित्रिकरणादरम्यान लग्न समारंभ, पूजा, सण, उत्सव, सामूहिक नृत्ये अशा गोष्टी करण्यास मज्जाव.

केश रचना व मेकअपसाठी डिस्पोजेबल वस्तू वापरणे.

चित्रिकरणाचे ठिकाणी थर्मल स्कॅनिंग, हॅन्डवॉश, सॅनिटायझर, यांची प्रवेशद्वारावर व्यवस्था बंधनकारक.

चित्रिकरणादरम्यान वापरात येणारे सर्व साहित्य उदा. – कॅमेरा, रिमोट, लाईट स्विच, स्क्रिप्ट पॅड, माईक, इलेक्ट्रिक सिस्टम इ. सर्व साहित्य वापरापूर्वी व वापरानंतर सॅनिटाईज करणे बंधनकारक.

स्वदेसपासून गंगाजलपर्यंत

जुन्या काळातील निर्माते आणि कलाकार तर आहेतच, परंतु अलीकडील काही वर्षांमधील प्रकाश झा, विशाल भारद्वाज, आशुतोष गोवारीकर, अरबाज खान, प्रभुदेवा, महेश कोठारे, या दिग्दर्शकांचा साताऱ्याकडे विशेष ओढा आहे. सरगम, मदर इंडिया, ओमकारा, गंगाजल, राजनीति, स्वदेस, मंगल पांडे, बाजीराव मस्तानी, दबंग टू आणि थ्री, चेन्नई एक्सप्रेस, तारे जमीन पर अशा चित्रीत झालेल्या चित्रपटांची नाव न संपणारी आहेत. तर झी मराठी या वाहिनीवरील लागीर झालं जी, मिसेस मुख्यमंत्री, टोटल हुबलाक या मालिकांचे चित्रीकरण जिल्ह्यामध्ये झाले.

'जे बोलतायेत ते करणार नाहीत का?', नेपोटिझमच्या वादावर आलिया भट्टच्या आईचा सवाल

जिल्ह्याला प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष रोजगार मिळवून देणारं हे क्षेत्र आहे. त्यात प्रामुख्याने शूटिंगसाठी लोकेशन्स शोधून देणे, स्थानिक स्तरावर हवी ती मदत मिळवून देण्यासाठी तरुणांनी स्वतःच्या पातळीवर तयार केलेली ‘एक खिडकी योजना’ ही निर्मात्यांना सोयीची वाटते. त्याचसोबत फोटोग्राफर, कॅमेरा सहाय्यक, सहाय्यक वेशभूषाकार, सहाय्यक केशभूषाकार, मेकअपमॅन/वुमॅन, प्रोडक्शन लेबर, साऊंड हेल्पर, लाईट हेल्पर, टेक्निकल सपोर्ट, स्थानिक डबिंग आर्टिस्ट, वॉटरबॉय या माध्यमातून स्थानिक तरुणांना रोजगार निर्मिती होते.

...जेव्हा स्वतःचाच सुपरहिट सिनेमा सुशांत टीव्हीवर पाहतो, समोर आला UNSEEN VIDEO

ज्या गावामध्ये चित्रीकरण आहे तेथील स्थानिक विकासाला मदत, चित्रीकरणाच्या मोबदल्यात ग्रामपंचायतीला आर्थिक स्वरूपात मदत देणे यामुळे तेथील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या उत्पन्नामध्ये वाढ होते. त्याचसोबत चित्रीकरणाच्या निमित्ताने जिल्ह्यात येणारे, चित्रीकरण पाहण्यासाठी येणारे प्रेक्षक यामुळे जिल्ह्याच्या पर्यटनामध्ये झालेली लक्षणील वाढ, अशा विविधांगी स्वरुपाचा फायदा जिल्ह्याला होतो.

‘टोटल हुबलाक’ या मालिकेचे चित्रीकरण सुरू केले आहे, असं अभिनेते किरण माने यांनीदेखील सांगितलं

(संकलन सौजन्य : DGIPR)

First published: June 24, 2020, 8:12 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading