मुंबई, 24 जून : अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या (sushant singh rajput) आत्महत्येनंतर बॉलीवूडमधील नेपोटिझमबाबत ( Bollywood Nepotism) जोरदार चर्चा सुरू झाली. काही सेलिब्रिटीदेखील यावर व्यक्त झालेत. यानंतर नेटिझन्सनी स्टार किड्सवर हल्लाबोल केला. यामध्ये अभिनेत्री आलिया भट्टचाही (Alia Bhatt) समावेश आहे. आलियावर ट्रोल गेल्यानंतर आलियाची आई सोनी राजदान (Soni Razdan) यांनी बॉलीवूडमधील नेपोटिझमवर पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. IANS याबाबत वृत्त दिलं आहे. बॉलीवूड नेपोटिझमवर दिग्दर्शक हंसल मेहता यांनी ट्विट केल्यानंतर सोनी राजदान यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. सोनी राजदान म्हणाल्या, “एखाद्या चर्चित व्यक्तीचा मुलगा किंवा मुलगी असल्यानंतर लोकांना तुमच्याकडून अपेक्षाही खूप असतात. जे लोक आज नेपोटिझमवर बोलत आहेत उद्या त्यांनाही मुलं होतील आणि जर त्यांना या क्षेत्रात यायचं असेल तेव्हा काय ते त्यांना रोखणार आहेत का?” हे वाचा - इरफान खानच्या मुलाची चाहत्यांसाठी पोस्ट- ‘नेपोटिझमचा बदला घ्या पण सुशांतला…’ सोनी यांनी दिग्दर्शक हंसल मेहता यांच्या ट्विटला सपोर्ट करताना ही प्रतिक्रिया दिली आहे.
हंसल मेहता यांनी ट्विट केलं होतं, नेपोटिझमबाबतचा हा वाद अधिक व्यापक असायला हवा. मेरिट सर्वात आधी पाहिलं जातं. माझ्या मुलाला या क्षेत्रात पाऊल ठेवलं दिलं गेलं माझ्यामुळे आणि का नाही. माझ्या सर्वश्रेष्ठ कामाचा तो एक भाग राहिला कारण तो टॅलेंटेड आहे, शिस्तप्रिय आहे आणि मेहनती आहे. माझ्यासारखेच गुण त्याच्यातही आहेत. माझा मुलगा आहे म्हणून नाही" संकलन, संपादन - प्रिया लाड