महाराष्ट्रात अनेक घरं अशी आहेत जिथ स्वामी समर्थ यांच्या नावात मानसिक समाधान आणि सुख भेटतं. हे लोक स्वामींना मनापासून मानतात आणि पूजतात. याच स्वामींचं ब्रीदवाक्य सुद्धा प्रसिद्ध आहे. ‘भिऊ नको मी तुझा पाठीशी आहे’ या वाक्यावर महाराष्ट्रातील सर्वांचीच श्रद्धा आहे. ‘अक्कलकोट’ या ठिकाणी वास्तव्यास असणाऱ्या स्वामींच्या छायेत कोणकोणती लोकं आली आणि कोणत्या लोकांना स्वामींनी सरळ मार्गावर आणलं. या सर्व गोष्टींचा उलघडा या मालिकेत केला आहे. ही मालिका डिसेंबरपासून कलर्स मराठीवर प्रक्षेपित होतं आहे. फारच कमी वेळेत या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात आपली जागा निर्माण केली आहे. हे वाचा - दत्ता सतत दारू का पितो?; ‘रात्रीस खेळ चाले’मध्ये येणार नवा ट्विस्ट मालिकेमध्ये येत्या बुधवारी म्हणजेच 14 फेब्रुवारीला एक विशेष भाग दाखविण्यात येणार आहे. या भागामध्ये आई अंबाबाईचा एक भक्त दाखविण्यात आला आहे. तो भक्त स्वामीनां नमस्कार करण्यास आढेवेढे घेतो. आणि फटकळपणे बोलतो की मी आई अंबाबाईचा भक्त आहे आणि तुमच्यात मला आईसारखं काहीच दिसत नाही मग मी तुम्हाला का नमस्कार करावा? यावर स्वामी शांतपणे स्मितहास्य करतात. आणि हातात कुंकू देऊन आई अंबाबाईचं नाव घेण्यास सांगतात. त्या भक्ताने अंबाबाईचं नाव घेताचं चक्क स्वामी आई अंबाबाईच्या रुपात अवतरतात. हे पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसतो. तर हा चमत्कार जय जय स्वामी समर्थच्या येत्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे. हे वाचा - ठरलं! बॅडमिंटनपटू ज्वाला गुट्टा, अभिनेता विष्णू विशाल या दिवशी करणार लग्न ही कथा शिरीष लाटकर यांनी लिहिली आहे. तर या मालिकेत स्वामी समर्थ यांची भूमिका साकारली आहे अभिनेता अक्षय मुडावदकर यांनी. याआधी त्यांनी स्वराज्य जननी जिजामाता या मालिकेत काम केलं आहे.View this post on Instagram
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Colors marathi, Entertainment, Instagram post, Marathi entertainment, Swami samarth, Tv serial