मुंबई, 12एप्रिल- ‘रात्रीस खेळ चाले’(Ratris khel chale) या रहस्यमयी मालिकेने मराठी प्रेक्षकांना अक्षरशः वेड लावलं होतं. या मालिकेचे दोन भाग होऊन गेले. या दोन्ही भागांना प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं आहे. याचं प्रेमामुळे रात्रीस खेळ चालेचं तिसरा भाग सुद्धा प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. दुसऱ्या भागानंतर या पात्रांसोबत काय झालं हे आता मालिकेत हळूहळू उलघडण्यात येतं आहे. सध्या दत्ताची(Datta) घरात एन्ट्री झाली आहे. दत्ता पूर्णपणे दारूच्या आहारी गेला आहे. दत्ताला या रुपात पाहून प्रेक्षक चांगलेच चकित झाले आहेत.
2016 मध्ये झी मराठीवर(zee marathi) ‘रात्रीस खेळ चाले’ ही मालिका प्रक्षेपित झाली होती. गूढ आणि रहस्यमयी असणारी ही कथा प्रेक्षकांना चांगलीच भावली होती. मालिकेतील अण्णा, माई, छाया, दत्ता, माधव, शेवंता, पांडू, रघु, वच्छी अशी सर्वच पात्रे तुफान गाजली होती.आणि हे पात्रे प्रत्येकांना तोंडपाठ सुद्धा झाली होती. मालिकेला लाभलेल्या या प्रचंड यशानंतर मालिकेचा दुसरा भागसुद्धा काढण्यात आला होता. त्यालासुद्धा पप्रेक्षकांनी तितकचं किंबहुना त्याच्यापेक्षाही जास्त प्रेम दिलं. त्यामुळेच आत्ता ‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेचा तिसरा भागसुद्धा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.
View this post on Instagram
मालिकेच्या दुसऱ्या भागामध्ये अण्णाचं खरं रूप दाखविण्यात आलं होतं. अण्णा कसा आपल्या गर्विष्ठ स्वभावाने गोरगरिबांवर अत्याचार करतो. त्या दुबळ्या लोकांचा जीव घेतो. तसेच माईला सोडून शेवंताच्या प्रेमात पडतो असं सर्वकाही मनोरंजक असं रंगविण्यात आलं होतं. ते प्रेक्षकांना भलतच पसंत पडलं होतं.
तर मालिकेच्या या तिसऱ्या भागात अण्णांनी केलेल्या पापांची शिक्षा त्याच्या मुलाबाळांना अख्या कुटुंबाला भोगावी लागत असल्याचं दाखविण्यात आलं आहे. गजबजलेला तो वाडा अगदी मातीला मिळाल्याचं दाखविण्यात आलं होतं. तसेच घरातील प्रत्येक सदस्यांच्या आयुष्याची पुरती वाट लागलेली आहे. अण्णांनी मारलेल्या निष्पाप जीवांची तळतळ अण्णाच्या अख्या कुटुंबाला लागली आहे. असं एकंदरीत चित्र तिसऱ्या भागात दाखविण्यात आलं आहे. हळूहळू मालिकेत एकेएक पात्रांची एन्ट्री होतं आहे. अभिरामच्या एन्ट्रीनंतर त्यानं वाड्याला थोडं पुनरुज्जीवन दिलेलं दिसून आलं. आत्ता पुनः एकदा वाड्यामध्ये नाईक कुटुंबांचं वास्तव्य सुरु झालं आहे. या वाड्यात आत्ता हळूहळू सर्व पात्रे येत आहेत.
(हे वाचा: आमिर खान ते दिया मिर्जा... या कलाकारांच्या आयुष्यात 'दुसऱ्या' प्रेमाने भरले रंग )
सध्या सोशल मीडियावर चर्चा सुरु आहे ती दत्ताची. साध्या सरळ असणाऱ्या दत्तालादारूचं इतकं व्यसन जडलं कसं हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. तिसऱ्या भागात दत्ता नेहमीचं दारूच्या नशेत गुंग असल्याचं दाखविण्यात आलं आहे. आत्ता दत्ताची सुद्धा वाड्यात एन्ट्री झाली आहे. दत्ताची ही अवस्था जाणून घेण्याकडे चाहत्यांचं लक्ष लागलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.