• Home
  • »
  • News
  • »
  • entertainment
  • »
  • Marathi Bigg Boss : 2 घटस्फोटानंतर 11 वर्षांनी लहान तरुणासोबत अफेअर; Sneha Wagh आहे तरी कोण?

Marathi Bigg Boss : 2 घटस्फोटानंतर 11 वर्षांनी लहान तरुणासोबत अफेअर; Sneha Wagh आहे तरी कोण?

वैवाहिक आयुष्यामुळे मराठी बिग बॉसची (Marathi bigg boss) स्पर्धक स्नेहा वाघ (Sneha wagh) चर्चेत आहे.

  • Share this:
मुंबई, 22 सप्टेंबर : बॉलिवूड, टीव्ही इंडस्ट्रीतले अभिनेते आणि अभिनेत्रींचं खासगी, तसंच वैवाहिक जीवन हा त्यांच्या फॅन्ससाठी विशेष उत्सुकतेचा आणि चर्चेचा विषय असतो. अनेक अभिनेते आणि अभिनेत्री आपल्या वैयक्तिक आयुष्यातल्या अनेक चांगल्या-वाईट घडामोडी आपल्या फॅन्ससोबत सोशल मीडियावरून (Social Media) शेअर करत असतात. तर काही रिअॅलिटी शोमधून उलगडतात. सध्या अशाच आपल्या खासगी आयुष्यामुळे रिअॅलिटी शोम मराठी बिग बॉसमध्ये (Big Boss Marathi) चर्चेत असलेली अभिनेत्री म्हणजे स्नेहा वाघ स्नेहा वाघ (Sneha Wagh). नुकताच बिग बॉस मराठीचा  तिसरा सीझन सुरू झाला आहे. हा सीझन अनेक कारणांनी चर्चेत आला आहे  (Sneha Wagh personal life). यात काही स्पर्धकांचा समावेश वादग्रस्तही ठरत आहे  (Sneha Wagh husband). या सीझनमधलं एक नाव सातत्यानं अनेक कारणांमुळे चर्चेत येत आहे आणि ते म्हणजे स्नेहा वाघ (Sneha Wagh divorce). या शोदरम्यान स्नेहाने तिच्या दोन अपयशी लग्नांचा उल्लेख केल्यानंतर ती सतत चर्चेत आहे. विशेष म्हणजे या सीझनमध्ये तिचा पहिला पती आविष्कार दारव्हेकर हादेखील स्पर्धक म्हणून सहभागी झाला आहे. अभिनेत्री स्नेहा वाघने अनेक हिंदी-मराठी मालिकांमध्ये भूमिका केल्या आहेत. ती हिंदी टीव्ही इंडस्ट्रीमधली (TV Industry) प्रसिद्ध अभिनेत्री (Actress) आहे. स्नेहाचा जन्म मुंबईत कल्याण येथे झाला. तिला लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती. वयाच्या 13 व्या वर्षापासून तिने मराठी नाटकांमध्ये काम करणं सुरू केलं. 'अधुरी एक कहाणी' या मराठी मालिकेत तिने महत्त्वपूर्ण भूमिका केली होती. त्यानंतर तिने हिंदी सिनेसृष्टीवर आपलं लक्ष केंद्रित केलं. इमॅजिन टीव्हीवरच्या 'ज्योती' या शोमुळे स्नेहा प्रसिद्धीच्या झोतात आली. या मालिकेत ती प्रमुख भूमिका साकारत होती. त्यानंतर 'चंद्रगुप्त मौर्य' या मालिकेत तिनं 'मूरा' हे पात्र साकारलं. त्यानंतर `वीरा` या मालिकेत ती मुख्य भूमिकेत दिसली. हे वाचा - Bigg Boss Marathi: स्नेहा वाघवर भडकली काम्या पंजाबी; ट्विट करत म्हटलं.. वयाच्या 19व्या वर्षी अभिनेता आविष्कार दारव्हेकरसोबत तिचा विवाह झाला; मात्र या नात्यात तिला शारीरिक आणि मानसिक छळाला सामोरं जावं लागलं, असं बोललं जातं. त्यानंतर तिने पहिल्या पतीपासून घटस्फोट (Divorce)घेतला. 2015 मध्ये स्नेहानं इंटीरिअर डिझायनर अनुराग सोळंकीसोबत दुसरं लग्न केलं; मात्र हे नातंही फार काळ टिकू शकलं नाही. लग्नानंतर 8 महिन्यांतच ती त्याच्यापासून वेगळी झाली. अनुराग आणि स्नेहाचा अद्याप अधिकृत घटस्फोट झालेला नसला तरी तो लवकरच होईल, असं स्नेहाचं म्हणणं आहे. दोन लग्नं असफल ठरल्यानंतर स्नेहा तिच्यापेक्षा 11 वर्षांनी लहान असलेल्या फैजलसोबत डेट करत असल्याची जोरदार आहे; मात्र ही अफवा असल्याचं दोघांनी स्पष्ट केलं आहे. नुकत्याच सुरू झालेल्या 'बिग बॉस मराठी'च्या तीसऱ्या सिझनमध्ये स्नेहा सहभागी झाली असून, यामुळं ती विशेष चर्चेत आली आहे. 'पुरुषांना मानसिकदृष्ट्या सक्षम स्त्रिया आवडत नाहीत', असं वक्तव्य स्नेहानं तिच्या दोन अयशस्वी लग्नांविषयी बोलताना केलं. शोदरम्यान घटस्फोटाविषयी भाष्य केल्यानं काम्या पंजाबी या टीव्ही अभिनेत्रीने तिच्यावर व्हिक्टिम कार्ड खेळल्याचा आरोप केला. ती असं बोलून खेळ खराब करत असल्याचं ट्विट तिने केलं होतं. हे वाचा - Bigg Boss15: 'ही' प्रसिद्ध बॉलिवूड गायिका बनणार 'बिग बॉस'ची स्पर्धक याशिवाय स्नेहाचं नच बलिए 9 चा (Nach Baliye 9) स्पर्धक राहिलेल्या फैजल खानसोबत (Faisal Khan) अफेअर असल्याचीही चर्चा रंगली होती. फैजल तिच्यापेक्षा 11 वर्षांनी लहान आहे. पण दोघांनीही ही अफवा असल्याचं म्हणत हे वृत्त फेटाळलं होतं. 'बिग बॉस मराठी'च्या तिसऱ्या सीझनमध्ये पहिला पती प्रतिस्पर्धी म्हणून असणं आणि वैवाहिक जीवनाविषयी सोशल मीडियात जोरदार चर्चा सुरू होणं, या कारणांमुळे अभिनेत्री स्नेहा वाघ पुढील काही दिवस तरी चर्चेच्या केंद्रस्थानी असेल हे नक्की.
First published: