• Home
 • »
 • News
 • »
 • entertainment
 • »
 • Bigg Boss Marathi: आपल्या दोन्ही अपयशी लग्नाबद्दल चर्चा करणाऱ्या स्नेहा वाघवर भडकली काम्या पंजाबी

Bigg Boss Marathi: आपल्या दोन्ही अपयशी लग्नाबद्दल चर्चा करणाऱ्या स्नेहा वाघवर भडकली काम्या पंजाबी

'बिग बॉस मराठी' च्या सध्या सुरु असलेल्या तिसऱ्या पर्वात अनेक ओळखीच्या चेहऱ्यांनी घरात प्रवेश केला आहे. यामध्ये अभिनेत्री स्नेहा वाघचासुद्धा समावेश आहे

 • Share this:
  मुंबई, 22 सप्टेंबर- बहुप्रतीक्षित शो 'बिग बॉस मराठी'(Bigg Boss Marathi 3) ला अखेर सुरुवात झाली आहे. १५ स्पर्धकांनी या घरात प्रवेश घेतला आहे. यामध्ये हिंदी मालिकांमध्ये काम करणारी मराठमोळी अभिनेत्री स्नेहा वाघचासुद्धा(Sneha Wagh) समावेश आहे. तर यामध्ये स्नेहाचा पहिला पती अविष्कार दारवेकरसुद्धा सहभागी झाला आहे. दरम्यान आपल्या दोन्ही अपयशी लग्नाबद्दल चर्चा करणाऱ्या स्नेहा वाघवर अभिनेत्री काम्या पंजाबी(Kamya Panjabi) भडकली आहे. 'बिग बॉस मराठी' च्या सध्या सुरु असलेल्या तिसऱ्या पर्वात अनेक ओळखीच्या चेहऱ्यांनी घरात प्रवेश केला आहे. यामध्ये अभिनेत्री स्नेहा वाघचासुद्धा समावेश आहे. स्नेहाने अनेक हिंदी मालिकांमध्ये काम केलं आहे. तिची 'ज्योती' हि मालिका विशेष गाजली होती. तर 'वीरा' या मालिकेतील तिची आईची भूमिका विशेष लोकप्रिय झाली होती. बिग बॉसच्या घरात प्रवेश केलेली स्नेहा प्रेक्षकांच्या ओळखीचा चेहरा आहे. मात्र त्याचं खाजगी आयुष्य तितकंच वादग्रस्त राहिलं आहे. बिग बॉसमध्ये येताच या स्पर्धकांनी आपल्या खाजगी आयुष्याबद्दल खुलासे करण्यास सुरुवात केली आहे. अशातच स्नेहाने बिग बॉसच्या घरात आपल्या लग्नाबद्दल असे काही जबाब दिले आहेत ज्यामुळे ती फारच चर्चेत आली आहे. मात्र स्नेहाच्या या वागणुकीवर प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री काम्या पंजाबी मात्र जॅम भडकली आहे. यावर तिने ट्विट करत स्नेहाला फटकारलं आहे. (हे वाचा:Bigg Boss Marathi: मीरा आणि स्नेहामध्ये जेवणावरून तुफान राडा; तर दुसरीकडे सोनाली) स्नेहाचा एक्स हजबंड अविष्कार दारवेकरसुद्धा या शोमध्ये सहभागी झाला आहे. त्यामुळे या दोघांच्या खाजगी आयुष्याबद्दल घरात चर्चा होणार हे निश्चित होतं. दरम्यान स्नेहाने आपल्या दोन्ही अपयशी लग्नाबद्दल बिग बॉसच्या घरात वादग्रस्त जबाब दिल्याने काम्या तिच नाराज झाली आहे. काम्या पंजाबीने ट्विट करत म्हटलं आहे, 'स्नेहा तुला या शोमध्ये यायचं होतं, तू आलीस. आता तू विक्टिम कार्ड का बनत आहेस. पहिल्या लग्नाबद्दल नाही माहिती. मात्र दुसऱ्या लग्नाबद्दल खोट्या गोष्टी नको. मी सत्य सांगू शक. तू इतकं घाणेरडं खेळू नकोस. गुड लक!' असं काम्याने ट्विटमध्ये म्हटलं आहे. काम्या स्वतः बिग बॉस हिंदी ७ ची विजेती आहे. काम्याच्या या ट्विटवर स्नेहाच्या दुसऱ्या पतीने ट्विट करत काम्याचे आभार मानले आहेत.
  Published by:Aiman Desai
  First published: