जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / अमृतानंतर 'या' अभिनेत्रीची 'हर हर महादेव' सिनेमात वर्णी; साकारणार महाराजांच्या पत्नीची भूमिका

अमृतानंतर 'या' अभिनेत्रीची 'हर हर महादेव' सिनेमात वर्णी; साकारणार महाराजांच्या पत्नीची भूमिका

सायली संजीव

सायली संजीव

हर हर महादेव हा सिनेमा 25 ऑक्टोबरला प्रदर्शित होणार आहे. सिनेमात अमृता नंतर आणखी एका अभिनेत्रीची वर्णी लागली आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई,  08 ऑक्टोबर : येत्या दिवाळीला बहुप्रतिक्षित हर हर महादेव हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सिनेमाचा टीझर प्रदर्शित झाला आहे. त्यानंतर सिनेमातील प्रमुख भूमिकेत असलेल्या कलाकारांची नावं आणि लुक समोर येत आहेत. अनेक मराठमोळ्या अभिनेत्री पहिल्यांदा यानिमित्तानं ऐतिहासिक भूमिकेत दिसणार आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचा शूर मावळा म्हणजेच बाजीप्रभू देशपांडे यांची वीर गाथा सांगणार दाखवणाऱ्या हर हर महादेव या सिनेमात अभिनेता शरद केळकर बाजीप्रभूंची भूमिका साकारणार आहे. तर अभिनेता सुबोध भावे प्रत्यक्ष शिवाजी महाराजांच्या भूमिकेत आहे. अभिनेत्री अमृता खानविलकर या सिनेमात असल्याची कालच घोषणा करण्यात आली त्यानंतर आत अभिनेत्री सायली संजीव देखील सिनेमात महत्त्वाची भूमिका साकारणार आहे. बाजीप्रभू देशपांडेच्या पत्नी सोनाबाई देशपांडेंची भूमिका अभिनेत्री अमृता खानविलकर साकारणार आहेत. तर शिवाजी महाराजांच्या पहिल्या पत्नी ‘महाराणी सईबाई भोसले’ यांच्या भूमिकेत अभिनेत्री सायली संजीवची वर्णी लागली आहे. सिनेमातील सायलीचा पहिला लुक समोर आला आहे. हर हर महादेवच्या निमित्तानं सायली देखील पहिल्यांदा ऐतिहासिक सिनेमात काम करणार आहे. हा सिनेमात मराठीसह पाच भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. या निमित्तानं सायली मराठीसह हिंदी, तमिळ , तेलुगू आणि कन्नड भाषिक लोकांपर्यंत पोहोचणार आहे. हेही वाचा - चंद्रमुखी फेम अमृता खानविलकर पहिल्यांदा ऐतिहासिक भूमिकेत; ‘हर हर महादेव’ मधील पहिला लुक आला समोर मनातील दु:ख चेहऱ्यावर न दाखवता नेहमी स्मित हास्याने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पाठिशी खंबीरपणे उभ्या राहणाऱ्या त्यांच्या अर्धांगिनी ‘महाराणी सईबाई भोसले’. त्यांच्या भूमिकेत अभिनेत्री सायली संजीव दिसणार आहे. सायली या भूमिकेसाठी प्रचंड खुश आहे. नुकताच गोष्ट एका पैठणीची या सिनेमाला सर्वात्कृष्ट मराठी सिनेमा म्हणून राष्ट्रीय पुरस्कार मिळालाय. सायलीने सिनेमात महत्त्वाची भूमिका साकारली आहे.

जाहिरात

हर हर महादेव या सिनेमात सायली अत्यंत सोज्वळ, सुंदर लुकमध्ये दिसतेय. सायलीला तिच्या नव्या सिनेमासाठी सर्वांकडून शुभेच्छा मिळत आहेत.

News18लोकमत
News18लोकमत

हर हर महादेव हा सिनेमा दिवाळीच्या मुहूर्तावर येत्या 25 ऑक्टोबरला संपूर्ण महाराष्ट्र तसेच देशात प्रदर्शित होणार आहे. मराठी, हिंदी, तमिळ, तेलुगू आणि कन्नड या ५ भाषांमधून हा सिनेमाच एकाच वेळी प्रदर्शित होणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात