मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

'हर हर महादेव' ठरला पहिला बहुभाषिक मराठी सिनेमा; यादिवशी येणार भेटीला

'हर हर महादेव' ठरला पहिला बहुभाषिक मराठी सिनेमा; यादिवशी येणार भेटीला

 महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास प्रेरणादायी आहे. महाराजांनी नेहमीच ‘स्वराज्य’ची शिकवण दिली आहे.

महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास प्रेरणादायी आहे. महाराजांनी नेहमीच ‘स्वराज्य’ची शिकवण दिली आहे.

महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास प्रेरणादायी आहे. महाराजांनी नेहमीच ‘स्वराज्य’ची शिकवण दिली आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Maharashtra, India
  • Published by:  Aiman Desai

मुंबई, 29  सप्टेंबर-   महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास प्रेरणादायी आहे. महाराजांनी नेहमीच ‘स्वराज्य’ची शिकवण दिली आहे. पश्चिम भारतातील मराठा साम्राज्याचे संस्थापक. छत्रपती शिवाजी महाराज जगभरातील महान योद्ध्यांपैकी एक आहेत. शौर्य, त्याग, मैत्री आणि अतूट संयमाची अशी कहाणी समोर आणणाऱ्या 'हर हर महादेव'च्या निर्मात्यांनी अखेर आपल्या पहिल्या बहुभाषिक मराठी चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे.

यंदाची दिवाळी प्रेक्षकांसाठी फारच खास असणार आहे. कारण येत्या 25 ऑक्टोबरला 'हर हर महादेव' हा बहुप्रतीक्षित चित्रपट प्रदर्शित होणार आहे. विविध भाषेत रिलीज होणार हा पहिला मराठी चित्रपट आहे. हा चित्रपट हिंदी, तेलुगू, तामिळ आणि कन्नड भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट सत्य ऐतिहासिक घटनेवर आधारित आहे. त्यामुळे प्रेक्षकांना पुन्हा एकदा लढतीचा चित्तथरारक अनुभव घेता येणार आहे.

या चित्रपटाच्या माध्यमातून 'स्वराज्य' मिळवण्यासाठी शौर्य, त्याग, मैत्री आणि अतूट संयमाची एक वेधक गाथा प्रेक्षकांसमोर मांडण्यात येणार आहे. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास येणाऱ्या प्रत्येक पिढीला शौर्य-साहस आणि स्वराज्याचं शिक्षण देण्यासाठी प्रेरणादायी आहे. त्यामुळे 'हर हर महादेव' हा चित्रपट प्रेक्षकांसाठी फारच खास असणार आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांनी 'हर हर महादेव' या युद्धाच्या घोषणेने आणि मराठा साम्राज्याचा पाया रचण्याच्या निष्ठेतून सर्वांना कसं एकत्र केलं हे या कथेतून सांगितलं जाईल. शिवाय, छत्रपती शिवाजी महाराजांचं व्यक्तिमत्त्व आजच्या पिढीतील प्रत्येक व्यक्तीसाठी प्रेरणादायी आणि मार्गदर्शक असं आहे. या बहुभाषिक रिलीजच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज पुन्हा एकदा फक्त महाराष्ट्रच नव्हे तर देशभरातील प्रेक्षकांपर्यंत पोहोचतील.

(हे वाचा: '#घरापासून-दूर'चा ट्रेंड नेमका काय? मराठमोळ्या ललित प्रभाकरने चाहत्यांना दिलं मोठं सरप्राईज)

या चित्रपटात मराठीतील अनेक दिग्गज कलाकार आपल्याला पाहायला मिळणार आहेत. विशेष म्हणजे मराठीतील लोकप्रिय अभिनेता सुबोध भावे छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत दिसणार आहे. नुकतंच या चित्रपटाचं पोस्टर समोर आलं होतं. हा चित्रपट पडद्यावर पाहण्यासाठी प्रेक्षक प्रचंड उत्सुक आहेत.

First published:

Tags: Entertainment, Marathi cinema, Marathi entertainment