• Home
  • »
  • News
  • »
  • entertainment
  • »
  • कंगना रणौतनंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल विक्रम गोखलेंच मोठं विधान

कंगना रणौतनंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल विक्रम गोखलेंच मोठं विधान

अभिनेते विक्रम गोखले यांच्या 75 व्या वाढदिवसानिमित्त ब्राह्मण महासंघाच्या वतीने सन्मान सोहळा आयोजित करणात आला आहे. यावेळी त्यांच्याकडून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कामचं कौतुक केलं. तसेच यावेळी शिवसेना भाजप युती तुटल्याबद्दल नाराजी देखील व्यक्त केली.

  • Share this:
पुणे, 14 नोव्हेंबर: अभिनेते विक्रम गोखले  (vikram gokhale)  यांच्या 75 व्या वाढदिवसानिमित्त ब्राह्मण महासंघाच्या वतीने सन्मान सोहळा आयोजित करणात आला आहे. पुण्यातील दुधाणे लॉन्स परिसरात हा सन्मान सोहळा सुरू आहे. यावेळी अभिनेते विक्रम गोखले यांनी देशाचं राजकरण तसंच सध्याच महाराष्ट्रातील राजकारण यावर भाष्य केलं. यावेळी त्यांच्याकडून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी  (pm narendra modi) यांच्या कामाचे कौतुक करण्यात आलं. जे 70 वर्षात झालं नाही ते मोदींनी केलं, असं विक्रम गोखले यावेळी म्हणाले. यासोबतत त्यांनी यावेळी सेना भाजप युती तुटल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. तसेच राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होणं हा जनाधाराचा अवमान असल्याचा देखील त्यांनी बोलून दाखवलं. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना विक्रम गोखले म्हणाले की, माझ्या दृष्टीने बाबासाहेब या देशाला कळले नाही, आंबेडकर मोठे व्यक्तिमत्त्व होते. त्यांची तुलना कोणाशीच होऊ शकत नाही. लाल बहादूर शास्त्री सोडून आतापर्यंतच्या देशातील सर्व पंतप्रधानांना शंभराच्या खाली मी गुण देतो. लाल बहादूर शास्त्री यांची जयंती ही 2 ऑक्टोबरला येते ती हेतुपुरस्सर पुसली जाते. त्याचा विसर पाडला जातो. हा देश कधीही हिरवा होणार नाही हा देश भगवा राहिला पाहिजे. जे 70 वर्षात झालं नाही ते मोदींनी केलं, पक्षाचे काम सर्व करतात, पण ते देशासाठी मोदी चांगलं काम करतात. वाचा : राजकुमार रावने फिल्मी स्टाईलने पत्रलेखाला केलं प्रपोज, एंगेजमेंट VIDEO लीक तसेच सध्याच्या राजकारणाविषयी ते म्हणाले की, भाजप आणि शिवसेना पुन्हा एकत्र आल्यास फार बरं होईल. राजकीय वर्तुळात परिस्थिती गंभीर झालेली आहे, कोणाची नावं घेत नाही. भाजप आणि शिवसेना पुन्हा एकत्र आल्यास फार बरं होईल. मी कोणत्याही राजकीय पक्षाला बांधील नाही नव्हतो आणि नसेन, असे देखील विक्रम गोखले यांनी यावेळी सांगितलं. सेना-भाजपने मुख्यमंञीपद अडिच वर्षांसाठी वाटून घेतलं असतं तर काय बिघडलं असतं. होय, सेना भाजपची युती तुटणं ही चूकच आहे, हे स्वत: फडणवीसांनी मान्य केलंय माझ्याशी बोलताना त्यांनीही हे कबुल केलंय. वाचा : Shilpa Shetty आणि Raj Kundra ने मिळून केली फसवणूक, गुन्हा दाखल राज्यात सेना भाजपची युतीचं सरकार येण्यासाठी मी स्वत: उद्धवजींशी बोलेन अस देखील ते यावेळी म्हणाले. तसेच राज्यात महाविकास अघाडीचे सरकार स्थापन होणं हा जनाधाराचा अवमान आहे.आताची सेना ही बाळासाहेबांची नाहीच. हे... आमच्यासारखे लोक सेनेच्या बोटचेप्या भूमिकेमुळे नाराज असल्याचे देखील त्यांनी यावेळी बोलून दाखवलं.
Published by:News18 Trending Desk
First published: