मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /राजकुमार रावने फिल्मी स्टाईलने पत्रलेखाला केलं प्रपोज; एंगेजमेंटचा VIDEO लीक

राजकुमार रावने फिल्मी स्टाईलने पत्रलेखाला केलं प्रपोज; एंगेजमेंटचा VIDEO लीक

राजकुमार राव आणि पत्रलेखा यांच्या लग्नापूर्वीच त्यांच्या एंगेजमेंटचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. त्या दोघांच्या एंगेजमेंटचा (Rajkummar Rao-Patralekhaa engagement) कार्यक्रमही चंदीगडमध्ये झाला.

मुंबई, 14 नोव्हेंबर : राजकुमार राव (Rajkummar Rao) आणि पत्रलेखा (Patralekhaa) आज लग्न करून आयुष्याची नवीन इनिंग सुरू करणार आहेत. 14 नोव्हेंबरला म्हणजेच आज हे दोघेही त्यांच्या खूप वर्षांच्या मैत्रीचे रुपांतर खास नात्यात करणार आहेत. चंदीगडमध्ये, लग्नाचे सर्व विधी (Rajkummar Rao-Patralekhaa wedding) आज राजकुमार राव आणि पत्रलेखाचे कुटुंबीय आणि काही निवडक मित्रांच्या उपस्थितीत पार पडतील.लग्नाआधी, त्यांच्या प्री-वेडिंग सेलिब्रेशनचे फोटो आणि व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल होत आहेत. त्यांच्या एंगेजमेंटचा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये राजकुमार त्याची लेडी प्रेयसी पत्रलेखाला गुडघ्यावर(Rajkummar Rao-Patralekhaa exchange engagement rings) बसून प्रपोज करताना दिसत आहे.

राजकुमार राव आणि पत्रलेखा यांच्या लग्नापूर्वीच त्यांच्या एंगेजमेंटचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. त्या दोघांच्या एंगेजमेंटचा (Rajkummar Rao-Patralekhaa engagement) कार्यक्रमही चंदीगडमध्ये झाला.

वाचा: राजकुमार राव-पत्रलेखाच्या मेहंदी सोहळ्यासाठी हुमा कुरेशी पोहोचली

हुमा कुरेशी-फराह खानची उपस्थिती

हा कार्यक्रम चंदीगडच्या लक्झरी रिसॉर्ट 'द ओबेरॉय सुखविलास' येथे झाला आणि या जोडप्याचे जवळचे मित्र आणि कुटुंबातील सदस्य उपस्थित होते. या सोहळ्यात हुमा कुरेशी, साकिब सलीम आणि फराह खान उपस्थित होते, अशी माहिती समोर आली आहे.

असं केलं प्रपोज

राजकुमार रावने पत्रलेखाला गुडघ्यावर बसवून एंगेजमेंट रिंग देऊन प्रपोज केले. 'माझ्याशी लग्न करशील'... असे त्याने फिल्मी स्टाईलमध्ये पत्रलेखाला विचारले. हा प्रस्ताव ऐकून पत्रलेखानेही त्याच्यासमोर गुडघे टेकले आणि राजकुमार राव याला आधी अंगठी घालायला लावली. याचवेळी दोघेही एकमेकात मग्न होऊन एकत्र नाचतात. दोघेही पांढऱ्या रंगाच्या पोशाखात दिसले.

एंगेजमेंट सोहळ्याची थीम ब्लॅक अॅण्ड व्हाइट होती

सोशल मीडियावर राजकुमार राव आणि पत्रलेखाच्या एंगेजमेंट सोहळ्याचे फोटो व्हायरल होत आहेत. या फोटोमध्ये पाहुणे मंडळी ब्लॅक अॅण्ड व्हाइट कपड्यात दिसत आहे. यावरून असं लक्षात येते की, या सोहळ्याची थीम ही ब्लॅक अॅण्ड व्हाइट होती.

वाचा : बॉयकॉट आणि अटकेच्या चर्चेत बिनधास्तपणे पार्टीत डान्स करताना दिसली कंगना

मोजक्या लोकांच्या उपस्थितीमध्ये पार पडणार लग्नसोहळा

कोरोना स्थिती लक्षात घेऊन राजकुमार आणि पत्रलेखा यांनी लग्नसोहळा कमी लोकांच्या उपस्थितीमध्ये करण्याचा ठरवला आहे. या सोहळ्याला त्यांची घऱची मंडळी व काही जवळचे मित्र उपसथित राहणार आहेत.

 Rajkummar Rao, Patralekhaa, Rajkummar Rao-Patralekhaa wedding, Rajkummar Rao-Patralekhaa engagement Video, Chandigarh, Rajkummar Rao-Patralekhaa exchange engagement rings, Social Media, राजकुमार राव, पत्रलेखा, राजकुमार राव-पत्रलेखा की शादी

राजकुमार पत्रलेखाला देणार आहे खास भेट

लग्नाच्या तयारीत राजकुमार पत्रलेखाला खास भेट देण्याची तयारी करत आहे. राजकुमार रावच्या जवळच्या मित्राने दिलेल्या माहितीनुसार, राजकुमार पत्रलेखाला रोज प्रेमपत्र लिहायचा. त्याच्यातील काही पत्रे तो त्याच्याकडे ठेवत असत. कदाचित हीचं पत्रे तो पत्रलेखाला देणार आहे. ही अतिशय रोमँटिक कल्पना आहे. हीच खास गिफ्ट तो पत्रलेखाला देणार आहे.

Rajkummar Rao, Patralekhaa, Rajkummar Rao-Patralekhaa wedding, Rajkummar Rao-Patralekhaa engagement Video, Chandigarh, Rajkummar Rao-Patralekhaa exchange engagement rings, Social Media, राजकुमार राव, पत्रलेखा, राजकुमार राव-पत्रलेखा की शादी

राजकुमार राव आणि पत्रलेखा 10 वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. मात्र, इतर बॉलिवूड सेलिब्रिटींप्रमाणे या दोघांनीही आपलं नातं कधीच लपवलं नाही. दोघेही एकत्र अनेक फोटो शेअर करत असतात. मीडियाशी बोलतानाही दोघंही अनेकदा एकमेकांचा उल्लेख करताना दिसले आहेत.

First published:
top videos

    Tags: Bollywood News, Entertainment, Rajkumar rao